• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा एका क्लिकवर

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 29, 2026, 10:08 IST|Updated: Nov 29, 2026, 13:33 IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Image Credit: breaking news live morning marathi news today​ delimitation bill ncp sharad pawar rahul gandhi congress 29 november 2026 latest News
29 Nov 2026 13:33 IST
share

सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा फोन

सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा फोन...डिलिमिटेशन विधेयकाबाबत दोघांमध्ये चर्चा...तर शरद पवारांच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती...

29 Nov 2026 11:57 IST

सांगलीत निघणार भाजपाची लोकशाही बचाव पदयात्रा

भाजपाच्यावतीने सांगलीमध्ये लोकशाही बचाव पदयात्रा काढण्यात येत आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार असून यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर,आमदार सुरेश खाडे,आमदार सुधीर गाडगीळ,आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत

29 Nov 2026 10:51 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवन

 

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवन..
केनियन नागरिकासह दोघांना अटक..
दोघांनी हायड्रो बीड या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न.. 

29 Nov 2026 10:50 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: नागपूर शहरातील 3 हॉटेलचे परवाने निलंबित

 

अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याने FDAचा दणका..अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा धडाका..

29 Nov 2026 10:49 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: द्रमुकच्या खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट

द्रमुकच्या खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट.. रात्री दिल्लीत शाहांच्या निवासस्थानी घेतली भेट..
डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा..
तामिळनाडूत लोकसभेच्या २० जागा वाढणार.. 
कनिमोळींची शाहांसोबत दिल्लीत चर्चा..

29 Nov 2026 10:44 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: सोलापुरामधील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा

 

सोलापुरामधील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा.. दोन वसतिगृहातील 11 विद्यार्थ्यांना विषबाधा..सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू.. 

29 Nov 2026 10:43 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: अफगाणिस्तानात शाळेजवळ भीषण स्फोट

 

अफगाणिस्तानात शाळेजवळ भीषण स्फोट.. 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 97 जण जखमी.. अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील घटना..

29 Nov 2026 10:25 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: राज ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर

 

राज ठाकरेंच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे... पक्ष संघटनेच्या आढाव घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत... आज राज ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत, यावेळी डिलिमिटेशनवर राज ठाकरे बोलणार का?, याकडे लक्ष... 

29 Nov 2026 10:19 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशन विधेयकाला शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा, 15 खासदार विधेयकाच्या बाजुने मतदान करणार

 

डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला एकनाथ  शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय..  विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत शनिवारी मंजूर करण्यात आला. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व 15 खासदार उपस्थित होते. संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सर्व खासदारांनी आजच दिल्लीला पोहोचावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

29 Nov 2026 10:18 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशनआधी 97 खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल

डिलिमिटेशन अर्थात परिसिमन विधेयक मांडण्याआधी लोकसभेतील आसन व्यवस्थेत मोठी आदलाबदल पहायला मिळतेय... लोकसभा सचिवालयाने द्रमुकच्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. द्रमुकच्या 22 खासदारांच्या जागा बदलण्यात आल्या असून ते आता काँग्रेसपासून वेगळे बसणार आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी द्रमुकची वेगळ्या आसनव्यवस्थेची विनंती मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. इंडिया आघाडीपासून स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याची मागणी द्रमुकने केली होती.. या निर्णयामुळे समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या काही खासदारांच्या जागांमध्येही फेरबदल होणार आहेत... विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आता कनिमोळी यांच्या बाजूला बसणार आहेत... त्यामुळे या बदलाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय...

29 Nov 2026 10:17 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026:'पवारांवर डिलिमिटेशनचं भवितव्य अवलंबून'

 

'पवारांवर डिलिमिटेशनचं भवितव्य अवलंबून'
---
काँग्रेस नेते नाना पटोले यांचं विधान 
--
काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न- पटोले
---
राहुल गांधींनी सकारात्मक भूमिका मांडली- नाना पटोले 

29 Nov 2026 10:16 IST

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: राज्यातील 5 जिल्ह्यांवर फ्लॅश दुष्काळाचं सावट

 

राज्यातील 5 जिल्ह्यांवर फ्लॅश दुष्काळाचं सावट...जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होणार... भोपाळच्या मौलाना आझाद संस्थेचा धक्कादायक अहवाल...अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सांगली, सोलापूरचा समावेश

29 Nov 2026 10:15 IST

'डिलिमिटेशनमुळे देश विभागला जाणार'

डिलिमिटेशनमुळे देश विभागला जाणार... प्रकाश आंबेडकरांचा डिलिमिटेशनबाबत मोठा दावा... RSS आणि भाजपच्या जाळ्यात अडकू नका... आंबेडकरांचं खासदारांना आवाहन...

29 Nov 2026 10:15 IST

शिवसेना UBTच्या संसदीय दलाची आज दिल्लीत बैठक

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: शिवसेना UBTच्या संसदीय दलाची आज दिल्लीत बैठक

शिवसेना UBTच्या संसदीय दलाची आज दिल्लीत बैठक...डिलिमिटेशनविरोधात रणनीती ठरणार... अनिल देसाईंकडून सर्व खासदारांना व्हिप जारी...

29 Nov 2026 10:14 IST

डिलिमिटेशनवरुन पवारांच्या राष्ट्रवादीत मतमतांतरं

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशनवरुन पवारांच्या राष्ट्रवादीत मतमतांतरं

डिलिमिटेशनवरुन पवारांच्या राष्ट्रवादीत मतमतांतरं... बुलढाणा जिल्हाध्यक्षांचा विधेयकाला विरोध... विदर्भातील जागा कमी होण्याचा धोका असल्याचा आरोप..

29 Nov 2026 10:14 IST

'डिलिमिटेशन म्हणजे निवडणुका जिंकण्याचा नवा प्रयोग'

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशन म्हणजे निवडणुका जिंकण्याचा नवा प्रयोग

डिलिमिटेशन म्हणजे निवडणुका जिंकण्याचा नवा प्रयोग...सामना अग्रलेखातून हल्लाबोल... विधेयक मंजुरीसाठी अमित शाहांनी नॅशनल घोडेबाजार स्टॉक एक्सचेंज सुरु केल्याचा घणाघात.. 

29 Nov 2026 10:13 IST

डिलिमिटेशनविरोधात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशनविरोधात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी

डिलिमिटेशनविरोधात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी...मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी मैदानात... शरद पवार,एम के स्टॅलिन यांच्या मनधरणीचे प्रयत्न... खर्गेंचा तातडीचा मुंबई आणि चैन्नईचा दौरा...

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News
Sharad Pawar
congress

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: लोकसभेत डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. यासंदर्भातील लोकसभेच्या कामकाजाची यादी जारी करण्यात आलीय. तर एकीकडे शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून भाजपला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून