Maharashtra Breaking News Today : 17 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 17 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 17 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
17 Nov 2026 23:30 IST
महायुतीवर रामदास आठवलेंची उघड नाराजी
Ramdas Athavale on Mahayuti : महायुतीमध्ये सहभागी असलेल्या रामदास आठवले यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय... भाजपच्या काळात आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. काँग्रेससोबत असताना आम्हाला योग्य प्रमाणात जागा मिळत होत्या.. मात्र आता महायुतीमध्ये तशी परिस्थिती नसल्याचं आठवले यांनी म्हटलंय... त्यामुळे महायुतीने रिपब्लिकन पक्षाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Nov 2026 22:27 IST
मुख्यमंत्र्यांकडून झी २४ तासच्या बातमीची दखल, फायनान्स कंपनीनं सील केलेलं घर उघडलं
Impact of ZEE 24 TAAS News Report : बातमी लातूरमधून झी 24 तासच्या इम्पॅक्टची... लातूरच्या ममदापूर येथील नवनाथ बोयणे या शेतकऱ्याचं घर फायनान्स कंपनीने सील केलं होतं. याबाबत झी २४ तासने बातमी दाखवली होती. या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांना सूचना केल्या. त्यानंतर रमेश कराड आणि प्रशासनाने घटनास्थळी जाऊन फायनान्स कंपनीने लावलेलं सील तोडलं. त्यामुळे अनेक दिवसांपासून घराबाहेर असलेल्या बोयणे कुटुंबाला मोठा दिलासा मिळालाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Nov 2026 20:11 IST
मुली मुलांवर नाही, तर पैशांवर प्रेम करतात- इंदुरीकर महाराज
Indurikar Maharaj's Controversial Statement : मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या केवळ पैशांवर प्रेम करतात. असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी केलंय..भाईंदरमध्ये आयोजित एका कीर्तनाच्या कार्याक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.. मुलींच्या प्रेमाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Nov 2026 19:31 IST
जन्मदात्या बापानेच दोन चिमुकल्यांना धरणात फेकलं
Sambhajinagar Crime : संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलीये. जन्मदात्या बापानेच दोन चिमुकल्यांना जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकलं. चॉकलेट आणि वडापाव खायला देण्याचं आमिष दाखवत. फिरायला जाण्याच्या बहाण्याने दोन चिमुकल्यांना बापाने दुचाकीवर बसवलं. त्यानंतर जायकवाडीच्या डाव्या कालव्यात फेकलं. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी घटनेला विरोध केला असतानाही आरोपीने त्यांच्यावर दगडफेक करत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोमनाथ रोडगे याला ताब्यात घेतलं.
17 Nov 2026 17:35 IST
ठाकरेंनी सादर केलेले पुरावे बनावट- ध्रुव मेहता
Shivsena Party-Symbol Hearing Update : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर न्यायालयात आज पुन्हा महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत... याचिकाकर्त्यांनी सादर केलेले उपस्थिती पत्रक म्हणजे केवळ उपस्थिती नोंदवही असल्याचा युक्तिवाद मेहता यांनी केला.. 21 जून रोजी झालेल्या बैठकीत प्रतिवादी अनुपस्थित असल्याचं सिद्ध करणारे दस्तऐवज बनावट आणि फेरफार केलेले असल्याचा मोठा दावाही त्यांनी केलाय... याचिकाकर्त्यांकडून सादर करण्यात आलेला एकमेव पुरावा म्हणजे संदेशाचा स्क्रीनशॉट असून तो केवळ संदेश बजावल्याचा पुरावा असल्याचं मेहता म्हणाले.. संबंधित कागदपत्रांची योग्य बजावणी झाल्याचं सिद्ध करण्यात याचिकाकर्त्यांना यश आलेले नाही असा युक्तिवादही त्यांनी न्यायालयात केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
17 Nov 2026 16:17 IST
जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम
Jalgaon JDCC Bank Mahayuti Won : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने मोठी बाजी मारलीय.. आतापर्यंत तब्बल 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत.. यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 6, भाजपच्या 3 आणि सुनेत्रा पवारांच्या पक्षाच्या 2 जागांचा समावेश आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी सकाळी 11 वाजल्यानंतर उमेदवारांच्या माघारीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली... पालकमंत्री गुलाबराव पाटील, सुमित पाटील, सोनवणे सोमसिंग पाटील, मृणाल अमोल पाटील, नलिनी पाटील यांच्यासह अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपकडून गिरीश महाजन, रोहित निकम आणि रजनी सावकार यांचीही बिनविरोध निवड झाली.. सुनेत्रा पवारांच्या पक्षाच्या सोनल पवार आणि जयश्री पाटील यांचाही यात समावेश आहे.
17 Nov 2026 13:21 IST
लॉरेन्स गँग दिल्ली पोलिसांच्या टार्गेटवर
DELHI POLICE : बॉलिवूड सेलिब्रिटीना येणाऱ्या धमकी प्रकरणात चर्चेत असलेली लॉरेन्स बिश्नोई गँग आता दिल्ली पोलिसांच्या टार्गेटवर आहे... दिल्ली पोलिसांनी साबरमती तुरुंग प्रशासनाला एक पत्र लिहीत लॉरेन्सला भेटायला येणाऱ्यांचा तपशील मागवला आहे... लॉरेन्सला भेटायला आलेल्या लोकांच्या तपशिलाची पोलीस चौकशी करणार आहेत... बिश्नोईचा तुरुंगाच्या आत, बाहेर नेटवर्क असण्याचा पोलिसांना अंदाज आहे... दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईच्या कथित वकिलाला अटक केली होती... लॉरेन्सच्या अंतरराष्ट्रीय संबंधाची देखील चौकशी होणार आहे...
17 Nov 2026 12:17 IST
तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका
TARALI : पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून आता वाद चांगलाच पेटला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने 13 नोव्हेंबर रोजीच अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावत काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देत पाहणी केली. हे काम अनधिकृत असल्याचा आरोप करत त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. त्यामुळे तारळी प्रकल्पाचा वाद आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे
17 Nov 2026 12:16 IST
सिंधुदुर्गात आंबा, काजूच्या बागांना मोहोर
SINDHUDURGA : सिंधुदुर्गात थंडीचा हंगाम सुरु झालाय..थंडीचा हंगाम आंबा आणि काजू पिकाला पोषक असल्याने जिल्ह्याच्या किनारी पट्ट्यातील भागात आंबा आणि काजू झाडांना मोहर येण्याची प्रक्रिया सुरू झालीये.. वेंगुर्ला, मालवण आणि देवगड तालुक्यातील काही भागात आंबा आणि काजू पिकाला चांगला मोहर आला आहे. थंडीचा हंगाम पुढील महिनाभर असाच कायम राहिल्यास पीक जोमदार येऊ शकते...ऐन नोव्हेंबर महिन्यातच मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने किनारपट्टी भागातील आंबा- काजू बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
17 Nov 2026 11:49 IST
मुंबईतील सात धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट
MUMBAI : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झालीयं...धरणांमध्ये केवळ ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.... गतवर्षी याच कालावधीत धरणांमध्ये 91 टक्के पाणीसाठा होता.. त्यामुळे यंदा सुमारे १३ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झालायं... नोव्हेंबरमध्येच पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय...
17 Nov 2026 10:37 IST
अमरावतीमध्ये 12 वर्षांमध्ये 6 बाळांची विक्री
AMRAVATI : अमरावती शहरातील डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयातून कथित नवजात बालक विक्री केल्याच्या खळबळजनक प्रकरणात पोलीस तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची प्रसूती करून तिचे बाळ परस्पर विकल्याचा गंभीर आरोप डॉ. वैशाली भोजने यांच्यावर आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीदरम्यान डॉ. भोजने यांनी गेल्या बारा वर्षांत तब्बल सहा नवजात बालकं विकल्याचं कबूल केलं आहे. पोलीस जबाबात ही धक्कादायक माहिती समोर आलीये.. या प्रकरणी न्यायालयाने भोजने दाम्पत्याला २० नोव्हेंबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
17 Nov 2026 10:31 IST
सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनात नवी समीकरणं?
DELHI : सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव या पुस्तकाचा औपचारिक प्रकाशन सोहळा सोमवारी दिल्लीत पार पडला.. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या सोनिया गांधींनी जागवलेल्या आठवणींमुळे हा सोहळा हृदयस्पर्शी ठरला.. असं असताना या सोहळ्याच्या निमित्तानं नव्या राजकीय समीकरणांची नांदी पाहायला मिळाली... या सोहळ्यात सपाचे अखिलेश यादव यांना पहिल्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आलं होतं... येत्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना दिलेल्या मानाच्या स्थानाची दिल्लीत जोरदार चर्चा रंगलीय.. तर याच सोहळ्यात सगळ्यात लक्षवेधी ठरली ती भाजपवासी झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची हजेरी.... पंजाबमध्येही फेब्रुवारीत विधानसभा निवडणुका होणार आहेत.. या निवडणुकांआधी सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनाला एकेकाळी राहुल गांधींचे खास असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या हजेरीनं सा-यांच्या भुवया उंचावल्यात. पंजाब निवडणुकांआधी अमरिंदर सिंग यांची घरवापसी होणार का याची उत्सुकता लागलीय.. तर तिसरी लक्षवेधी बाब म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांना राहुल गांधींच्या शेजारी स्थान देण्यात आलं... त्यामुळे थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय..
17 Nov 2026 09:33 IST
काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा
KASHMIR : काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय.. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.. कुलगामच्या लारू भागात ही कारवाई करण्यात आलीये... ठार झालेल्या दहशतवाद्याची अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेला दहशतवादी उमर निसार दार असून तो लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याचा साथीदार होता. मोहम्मद लतीफ भट हा सुरक्षा दलांच्या यादीत 'कॅटेगरी बी'चा दहशतवादी होता.
17 Nov 2026 09:28 IST
राष्ट्रवादी विलीनीकरणाचा सस्पेन्स कायम
NCP MERGER SUSPENSE : विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शहा यांच्याशी पंचतारांकित हॉटेलमध्ये कोणतीही स्वतंत्र बैठक झालेली नाही. त्यांची केवळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्येच अपेक्षित भेट झाली. त्यामुळे या दौऱ्यात दोन्ही 'राष्ट्रवादीं'च्या विलीनीकरणाबाबत कोणतीही सविस्तर किंवा ठोस चर्चा झाली असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. याआधी खासदार पार्थ पवार यांच्या संभाव्य उपस्थितीबाबतही बरीच चर्चा रंगली होती; परंतु त्यातूनही कोणतीही अधिकृत बैठक झाल्याचे समोर आले नाही.
17 Nov 2026 09:24 IST
दिवाळीनंतर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घसरण
MUMBAI POLLUTION : दिवाळीनंतर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत पुन्हा घसरण झालीयं.. शहराचा वायुप्रदूषण निर्देशांक १३२ वर पोहोचला आहे.... गेल्या तीन दिवसांपासून हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत कायम असली, तरी अनेक भागांमध्ये प्रदूषणाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे... कुलाबा येथे सर्वाधिक २५६, तर मालाड पश्चिम येथे १८८ आणि देवनार येथे १७६ एक्यूआयची नोंद झाली.... अनेक प्रदूषण निरीक्षण केंद्रांवर हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर नोंदविण्यात आली आहे.. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे....
17 Nov 2026 09:23 IST
मुंबईत किमान तापमानात घट, गारठा वाढला
MUMBAI COLD : मुंबईत सध्या किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटेच्या वेळी गारठा वाढला आहे...सकाळी वातावरण आल्हाददायक असून दुपारी उन्हाचे चटके कायम आहेत.. त्यामुळे मुंबईकरांना अद्याप थंडीची प्रतीक्षा आहे... तर मुंबईसह राज्यात हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला... तर सांताक्रूझ येथे किमान तापमान सुमारे 19 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे...
17 Nov 2026 09:20 IST
साखर उत्पादनात दुपटीहून अधिक वाढ
SUGAR : देशातील साखर उत्पादनाने यंदाच्या हंगामात सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत देशात २३.५९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ११.४९ लाख टन साखर तयार झाली होती. यंदाचे उत्पादन दुपटीहून अधिक आहे. महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम लवकर सुरू झाल्याने उत्पादनातील ही वाढ प्रामुख्याने नोंदविण्यात आली आहे.
17 Nov 2026 09:11 IST
राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा
STATE DAM WATER LEVEL : राज्यातील ३ हजार ४२ धरणांमध्ये १५ नोव्हेंबरपर्यंत ६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे... गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २६ टक्क्यांची तूट नोंदवण्यात आली आहे... छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत कमी ३६ टक्के, तर पुणे विभागात ७४ टक्के पाणीसाठा आहे... त्यामुळे पुढील सहा महिने राज्यात पाणीवापराचे काटेकोर नियोजन करण्याचे आव्हान आहे....
17 Nov 2026 08:51 IST
एल निनोचा रब्बी हंगामावर परिणाम
EL NINO : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाळ्यात अपुरा पाऊस झाला.... त्याचा परिणाम खरिपाच्या उत्पादनासह रब्बी हंगामाच्या पेरण्यांवरही दिसून येत आहे.... त्यामुळे राज्यात रब्बी हंगामातील पेरणीचा वेग यंदा तुलनेने कमी असून, १६ नोव्हेंबरपर्यंत १० लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.... हे राज्याच्या ५७ लाख ८० हजार हेक्टरच्या सरासरी क्षेत्राच्या केवळ १७ टक्के आहे.... पीकनिहाय स्थितीत ज्वारीची पेरणी ३ लाख ६० हजार हेक्टरवर झाली ... तर हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र सर्वाधिक २५ लाख १६ हजार हेक्टर आहे... तसंच गव्हाची सरासरी पेरणी ११ लाख ८० हजार हेक्टर झाली...
17 Nov 2026 08:50 IST
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
CYCLONE : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे 'अक्वान' या नावाच्या तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे... या पार्श्वभूमीवर - आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांतील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला.... १७ नोव्हेंबरपर्यंत तीव्र चक्रीवादळात आणि त्यानंतर १९ नोव्हेंबरच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यतायं...
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.