• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 01, 2026, 03:35 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:17 PM IST
joinshare
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

2

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

3

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

4

काही तासात सुरु होणार WPL 2027 लिलाव! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार येणार Live Streaming?

5

भाजपाचा मोठा निर्णय! राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. 10 ऑगस्ट 2026 पूर्वी जात पडताळणी समितीने दिलेले सर्व आदेश अंतिम असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. या आदेशांना आव्हान द्यायचं असल्यास थेट उच्च न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने 22 जुलै 2026 रोजी कायद्यात दुरुस्ती करून विभागीय आयुक्तांकडे अपीलची तरतूद केली होती. मात्र या दुरुस्तीची अंमलबजावणी 10 ऑगस्टपासून सुरू झाली.
त्यामुळे 10 ऑगस्टपूर्वीच्या आदेशांवर नव्या कायद्यानुसार विभागीय आयुक्तांकडे अपील करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे

प्रकरण नेमकं काय आहे?

परभणीच्या कोमल गंगाधर पारवे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ज्योती श्रीधर दहिहंडे यांच्या कुणबी जातप्रमाणपत्रांवर जात पडताळणी समितीने आक्षेप घेतला होता. समितीने त्यांची जातप्रमाणपत्रं अवैध ठरवली होती. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दोन्ही याचिकाकर्त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली

दरम्यान, राज्य सरकारने 22 जुलै 2026 रोजी कायद्यात दुरुस्ती करून जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद केली. मात्र ही दुरुस्ती 10 ऑगस्ट 2026 पासून लागू झाली. त्यामुळे 10 ऑगस्टपूर्वी जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयांना नव्या कायद्यानुसार विभागीय आयुक्तांकडे अपील करता येईल का, हा मुख्य प्रश्न न्यायालयासमोर होता

याचिकाकर्त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची परवानगी मागितली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली असून, 10 ऑगस्टपूर्वीचे समितीचे निर्णय अंतिम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
High court