• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट! सहकार मंत्र्याना पळवून नेण्याचा डाव असल्याचा अमित देशमुखांचा खळबळजनक दावा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट! सहकार मंत्र्याना पळवून नेण्याचा डाव असल्याचा अमित देशमुखांचा खळबळजनक दावा

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपहरण नाट्याचा नवा ट्विस्ट आला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही पळवून नेण्याचा डाव होता असा खळबळजनक दावा आमदार अमित देशमुख यांनी केला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 13, 2026, 23:38 IST|Updated: Nov 13, 2026, 23:42 IST
joinshare
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट! सहकार मंत्र्याना पळवून नेण्याचा डाव असल्याचा अमित देशमुखांचा खळबळजनक दावा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास उरलेत. मात्र मतदानाआधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा दावा समोर आला आहे. आमदार अमित देशमुख यांनी केलेल्या एका दाव्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संघर्षाला नवं वळण मिळाले आहे. विरोधकांचा नेमका कोणता डाव होता? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याबाबत अमित देशमुख यांनी काय दावा केला आहे. भाजपकडून या आरोपांना  उत्तर देण्यात आले आहे. 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपने यावेळी जंग जंग पछाडल आहे. आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय, तर भाजपकडून अरविंद पाटील निलंगेकर यांनीही विजयासाठी ताकद पणाला लावलीय. विशेष म्हणजे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हेही काँग्रेस विचाराच्या सहकार पॅनलमध्ये सहभागी झाल्याने या निवडणुकीची रंगत आणखी वाढली. 

अशातच निलंगा येथील मतदाराच्या अपहरणाचा प्रकार समोर आला आणि राजकीय संघर्षाला वेगळंच वळण मिळालं. याच प्रकरणावर बोलताना अमित देशमुख यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाच पळवून नेण्याचा विरोधकांचा डाव होता. त्यासाठी रीतसर आराखडाही तयार करण्यात आला होता. असा खळबळजनक दावा हि आमदार अमित देशमुख यांनी केलाय. अमित देशमुख यांच्या या दाव्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संघर्षाला नवं वळण मिळाले. 

आमदार अमित देशमुख यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत अमित देशमुख यांनी निवडणुकीसाठी स्टंटबाजी करू नये. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरतं राजकारण न करता बँकेच्या मूळ प्रश्नांवर बोलावं, असा पलटवार निलंगेकर यांनी केला. त्यामुळे मतदानाआधीच दोन्ही बाजूंमधील आरोप-प्रत्यारोपांना धार आली.

एकीकडे जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई दुसरीकडे अपहरणाच्या आरोपांवरून पेटलेला राजकीय संघर्ष आणि त्यातच सहकार मंत्र्यांनाच पळवून नेण्याचा डाव असल्याचा दावा. यामुळे मतदानाआधी जिल्ह्याच्या राजकारणात वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांचा मतदानावर किती परिणाम होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Amit Deshmukh