)
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. बाबांना खोकल्याचा त्रास झाल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून, त्यांच्या प्रकृती स्थिर आहेत.
आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल, प्रेमाबद्दल आणि सदिच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
बदलापूर शहरातील कात्रप रिंग रोडवर रात्रीच्या सुमारास भला मोठा अजगर रस्त्यावर आला होता. रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हा अजगर थंडीने किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे सुरक्षित अधिवासातून रस्त्यावर आला असावा. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका वाहनचालकाच्या नजरेस हा भलामोठा अजगर पडला.वाहनचालकाने तातडीने बदलापूरचे सर्पमित्र स्वप्निल बगाडे यांना याची माहिती दिली. बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षितपणे अजगराला रेस्क्यु केले. सुदैवाने, रात्रीच्या वेळेस वर्दळ कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे अजगरावर वाहन गेले नाही, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.त्यानंतर सर्पमित्र स्वप्निल बगाडे यांनी या अजगराला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव परिसरात तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये कुतूहल आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चारुमामा शाळेच्या मागील परिसरात हा अजगर आढळला. याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत अजगराची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधत अजगराला कल्याण वनपरिक्षेत्र कार्यालयात सुपूर्द करण्यात आले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे अजगराला सुरक्षित जीवदान मिळाले असून त्यांच्या कामाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने दुष्काळ जाहीर केला होता. तसेच, शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ हजार रुपयांची मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे.एवढा संवेदनशील मुख्यमंत्री दुष्काळी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. ही 5 हजार रुपयांची मदत म्हणजे अग्रिम (अॅडव्हान्स) मदत आहे, अंतिम मदत नाही. अधिकची मदत शेतकरी बांधवांना होणारच आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार आपल्या पाठीशी आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा तत्परतेने निर्णय घेतला आहे.
हातात लाल संविधान घेतात दुसऱ्या हातात लाल पुस्तक आहे. आम्ही तर निळ संविधान पाहिले आहे. दुसरे लाल पुस्तक आहे ज्यांनी नेपाळ, श्रीलंका व बांग्लादेश मध्ये रेजिम चेंज केले
त्याचाच वापर त्यांनी सुरु केला आहे. संविधान बदलायचे सांगितलं तर देश त्यांना जोडे मारेल म्हणून संविधानाच्या संस्था खराब सांगत आहेत अस हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बांग्लादेश नेपाळ श्रीलंकामध्ये रेजिम चेंज झाले संविधान बदलले. चारवेळा पत्रकार परिषदेमध्ये ते बोलले आम्हाला रेजिम चेंज करायचा आहे. उद्धव ठाकरे यांना अर्थ माहिती आहे की नाही ते सुद्धा बोलले आम्ही रस्त्यावर आलो आहे.
विरोधकांचा नारा सरकार नव्हे तर रेजिम चेंज आहे. रेजिम चेंजचा अर्थ राजकीय व्यवस्था बदलायची, संविधान बदलायची. देशातील संपूर्ण संस्था बदलायच्या आहेत. सरकार नाही तर रेजीम चेंज करत संविधान बदलण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवर केला.
लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आज देशात पुन्हा एकदा भारताच्या संविधानाला बदलण्यासाठी व व्यवस्था संपवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय षडयंत्राअंतर्गत काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे मोर्चा काढत आहेत असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दिल्ली-NCR मध्ये फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा लिखित आदेश जारी करण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी ग्रीन फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० या वेळेतच ग्रीन फटाके फोडता येणार आहेत, असं कोर्टाच्या आदेशात म्हटलं
तुम्हाला जर पंतप्रधान व्हायचे असेल, तर आयुष्यभर बनावट संसदेतच राहावं लागेल. तुमची पंतप्रधान होण्याची वेळ कधीच येणार नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींना लगावलाय. रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या रॅलीदरम्यान शाहांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. दरम्यान शाहांच्या विधानानंतर संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.
सांगली जिल्हा न्यायालया उडवून देण्याची धमकी आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली न्यायालय उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला आहे. न्यायालयातील धमकीच्या मेल केल्यानंतर न्यायालयात गोंधळ उडाला. कामकाज बंद करून वकील आणि कर्मचा-यांना न्यायालयाबाहेर काढले. घटनास्थळी सांगली पोलीस अधिकाऱ्यांसह फौज फाटा दाखल झाला. बॉम्ब शोधण्यासाठी श्वान पथकही दाखल झाले. पोलिसांकडून न्यायालयाचे इमारत आणि परिसराची तपासणी सुरू. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल आहे की, खरंच धमकी मेल याबाबत अस्पष्टता आहे.
सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल आला आहे. न्यायालय बॉम्बने उडवून द्यायची धमकी देणारा ई-मेल आला आहे. कोर्टाला ईमेल प्राप्त होताच जिल्हा आणि सत्र न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. संपूर्ण न्यायालय परिसर निर्मनुष्य करण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. कोर्टातील न्यायाधीश, वकील आणि सर्व पक्षकारना कोर्टाच्या बाहेर काढण्यात आले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती बिघडल्यानं शरद पवार रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांना पुण्यातील रूबी हॅाल क्लिनिक इथं उपचारांसाठी दाखल केले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामूळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रूबी हॉल क्लिनिकला दाखल करण्यात आले आहे.
ऐन दिवाळीत एसटी कामगारांची आंदोलनाची हाक दिली आहे. तीन टप्प्यात कर्मचारी आंदोलन करणार आहेत. उद्यापासून एसटी कामगारांचं घंटानाद आंदोलन सुरु होणार आहे. 4 नोव्हेंबरला द्वारसभा घेत तीव्र निषेध करणार आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर पाच नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 November 2026 : एकीकडे दिल्लीत INDIA आघाडीचं ‘चलो दिल्ली’ आंदोलन सुरु केले आहे. तर, दुसरीकडे भाजपने 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदयात्रा काढली आहे. हैद्राबाद येथून या रॅलीचा शुभारंभ झाला. मुंबईत देखील पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अमित शाह यांना भेटले आहेत. यामुळे महाराष्ट्रात देखील मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. तर, दुसरीकडे अर्णब'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचं संकट निर्माण झाले आहे. अवघ्या काही तासात हे वादळ धडकणार आहे.