शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला; कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
एकनाथ शिंदे यांच्या शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला आहे. हे सर्वजण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची जोरदार र्चचा रंगली आहे.
एकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिंदेच्या शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी पक्ष सोडला आहे. शिवसेनेचे 100 शाखाप्रमुख, 75 पदाधिकारी आणि 1,000 शिवसैनिकांचा यात समावेश आहे. आता हे सर्व जण कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे.
जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे 100 शाखाप्रमुख,75 पदाधिकाऱ्यांसह 1,000 शिवसैनिकांचा एकाचवेळी सामूहिक राजीनामा दिला आहे. या सर्वांनी आपला राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील हे सर्व पदाधिकारी आहेत. 100 शाखाप्रमुख, शिवसेना तालुका प्रमुख यांच्यासह 75 पदाधिकारी तसेच 1 हजार शिवसैनिकांनी राजीनामा दिला आहे. जिल्हा प्रमुख ए.जे.बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वजण नाराज आहेत. यामुळचे सर्वांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मंठा तालुका का मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात येतो. पक्षांतर्गत वादामुळे 1175 जणांनी राजीनाम दिला आहे. यात शाखाप्रमुख, तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा सामवेश आहे. सर्वांनी सामूहिक राजीनामा दिल्याने शिंदेच्या शिवसेनेची मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील ताकद कमी होणार आहे.
शिवसेनेतील 1175 जणांनी एकाचवेळी सामूहिक राजीनामा का दिला?
शिवसेनेतील 1175 जणांनी सामूहिकरित्या राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख ए. जे बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाजार होऊन सर्व पदाधिकार्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ए. जे. बोराडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर त्यांना पक्षाचे जिल्हाप्रमुख करण्यात आले.
इथूनच स्थानिक वादाला सुरुवात झाली. ए. जे बोराडे पक्षाचे सर्व कार्यक्रम पदाधिकाऱ्यांना डावलून करत आहेत. त्यामुळं जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर सर्वच जण नाराज आहेत. ही नाराजी उफाळून आल्याने तालुकाप्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा देत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
शिवसेनेतील 1175 जणांनी एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधी पक्षाला मोठा धक्का बसला. 8 नोव्हेंबर 2026 रोजी शिवसेनेतील 1175 जणांनी राजीनामा दिला. यानंतर दुसऱ्यांच दिवशी 9 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर आले. पत्रकारांनी याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. सामूहिक राजीनामा दिल्यानंतर पुढची भूमिका काय असेल याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख उदय बोराडे यांना विचारले असता त्यांनी काहीच सांगितलेले नाही. लवकरच पुढचा निर्णय जाहीर करु असले ते म्हणाले. शिवसेनेचा राजीनामा देणारे 1175 पदाधिकारी कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हे सर्व जण ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करु शकतात अशी चर्चा रंगली आहे.