• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today : 14 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स
Live Now

Maharashtra Breaking News Today : 14 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स

Maharashtra Breaking News LIVE : 14 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.

Reported ByPrashant JadhavEdited ByPrashant Jadhav
Published: Nov 14, 2026, 06:37 AM IST|Updated: Nov 14, 2026, 10:52 PM IST
joinshare
Maharashtra Breaking News Today : 14 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स
Image Credit: LIVE BLOG TICKER
14 Nov 2026 22:30 IST
share

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण, आगरी-कोळी बांधवांचा कॅन्डल मार्च

Thane Pradeep Purnekar Murder Case : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून कळव्यात आगरी-कोळी बांधवांनी कॅन्डल मार्च काढलाय... जोपर्यंत प्रदीप पूर्णेकरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही मेणबत्ती विझवणार नाही, असा निर्धार यावेळी कॅन्डल मार्च काढणाऱ्या आंदोलकांनी व्यक्त केलाय... तर डोंबिवलीतही भूमीपुत्रांनी कॅन्डल मार्च काढलाय... छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा चौकापर्यंत शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला... पूर्णेकर हत्याकांडातील आरोपींना फाशी देण्याची मागणी कॅन्डल मार्च काढून करण्यात आली... या कॅन्डल मार्चमध्ये राम पूर्णेकरांसह भाजप नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

14 Nov 2026 19:34 IST

रायगडमध्ये NCPला मोठा धक्का, तटकरेंच्या समर्थकांचा राष्ट्रवादीला रामराम

Raigad NCP : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय... सुनील तटकरेंच्या समर्थकांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय... माणगावातील शेकडो नाराज कार्यकर्ते शिवसेनेत गेलेत.. माजी नगरसेवक संदिप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे , भाग्यश्री यादव, माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय... मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झालाय... मंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय.
 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

14 Nov 2026 19:06 IST

आजच्या चर्चेत विलीनीकरणाचा विषय नव्हता- फडणवीस

CM Fadanvis on Vilinikaran : सुनेत्रा पवारांकडून शासकीय कामकाजासंदर्भात भेट, विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही... आम्ही सत्तेमध्ये सोबत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत..असं काही असतं तर त्यांनी सांगितलं असतं.. फडणवीसांचं विलीनीकरणावर स्पष्टीकरण.

14 Nov 2026 18:03 IST

पिंपरी-चिंचवड मतदार यादी घोळ प्रकरणाची दखल

Pimpri-Chinchwad Matdar Yadi : नोव्हेंबर २०२४मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत, पिंपरी चिंचवड शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला होता... यासंदर्भातली तक्रार पवारांच्या राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली होती, ज्याची आता मुख्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आल्याची माहिती आहे.. निवडणूक आयोगानं कारवाई केल्याची माहिती आहे.
 

14 Nov 2026 17:36 IST

ऑगस्ट 2027पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन- विखे-पाटील

Vikhe-Patil on Water : धरणांच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून ऑगस्ट 2027पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन केल्याच जलसंपदामंत्री विखे पाटलांनी सांगितलंय... पिण्याच्या पाण्याचा प्रथम प्राधान्य असून शेतीसाठी पाणी उपलब्धतेनुसार सोडणार असल्याचं विखेंनी सांगितलंय... ज्या धरणात साठ्याव्यतिरिक्त पाणी आहे त्या धरणआतून पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्याची माहितीही विखेंनी दिलीय... राज्यातल्या दुष्काळावर बोलताना त्यांनी ही माहिती दिलीय.

14 Nov 2026 16:31 IST

प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली जावी..नाईकांची सामंतांवर टीका

Ganesh Naik & Uday Samant on Udyog : प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली जावी... औद्योगिक प्रकल्पावरून गणेश नाईकांची सामंतांवर टीका.. प्रकल्पाचे फायदे-तोटे लोकांना समजावून सांगा असं गणेश नाईक यांचं वक्तव्य.. पालघरमधील प्रस्तावित भादवे-उसरणी MIDCच्या मुद्द्यावरून बोलताना नाईकांनी टीका केलीय.. 
तर, मी गणेश नाईकांना सांगणं अपेक्षित नाही..उदय सामंत यांचं वक्तव्य... नाईकांनी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारावं..मंत्री गणेश नाईकांच्या टीकेनंतर मंत्री उदय सामंतांचं उत्तर.

14 Nov 2026 13:12 IST

महादेव अ‍ॅपप्रकरणी CBIची मोठी कारवाई

MAHADEV APP : महादेव अ‍ॅपप्रकरणी CBIनं मोठी करावाई केलीये.. 6 राज्यांमध्ये 33 ठिकाणी CBIनं छापे मारलेत.. यात मुंबई, नागपूर, अमृतसर, दिल्ली, नागौर, ढोलपूर, भोपाळ, रायपूर, दुर्ग, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत या शहरांचा समावेश आहे.. या ठिकाणी ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराचे पॅनल सुरु असल्याचं आढळून आलंय.. CBIनं या ठिकाणांतून डिजिटल उपकरणे, मोबाईल, कागदपत्र जप्त केलेत.. ओमानमधून प्रत्यार्पण करून आणलेल्या मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले.

14 Nov 2026 11:06 IST

ओला कंपनीला दहा लाखांचा दंड

OLA : अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या 'ओला' कंपनीला प्रवासाआधीच ग्राहकांकडून टिप मागणे चांगलेच महागात पडले आहे... केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ओलाची मूळ कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीसला तब्बल दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे... लवकर राईड मिळावी यासाठी ड्रायव्हर शोधताना ग्राहकांना अतिरिक्त पेमेंट करण्यासाठी प्रवृत्त केले जात होते... ही 'टिप' किंवा ' अ‍ॅड-ऑन' पद्धत ग्राहकांची दिशाभूल करणारी आणि 'डार्क पॅटर्न' वापरणारी अनुचित व्यापार प्रथा असल्याचे सीसीपीएने म्हटले आहे... मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या आदेशानुसार ओलाला ही प्रथा तत्काळ बंद करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत....

14 Nov 2026 10:47 IST

मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

RAILWAY MEGABLOCK : देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी उद्या रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे... मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल....हार्बर मार्गावर  पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान  सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणारेय.... 

14 Nov 2026 10:21 IST

कंगना रनौत यांच्यावर गुन्हा दाखल

KANGANA RANAUT : भाजपा खासदार कंगना रनौत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.. सोशल मीडियावर गांधी कुटुंबावरील आक्षेपार्ह पोस्ट करणं कंगना रनौत यांना भोवलंय.. हिमाचल प्रदेशमध्ये कंगना रनौत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिमल्यातील बालुगंज पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

14 Nov 2026 10:20 IST

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका

NEW CYCLONE : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, पुढील दोन दिवसांत त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे... 16 नोव्हेंबरला  'अक्वान' चक्रीवादळात तयार होण्याचा अंदाज आहे... बंगालच्या उपसागरात गेल्या २० दिवसांत तयार झालेले हे तिसरे चक्रीवादळ ठरणार आहे... 

14 Nov 2026 08:47 IST

सीएसएमटीच्या पुनर्विकासात 128 झाडांवर कुऱ्हाड

CSMT STATION TREE CUTTING : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पासाठी परिसरातील तब्बल 128 झाडे प्रभावित होणार आहेत.... यापैकी 56 झाडे तोडण्यात येणार असून 72 झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाणार आहे.... यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्षतोडीची परवानगी मागितली होती.... हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीने मंजूर केला.... या कामासाठी परिसरातील काही झाडे हटविणे आवश्यक असल्याचे रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने प्रस्तावात म्हटले आहे.... 

14 Nov 2026 08:44 IST

जायकवाडीच्या पाणीसाठ्यात मोठी घट

JAYAKWADI WATER LEVEL : छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा अवघ्या अडीच महिन्यांत ९५ वरून ६९ टक्क्यांवर आला आहे.. खरीप हंगामासाठी दोन आवर्तने दिल्यानंतर आता रबीचे पहिले आवर्तन सुरू झाले आहे.... त्यात दिवसा उन्हाचा चटका कायम असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे... पुढील पावसाळ्याला अजून आठ ते नऊ महिने बाकी असताना जलसाठ्यातील ही घट चिंता वाढवणारी ठरली आहे.... छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यांसाठी जायकवाडीचा साठा महत्त्वाचा ठरत आहे... छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही शहरांसह दोन्ही जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींना सुद्धा याच धरणातून पाणी पुरवठा होतोय.....

14 Nov 2026 08:27 IST

पुण्यात मतदारांचे परस्पर पत्तेबदल

PUNE : राज्यात ऑक्टोबर २०२४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पुण्यात एकगठ्ठा मतदारांचे पत्ते परस्पर बदलण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे...या मतदारांनी पुण्याबाहेर स्थलांतर केले नसताना त्यांच्या नावाने अन्य कुणी बदलाचे अर्ज भरल्याचे वेळीच स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय...मात्र, आता याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून पोलीस दप्तरीही अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे....

14 Nov 2026 08:18 IST

रेल्वेचं RAC आरक्षण बंद होण्याची शक्यता

RAC TICKET : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. रेल्वेतून प्रवास करताना RACतिकीट असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या व्यक्तीसोबत एकच बर्थ शेअर करावा लागतो. बर्थचे पूर्ण पेसै भरुनही प्रवाशांना हाल सहन करावे लागतात. मात्र आता रेल्वेची ही सेवा बंद होणार असल्याची शक्यता आहे. रेल्वेचं RAC तिकीट एकतर एकतर 'कन्फर्म' होईल नाहीतर 'कॅन्सल' होणार आहे.. संसदीय समितीच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे..  या निर्णयामुळे आरएसी तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.

14 Nov 2026 08:12 IST

पंढरपुरात लवकरच विठ्ठल दर्शनासाठी ड्रेसकोड

PANDHRPUR : पंढरपुरातील विठोबाच्या दर्शनाला अनेक परदेशी भक्त पंढरपुरात येतात... पण आता परदेशी विठ्ठलभक्तांसाठी ड्रेसकोड लागू केला जाणार आहे... परदेशी भक्ताना विठोबाचे दर्शन घेताना भारतीय किंवा वारकरी परंपरेनुसार वस्त्र परिधान करून विठ्ठल दर्शनाला थेट प्रवेश दिला जाणार आहे... याबाबतची एसओपी अर्थात आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आलंय... याबाबत जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळीच्या सल्लागार परिषदेने ठराव करून मंदिर समितीस दिला आहे.... 

14 Nov 2026 08:11 IST

विठ्ठल मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं

VITTHAL MANDIR OPEN : कार्तिकी  यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भावी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. या यात्रा कालावधीत जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाचे दर्शन व्हावे यासाठी आजपासून देव 24 तास दर्शनासाठी उपलब्ध राहणार आहे. आजपासून कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे.  अखंड दर्शनासाठी उभा राहणाऱ्या विठुरायाला थकवा जाणू नये म्हणून देवाच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी मऊ कापसाचा तक्क्या देण्यात येणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे 24 तास मुखदर्शन, तर नित्य पूजा, नैवेद्य ,पोशाख आणि लिंबू पाणी या विधी व्यतिरिक्त जवळपास देव सव्वा बावीस तास भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे . श्रींचा पलंग काढण्यात आल्यानंतर काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इ. राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील

14 Nov 2026 08:09 IST

SBIच्या 4 हजार 280 ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरीला

SBI DATA LEAK : स्टेट बँकेच्या ४ हजार २८० ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरीला गेलाय.. योनो अ‍ॅपची सुरक्षा भेदून हॅकर्सचा सर्व्हरमध्ये शिरकाव केलाय.. हॅकर्सनी हा डेटा डार्कनेटवर टाकल्याने बँकेच्या सायबर सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यात.. सायबर विभागाने सर्व्हर सुरक्षित करून पुढील डेटा चोरी रोखल्याचा दावा केलाय तसंच डार्कनेटवरील डेटा हटवल्याचे पोलिसांनी सांगितलंय.. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Indian Politics
Breaking News

About the Author

Prashant Jadhav

Prashant Jadhav

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News LIVE : 14 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.