SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शिंदेच्या शिवसेनेचे 100 शाखाप्रमुख,75 पदाधिकाऱ्यांसह 1,000 शिवसैनिकांचा एकाचवेळी सामूहिक राजीनामा, महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप

जालना जिल्ह्यात शिवसेनेच्या सर्व तालुकाप्रमुखासह पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या कार्यपद्धीवर नाराज होऊन सर्व पदाधिका-यांची पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जालना जिल्हा दौऱ्याआधी शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 08, 2026, 21:51 IST | Updated: Nov 08, 2026, 22:29 IST
Join

एकनाथ शिंदे शिवसेना : शिंदेच्या शिवसेनेचे 100 शाखाप्रमुख,75 पदाधिकाऱ्यांसह 1,000 शिवसैनिकांचा एकाचवेळी पक्ष सोडला आहे. या सर्वांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खबबळ माजली आहे. हे सर्व  जालना जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहे. सर्वांनाी आपला राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख  यांच्यासह 75 पदाधिकारी, 100 शाखाप्रमुख यांच्यासह 1 हजार शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे  जालन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 

जालन्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का

जालना जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकार्यांनी सामूहिकरित्या राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख ए. जे बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाजार होऊन सर्व पदाधिकार्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ए. जे. बोराडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते पक्षाचे जिल्हाप्रमुख झाले. मात्र पदाधिकार्यांना डावलत ए. जे बोराडे पक्षाचे सर्व कार्यक्रमक करत आहेत. त्यामुळं जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन तालुकाप्रमुखासह सर्व पदाधिकार्यांनी सामूहिक रित्या राजीनामा देत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या यांच्या दौर्याआधी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES