)
CSN Farmers Meeting : संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत दरवाढ करण्यासंबंधी वरिष्ठांना विचारून निर्णय घेतला जाईल, असे साखर कारखानदारांनी सांगितले. त्यामुळे आजची बैठक कुठल्याही निष्कर्षाअभावी गुंडाळण्यात आली. यानंतर ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. जळीत ऊसबाबत चर्चा झाली नसल्याचं शेतक-यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर साखर कारखान्यांकडून योग्य ती उचल जाहीर केली नसल्याने शेतकरी पुन्हा आंदोलन करणार असं जाहीर केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Shivsena Party-Symbol Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरील आजची सुनावणी संपली... उद्धव ठाकरेंनी 34 आमदारांसह सभागृहात बहुमत गमावल्यानं मविआ सरकार कोसळलं.. स्वत: उद्धव ठाकरेंनी हे मान्य केलं होतं.. 21 जूनच्या बैठकीत दिलीप लांडेंची स्वाक्षरी बनावट...ठाकरेंनी बहुमत गमावल्यानं मविआ सरकार कोसळलं... एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता यांचा कोर्टात युक्तिवाद.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ANDHRA PRADESH : ‘अक्वान’ चक्रीवादळ अधिक तीव्र होऊन अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
PUNE : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित एक महत्त्वाची बातमी... पुणे शहरातील महत्त्वाचा असलेला भिडे पूल आजपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय.. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या बांधकामामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.... पुलाचे बांधकाम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय.. आजपासून 31 डिसेंबरपर्यंत या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय..
THANE : ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचाच मोबाईल फोन हॅक झाल्याची घटना घडलीय.. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअप स्टेटसवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडालीय.. दरम्यान सायबर पोलिसांना अश्लील व्हिडिओ डिलीट करण्यात यश आलंय.. मात्र थेट पोलीस आयुक्तांचाच मोबाईल हॅक करण्याचं धाडस करणारे सायबर भामटे नेमके कोण आहेत? याचा शोध आता सायबर सेल घेतंय..
BULDHANA : बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय... जगभरात प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवराला आता जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळाचा मान मिळालाय. इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेस अर्थात IUGS या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळांच्या तिसऱ्या शंभर स्थळांच्या यादीत लोणार विवराचा समावेश करण्यात आलाय. लोणार सरोवराची वैशिष्ट्यपूर्ण भूशास्त्रीय रचना, परिसरातील खनिजे आणि सरोवराच्या पाण्याचे वेगळे गुणधर्म यामुळे जगभरातील संशोधकांसाठी लोणार नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिलंय. आता या जागतिक मान्यतेमुळे लोणारचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झालंय. विशेष म्हणजे, ही मान्यता केवळ लोणारसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरलीये..
PANDHARPUR : पंढरपूर मध्ये कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार आणि शिवा संघटना जिल्हाध्यक्ष राजू भिंगे यांची गोळ्या घालून हत्या झाली आहे. पंढरपुरात इसबावी येथे राहत्या घरासमोरच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर भिंगे याला तातडीने शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पंढरपूर शहरात कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. राजा भिंगेवर गावठी पिस्टलने छातीत आणि पायात अशा दोन गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे. पोलीस सीसीटीव्ही तपासून लागले असून शहरात सर्वत्र कॉम्बिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. राजू भिंगे हा शिवा संघटनेचा सोलापूर जिल्हाध्यक्ष आहे मात्र त्याच्यावर यापूर्वी हत्या आणि इतर काही गुन्हे दाखल आहेत तो सराईत गुन्हेगार असल्याची नोंद पोलिसांच्या गुन्हेगारी रेकॉर्डवर आहे
SATARA DCC BANK : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा फैसला आज होणार असून, अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये पदवाटपावर एकमत होत असल्याचे चित्र असले, तरी भाजपमधील शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे नाव समोर येतं आहे तर भाजपकडून अतुल भोसले आणि ज्ञानेश्वर रांजणे यांचे नाव समोर येतं आहे.आज होणाऱ्या या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले
VIDHARBHA FARMER SUICIDE : दुष्काळ जाहीर झाला, मदतीच्या घोषणा झाल्या; मात्र शेतकऱ्यांच्या जगण्यातील संकट कायम आहे. पावसाची तूट, खरिपाचे नुकसान, रब्बी हंगामाची अनिश्चितता, डोक्यावर कर्ज आणि वाढता उत्पादन खर्च अशा आर्थिक कोंडीत सापडलेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांत दसरा-दिवाळीच्या दीड महिन्यात तब्बल १५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय... ऑक्टोबरमध्ये १२७, तर नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत २८ शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय..यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत आत्महत्यांच्या घटना अधिक आहेत.... गंभीर बाब म्हणजे, अमरावती विभागात दर आठ तासांनी एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असल्याचे विदारक वास्तव समोर आलंय..
MUMBAI : सीएनजी दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे आता मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे...रिक्षा-टॅक्सी संघटनेकडून सरकारकडे भाडेवाढीची मागणी करण्यात येत आहे...संघटनेकडून 2 रुपये भाडेवाढ देण्याची मागणी...सरकारने ही मागणी मान्य केल्यास मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे...
MULSHI : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती... तालुक्यातील प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पावसातील खंडामुळे रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आली आहेत... या पार्श्वभूमीवर भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने मुळशी तालुक्यातील प्रमुख पिकांचे २० टक्के सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत....
MALEGAON : नाशिकच्या मालेगावच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा भुईकोट किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे... उत्खननादरम्यान लहान आकाराचे 14 आणि मोठ्या आकाराचे 10 ते 12 तोफगोळे आणि तोफेचा एक मोठा तुकडा सापडला आहे... इतिहासप्रेमींच्या अभ्यासासाठी या सन १८१८ च्या युद्धातील वस्तु महत्त्वपूर्ण ठरणार आहेत...
VANDE BHARAT : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रवाशांना आता महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या गाडीतील भोजनात पुरणपोळी, वांग्याचे भरीत आणि झुणका-भाकर यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश करण्याचे नियोजन आयआरसीटीसीनं केलंय. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात येणार असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांच्या ताटात महाराष्ट्रीय पदाथांची मेजवानी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मुंबई आणि बंगळुरु या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी बंदे भारत एक्स्प्रेस नोव्हेंबरच्या सुरुवातीला सेवेत दाखल झाली. आता प्रवासातील खाद्यपदार्थांमध्येही प्रादेशिक चवींचा समावेश करण्यावर भर दिला जात आहे. सध्या या गाडीत प्रवाशांना वरण-भात, भाजी यांसारखे नियमित जेवण दिले जाते. मात्र, महाराष्ट्रातून धावणाऱ्या या ट्रेनमधील प्रवाशांना राज्यातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख देण्याच्या दृष्टीने 'आयआरसीटीसीने पुढाकार घेतलाय...
SANGLI DCC BANK : सांगलीला मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड आज पार पडणार आहे.सर्वपक्षीय सत्ता असणाऱ्या जिल्हा बँकेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचाच लक्ष लागून राहिले आहे.२१ जागा असणाऱ्या जिल्हा बँकेत महाविकास आघाडी १० आणि महायुती १० आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संचालक देवराज पाटील आणि काँग्रेसचे महेंद्रआप्पा लाड यांची तर उपाध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेचे तानाजी पाटील यांचे नाव चर्चेत आहे.दुपारी ३ वाजता निवड प्रक्रीया पार पडणार आहे.त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचा नजरा लागून राहिल्या आहेत.
AMRAVATI : अमरावतीच्या मोर्शी नगरपरिषद मधील मटन पार्टीवरून भाजप आणि शिंदे शिवसेनेत चांगलीच जुंपली असून मटन पार्टीवरून भाजप-शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याचा पाहायला मिळत आहे. मागच्या वेळी देखील भाजपच्या महिला व बालकल्याण सभापतींनी नगरपरिषद मध्ये 200 ते 250 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता शिंदेंच्या शिवसेनेने भाजपावर आरोप केला असून आमच्या शिवसेना शिंदे गटाला आणि आम्हाला बदनाम करण्याचे भाजपचे हे षडयंत्र असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रवी गुल्हाने यांनी म्हटलंय.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 18 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.