• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today : 15 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स
Live Now

Maharashtra Breaking News Today : 15 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 15 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported ByPrashant JadhavEdited ByPrashant Jadhav
Published: Nov 15, 2026, 06:09 AM IST|Updated: Nov 15, 2026, 11:42 PM IST
joinshare
Maharashtra Breaking News Today : 15 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स
Image Credit: LIVE BLOG TICKER
15 Nov 2026 23:37 IST
share

मालेगावात राजकारणात नवीन ट्वीस्ट

Malegaon Shivsena & Islam Party : सध्या राज्यातील राजकारणात वेगाने वेगवेगळ्या घडामोडी घडत असून असाच एक ट्वीस्ट मालेगावच्या राजकारणात आला....शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि माजी आमदार आसिफ शेख यांची इस्लाम पार्टी यांनी विकासाच्या मुद्द्यावर हातमिळवणी केली...दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमात आसिफ शेख यांनी मालेगाव शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी मंत्री दादा भुसे यांच्या सोबत एकत्रितपणे काम करणार असल्याचे जाहीर केले...मंत्री दादा भुसे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन आगामी काळात एकत्रपणे काम करणार असल्याचे संकेत दिले.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

15 Nov 2026 22:55 IST

पंढरपूर-खोदकामावेळी विहिरीचा भाग कोसळला, 4 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती

Pandharpur Well Collapsed : पंढरपूर तालुक्यातील आंबे गाव इथं विहिरीचा भाग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली मागील 11 तासांपासून अडकलेले आहेत... विहिरीत पडलेले दगड मातीचे ढिगारे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून काम सुरू आहे...  रात्र झाल्यानंतर त्या ठिकाणी लाईट लावून विहिरीतून दगड मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे... सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयेन हे मागील काही तासांपासून घटनास्थळावर सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत... पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात NDRFची टीम पोहोचलीय... NDRF टीमकडून विहिरीची पाहणी करण्यात आलीय.
 

15 Nov 2026 20:43 IST

शेतमजुरांना फायनान्स कंपन्यांचा विळखा, थकीत कर्जासाठी घर सील

Latur Home Sealed : लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजूर आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत... हाताला काम नाही, उत्पन्नाचे साधन नाही... घरखर्च भागवणंही कठीण झालं आहे.....अशा परिस्थितीत कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या तगाद्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...लातूरच्या ममदापूर गावात नवनाथ भोई या अल्पभूधारक शेतमजुराचे घर एका फायनान्स कंपनीकडून सील करण्यात आल्याचा आरोप आहे... थकीत कर्जाच्या वसुलीसाठी थेट घरालाच टाळं ठोकण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे... एकीकडे दुष्काळाने रोजगार हिरावला... दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी घरच सील झालं... अशा परिस्थितीत या कुटुंबाने जायचं कुठे? दुष्काळात जगायचं कसं आणि कर्ज फेडायचं तरी कसं? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

15 Nov 2026 18:26 IST

शरद पवार मोदींच्या इशाऱ्यावर नाचतात -प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मोदींच्या इशाऱ्यावर नाचतात... प्रकाश आंबेडकरांची शरद पवारांवर सडकून टीका... अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावलेली व्यक्ती शरद पवार...दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे भाजपच्या ए आणि बी टीम... असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

15 Nov 2026 17:07 IST

रुपाली चाकणकरांच्या आरोपात काही तथ्य नाही- दीपाली सय्यद

Dipali Sayyed on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी कॉपी राइट्स आरक्षित केले असून 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय... यामुळे चित्रपटाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे... यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उत्तर दिलंय... चाकणकरांच्या आरोपात काही तथ्य नाही... त्यांना कायदेशीर उत्तर देणार... असं दीपाली सय्यद म्हणाल्यात.

बातमीचा व्हिडीओ पाहा -
 

15 Nov 2026 16:45 IST

रुपाली चाकणकरांच्या नाव,फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क

Rupali Chakankar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी त्यांचे व्यक्तिगत कॉपी राइट्स आरक्षित केलेत... रुपाली चाकणकरांचं नाव, त्यांचा फोटो, त्यांची ओळख, आणि त्यांची वैयक्तिक शैली आणि त्यांची स्वतःला सादर करण्याची विशिष्ट पद्धत आता ट्रेडमार्क असेल आणि त्याची नोंदणी त्यांनी केलीय... त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही रुपाली चाकणकरांनी दिलाय.

15 Nov 2026 14:38 IST

पुण्यात कोयता गँगची दहशत

PUNE : पुण्यातील हडपसरमधील चिंतामणीनगर परिसरात कोयता गँगची दहशत पहायला मिळाली... चिंतामणीनगर येथील भाजी मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला... हल्ल्यानंतर आरोपींनी 10 कार आणि एका बसची तोडफोड केली... सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय... दोन आरोपी अद्याप फरार आहेत... 

15 Nov 2026 14:37 IST

वारीसाठी निघालेल्या वारक-याचा अपघाती मृत्यू

SANGALI WARKARI DEATH : पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला... मिरज तालुक्यातील भोसे फाटा येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. उत्तम बाबासो पाटील असे मृत वारकऱ्याचे नाव आहे...पंढरपूरच्या वारीसाठी पायी निघालेले उत्तम बाबासो पाटील यांना रत्नागिरी-नागपुर महामार्गावरील भोसे फाटा परिसरात पहाटे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली... या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस आणि हायवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे....

15 Nov 2026 14:36 IST

कार, दुचाकी, टेम्पोचा अपघात, 2 जणांचा मृत्यू

LATUR : लातूर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे... तुळजापूरहून औसाकडे येत असताना टाका पाटीजवळ कार, दुचाकी आणि टेम्पो यांच्यात भीषण धडक झाली... पाठीमागून आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे... या अपघातात दुचाकीवरील तायप्पा बंडगर आणि ओमकार बंडगर या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे... तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे...

15 Nov 2026 14:35 IST

नालासोपा-यात छटपूजेवरून तणाव

NALASOPARA : नालासोपा-यातील नागेला तलावावर छटपूजा करण्यास मनाई केल्याने तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती.. संतप्त महिलांनी शनिवारी संध्याकाळी तलावाच्या प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून आत प्रवेश केला.. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढत वातावरण शांत केले... दरम्यान कोपरी भागात गणेशोत्सवादरम्यान स्थानिकांवर कारवाई करणारं महापालिका  प्रशासन या प्रकरणी गप्प का असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय.. मनपानं तातडीनं छटपूजा आयोजकांवर कारवाई करावी अशी मागणी मनसैनिकांनी केलीये..

15 Nov 2026 14:33 IST

रामकुंडावर साकारली बिरसा मुंडांची भव्य प्रतिमा

NASHIK : भगवान बिरसा मुंडा यांची आज 151वी जयंती आहे...या जयंतीनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर पणत्यांपासून बिरसा मुंडा यांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आलीय... गोदावरीच्या तीरावर कलाकारांच्या कल्पकतेतून आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून पणत्यांची ही सुबक मांडणी करण्यात आलीय...तसेच गोदावरी तीरी महाआरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत बिरसा मुंडा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे... 

15 Nov 2026 12:15 IST

सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घरफोडी

YEOLA : नाशिकच्या येवल्यात लोणार गल्ली परिसरात सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्याच्या घरात घरफोडी झालीय... 20 तोळे सहाशे ग्रॅम सोनं आणि चार लाखांची रोकड चोरांनी लंपास केलीय... बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला... चोरांनी एक दुचाकी देखील पळवून नेली... जेजुरीला येथे देवदर्शनासाठी गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारला... घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तपास सुरू केलाय... 

15 Nov 2026 12:10 IST

अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यावरुन वाद

AMITABH BACHCHAN : बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील जलसा बंगला कौटुंबिक संपत्ती वादात सापडलाय... अमिताभ यांच्या वहिनी रमोला बच्चन यांनी 1993मध्ये झालेल्या एका गिफ्ट डीडला आव्हान दिलंय... यात या बंगल्याचा मालकी हक्क जया बच्चन यांच्या नावावर करण्याचा समावेश होता... मात्र हा व्यवहार आपल्या सहमतीशिवाय झाला होता असा दावा रमोला बच्चन यांनी केलाय... हे प्रकरण आता अंधेरीतील सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात पोहचले आहे. जिथे या प्रकरणाची सुनावणी सुरू झालीये..

15 Nov 2026 12:08 IST

नाशिकच्या रामकुंडाचं विद्रूपीकरण

NASHIK : नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड आणि गोदाघाट परिसरात छटपूजेची जागा निश्चित करण्यासाठी ऑईलपेंटने नावे व खुणा काढून विद्रुपीकरण केल्याची घटना समोर आली आहे... छटपूजेच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी पायऱ्यांना रंग लावल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे....

15 Nov 2026 10:34 IST

'सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार'

JAIKUMAR GORE : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून आता महायुतीमधील नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे समोर येत आहे... अध्यक्षपदाबाबत स्थानिक पातळीवर चर्चा होईल, असे सूतोवाच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले होते... मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावर वेगळी भूमिका घेत जिल्हा बँकेचा अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्रीच ठरवतील असे स्पष्ट केले आहे....

15 Nov 2026 09:09 IST

प्रदूषण, वातावरण बदलांमुळे मुंबईकर आजारी

MUMBAI AIR : मुंबईसह संपूर्ण उत्तर कोकण प्रदेशात दिवसाचे कमाल तापमान आणि पहाटेचे किमान तापमान यांत तफावत जाणवत असल्याने साथीच्या आजारांत वाढ झाली आहे...वातावरणातील बदलाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषणातही वाढ झाली आहे...शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक शनिवारी १३४ इतका नोंदविण्यात आला. हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत असली, तरी प्रदूषित हवेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे...त्यामुळे श्वसनविकारांच्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे...

15 Nov 2026 08:49 IST

सिडकोच्या बिगर EWS घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त

CIDCO : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डिसेंबर २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेतील दुर्बल आर्थिकदृष्ट्या घटकांव्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील घरांची सोडत २७ नोव्हेंबर २०२६ रोजी काढण्यात येणार आहे...न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या या प्रवर्गातील सोडतीचा मार्ग मोकळा झाल्याचे सिडकोने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे....योजनेत अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी सोडत काढण्यास न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे स्थगिती देण्यात आली होती... संबंधित दावा निकाली निघाल्यानंतर सिडकोने ही प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२५ च्या योजनेत अल्प उत्पन्न गटासाठी वापरण्यात आलेला उल्लेख यापुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांव्यतिरिक्त अन्य प्रवर्ग असा केला जाणार आहे. योजनेच्या इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. अर्ज मागे घेण्याची मुभा सोडतीत सहभागी व्हायचे नसलेल्या अर्जदारांना आपला अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. सोडतीच्च्या तारखेपूर्वी दहा दिवसांच्या आत संकेतस्थळावरून अर्ज मागे घेण्याची विनंती करता येईल. अशा अर्जदारांनी भरलेली संपूर्ण रक्कम कोणतीही कपात न करता परत केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची विनंती सादर केल्यानंतर १५ दिवसांत परतावा दिला जाईल.

15 Nov 2026 08:45 IST

उद्यापासून नवी मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमानसेवा सुरु होणार

MUMBAI-SINDHUDURGA AIR SERVICE : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यातील थेट विमानसेवा उद्यापासून सुरू होत आहे... ही विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असेल...'फ्लाय ९१' ही विमान कंपनी या मार्गावर विमान चालवणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि मुंबई महानगर प्रदेशादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई प्रवासाचा पर्याय मिळणार आहे... या विमानसेवेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे दोन्ही दिशांचा नियोजित प्रवास सुमारे १ तास १० मिनिटांचा आहे.

15 Nov 2026 08:42 IST

नाशिकमध्ये मनपाच्या शाळेला भीषण आग

NASHIK : नाशिकच्या सातपूर परिसरात महानगरपालिका शाळेला रात्री भीषण आग लागली..  शाळेच्या आवारातून धुराचे आणि आगीचे लोट निघताना दिसताच स्थानिक नागरिक आणि परिसरातील रहिवाशांची मोठी धावपळ उडाली.. आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाचे बंब आणि सातपूर पोलिसांचे डीबी पथक  तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.

15 Nov 2026 08:41 IST

मुंबईत CNG पुन्हा दीड रुपयांनी महागला

MUMBAI CNG RATE : मुंबई महानगर प्रदेशात CNGच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आलीय... पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक पाठोपाठ मुंबईतही सीएनजीच्या दरात 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली... यामुळे आता मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी 91 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत...गेल्या 15 दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे...याआधी 1 नोव्हेबरला एक रुपया तर आज पुन्हा दीड रुपयांची वाढ करण्यात आलीय... या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सीचा प्रवास देखील महागण्याची शक्यता आहे... मध्य-पूर्व देशांतील वाढलेला खरेदी खर्च, देशांतर्गत गॅस वाटपात झालेली घट अशा विविध कारणांमुळे महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीचा निर्णय घेतलाय... आधीच महागाईने त्रस्त मुंबईकरांना आता सीएनजी दरवाढीचा सामना करावा लागणार आहे... 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Indian Politics
Breaking News

About the Author

Prashant Jadhav

Prashant Jadhav

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 15 नोव्हेंबर 2026  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.