• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today : 26 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स
Live Now

Maharashtra Breaking News Today : 26 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 26 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported ByPrashant JadhavEdited ByPrashant Jadhav
Published: Nov 26, 2026, 06:24 IST|Updated: Nov 26, 2026, 23:25 IST
joinshare
Maharashtra Breaking News Today : 26 नोव्हेंबर 2026 | राजकारण, हवामान, मुंबई-पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी ब्रेकिंग अपडेट्स
Image Credit: LIVE BLOG TICKER
26 Nov 2026 23:22 IST
share

राम पूर्णेकरांकडून पोलिसांना संविधानाची प्रत भेट

Thane Ram Purnekar Gift : संविधानदिनानिमित्त राम पूर्णेकर यांनी तपास अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिलीय. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात अद्याप न्याय मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय .राम पूर्णेकर यांनी संविधान दिनाचे औचित्य साधत तपास अधिकारी शैलेश साळवी आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. या माध्यमातून त्यांनी प्रकरणात योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 2 डिसेंबरला मोठा खुलासा करणार, असा इशारा राम पूर्णेकर यांनी दिलाय. 

26 Nov 2026 22:30 IST

यवतमाळमधील रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी 50 हजार झाडांवर कुऱ्हाड?

Vidarbh Vrukshtod : कर्जतमध्ये टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आता विदर्भात आणखी एका मोठ्या जंगलतोडीचा घाट घातला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. यवतमाळमधील रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी जवळजवळ 50 हजार अतिरिक्त झाडांची कत्तल करण्याचा धक्कादायक प्रस्ताव पुढे आला आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करणारा, उद्याच्या बैठकीचा अजेंडा थेट 'झी २४ तास'च्या हाती लागला आहे! उद्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार असून, याच बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. उद्या नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत हा प्रस्ताव 9व्या क्रमावर चर्चेला ठेवण्यात आला आहे ... त्यामुळे महाराष्ट्रात बड्या प्रकल्पांसाठी पुन्हा एकदा हजारो झाडांचा बळी दिला जाणार का? कोणाच्या आशीर्वादाने हा पर्यावरणाचा सौदा मांडला जातोय? असे खळबळजनक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यात रिलायन्स सिमेंटेशन प्रकल्पासाठी आधीच 467.5 हेक्टर राखीव वनजमीन बहाल करण्यात आली आहे. यामध्ये पिंपरडवाड, हिरापूर आणि गोविंदपूर या तीन गावांतील जमिनीचा समावेश आहे. इतकंच नव्हे, तर ही वादग्रस्त जमीन टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यापासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर आहे! आधी आरेमधील वृक्षतोड, त्यानंतर कर्जतच्या भीमाशंकर अभयारण्यातील झाडांची कत्तल... आणि आता थेट यवतमाळमध्ये 50 हजार अतिरिक्त झाडांच्या कत्तलीचा हा प्रस्ताव! एकामागून एक जंगलांचा घास घेण्याचं हे सत्र नेमकं कोणाच्या फायद्यासाठी सुरू आहे? या धक्कादायक प्रकारामुळे आता संपूर्ण राज्यभर संतापाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Nov 2026 22:07 IST

ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यात पुन्हा जुंपली

Ramdas Kadam Vs Jarange on Clip : ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पुन्हा एकदा जुंपलीय. आमच्या अगोदर 2 तासांपूर्वी रामदास कदमांनी ऑडिओ क्पिप ऐकवली, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय. तर रामदास कदमांनी जरांगेंचा आरोप फेटाळून लावलाय. मनोज जरांगेंनी अगोदर क्लिप माध्यमांसमोर ऐकवली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी ही क्लिप आपल्याकडे आली, असा दावा त्यांनी केलाय. खोटं बोलू नये, चौकशीतून सत्य समोर येईल, असा इशारा रामदास कदांनी जरांगेंना दिलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Nov 2026 21:46 IST

ठाणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी

Threatening Email to TMC : ठाणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल...ठाणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी...सुरक्षेसाठी संपूर्ण इमारत रिकामी केली...बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरू...मुख्यालयासह सर्व प्रभाग समित्यांनाही अलर्ट देण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Nov 2026 18:50 IST

पुणे सत्र न्यायालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी

Threatening Email to Pune Court  : पुणे सत्र न्यायालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी... सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल.. पोलिसांकडून पुणे कोर्टात तपासणी सुरू...मुंबईनंतर पुण्यातही बॉम्बची धमकी... महिनाभरात पुणे कोर्टाला दुस-यांदा धमकीचा मेल.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

26 Nov 2026 17:32 IST

नवी मुंबई महापालिकेला धमकीचा मेल

Threatening Email to NMC : मुंबई,पुणे, नाशिक पाठोपाठ आता नवी मुंबई मनपालाही धमकीचा मेल आलाय.. बेलापूर मधील नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय तसेच बेलापूर मधील दिवणी सत्र न्यायालायला या दोन्ही प्रशासकीय  इमारतींना बॉम्ब ठेवल्याची धमकी या मेलमधून देण्यात आलीये... यामुळे पोलिसांनी तात्काळ या इमारतीची तपासणी सुरु केलीये.. श्वानपथक आणि बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी दाखल झालंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Nov 2026 17:16 IST

गोंदियात लोखंडी ड्रम कापताना भीषण स्फोट, वर्कशॉप चालकाचा मृत्यू

Gondia Blast : गोंदिया शहरातील शिवनगर येथे वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम सुरू असताना झालेल्या भीषण स्फोटात वर्कशॉप चालकाचा मृत्यू झाला आहे.... योगेश रहांगडाले असे मृतकाचे नाव असून ते 36 वर्षांचे होते...लोखंडी ड्रम कटर मशिनच्या साहाय्याने कापत असताना अचानक हा स्फोट झाला... ड्रममध्ये शिल्लक असलेल्या गॅसच्या संपर्कात कटरमधून निघालेली ठिणगी आल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे....या घटनेत गंभीर जखमी झालेल्या योगेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

26 Nov 2026 16:57 IST

पुणे गोळीबार-कोयता हल्ला प्रकरण, सर्व 6 आरोपींना पोलीस कोठडी

Pune Firing Case : पुण्यातील गँगवॉर प्रकरणात आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं.. यावेळी सर्व 6 आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती... हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला.. हल्ल्यासाठी वापरलेली वाहनं जप्त करण्यात आली असून सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये हल्ल्याचं फुटेज असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. हल्ल्यात वापरलेली पिस्तूल आणि कोयते कुठून आणले याचा तपास करायचा असल्याने 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली.. मात्र आरोपींच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले.. अखेर न्यायालयाने आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

26 Nov 2026 14:22 IST

विक्रोळीत दुकानाला भीषण आग

MUMBAI : मुंबईतील विक्रोळीत एका दुकानाला भीषण आग लागलीये.. टागोरनगर भागातील एका सन्मनचिन्ह विक्रीच्या दुकानाला ही आग लागलीये.. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न  सुरु आहेत..दरम्यान आगीत दुकानाचं मोठं नुकसान झालं असून आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेलं नाहीये..

26 Nov 2026 14:18 IST

हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा

HINGOLI : हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे... केवळ दोन दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा हिंगोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयात शासकीय रक्तपेढीमध्ये शिल्लक आहे.. त्यामुळे रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्तदात्यांसाठी शोधाशोध करावी लागतीये... तर ए पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह याचा केवळ एक दिवस पुरेल एवढाच रक्त साठा शिल्लक असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या रक्तपेठ्यांमध्ये रक्तासाठी भटकंती करण्याची वेळ आलीये..दुष्काळी परिस्थितीमुळे रक्तदात्यांची संख्या घटल्याने रक्तदानाच्या अभावामुळे हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय..रक्ताची टंचाई पाहता रक्तदान करण्याचा आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आल आहे.

26 Nov 2026 11:32 IST

कोकणातील नद्या प्रदूषणानं काळवंडल्या

RATANAGIRI : वाढते नागरीकरण,औद्योगिक रसायने,प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि घनकचऱ्यामुळे कोकणातील अनेक प्रमुख नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाल्यात... केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार राज्यातील ५४ नदीप्रवाह प्रदूषित असून, यामध्ये कोकणातील यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांतील अंबा, पाताळगंगा, उल्हास, वालधुनी, सावित्री, वशिष्ठी, सूर्या, वैतरणा आणि तानसा या नद्यांच्या प्रवाहांचा समावेश आहे. या प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय.

26 Nov 2026 11:31 IST

राज्यातील गोशाळांना दुष्काळाच्या झळा

YEOLA : दुष्काळाच्या झळा आता राज्यातील गोशाळांनाही बसू लागल्यात.. नाशिक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे गोशाळांमधील जनावरांना चारा आणि पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करताना गोशाळा चालकांची मोठी आर्थिक ओढाताण होत असून, शासनाकडून मिळणारे अनुदानही थकीत असल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. जनावरांचे संगोपन आणि देखभाल करणे कठीण होत असल्याने शासनाने तातडीने थकीत अनुदान वितरित करावे तसेच चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विशेष मदत करावी, अशी मागणी येवला तालुक्यातील गोशाळा चलकांनी केलीये.

26 Nov 2026 11:30 IST

संभाजीनगर शहरावर पाणीटंचाईचं संकट

SAMBHAJINAGAR : छत्रपती संभाजीनगर शहरावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावातील पाणीसाठा झपाट्याने घटला असून, आता तलावात अवघे सहा फूट पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे जुन्या शहरासह हडको परिसरातील १६ वॉर्डांवर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक भागांत नागरिकांना गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारीही सुरू झाल्या आहेत. हर्सूल परिसरात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने तलावाची पाणीपातळी जेमतेम १६ ते १८ फुटांपर्यंतच पोहोचली होती. पावसाळा संपल्यानंतर पाणीसाठ्यात सातत्याने घट होत आता तो अवघ्या सहा फुटांवर आला आहे. परिणामी, महापालिकेने दररोज १० एमएलडी पाणी उचलण्याऐवजी केवळ ३ ते ४ एमएलडी पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पर्यायी व्यवस्था म्हणून दिल्लीगेट जलकुंभ ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची धावपळ सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात जुन्या शहरासह हडको परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

26 Nov 2026 11:29 IST

चिपळूणच्या तिवरेत बेसुमार जंगलतोड

CHIPLUN : रत्नागिरीच्या चिपळूणमधील तिवरे गावात बेसुमार  वृक्षतोड सुरु आहे.. बंदी झुगारुन राजरोसपणे ही जंगलतोड सुरु असल्याचा आरोप ग्रामस्तांनी केलाय. भूस्खलन आणि पाणीटंचाईचा धोका असतानाही येथे मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. 17 नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून वनविभागाने कारवाई करत तोडलेली झाडं जप्त केली होती.. मात्र,त्यानंतरही दोन दिवसांत पुन्हा वृक्षतोड सुरू झाली असून,सुट्टीचा दिवस साधून लाकडांनी भरलेले तीन ट्रक येथून रवाना झाल्याची तक्रार गावक-यांनी केलीये..
राजकीय दबावामुळे अधिकारी कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय...

26 Nov 2026 11:27 IST

बारामतीत थार चालकाची मुजोरी

BARAMATI : बारामतीत थार चालकाची मुजोरी समोर आली आहे...! रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसालाच थार गाडीने जोरदार धडक देत चालकाने घटनास्थळावरून पळ काढला...! बारामतीतील सम्यक चौकात घडलेली ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे...!

26 Nov 2026 10:42 IST

चौपाट्यांवर कबुतरांना दाणे टाकल्यास दंड

BMC ACTION ON PIGENON FEEDING : दादर आणि माहीम चौपाटीवर कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर आता मुंबई महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. स्थानिक रहिवाशांकडून अस्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्याबाबत सातत्याने तक्रारी आल्यानंतर G-उत्तर वॉर्डने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय.. दोन्ही चौपाट्यांवर कर्मचारी तैनात केले जाणार असून, नियमावलीचे फलकही लावले जाणार आहेत. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यावर निबंध घालण्यात आले आहेत. मात्र, दादर येथील कबुतरखाना बंद झाल्यानंतर काही नागरिकांनी चौपाट्यांचा पर्याय निवडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कबुतरखान्यांवरील निर्बंध केवळ कागदावर न राहता चौपाटी परिसरातही कठोरपणे लागू करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

बातमीचा व्हिडिओ पाहा 

26 Nov 2026 10:10 IST

ढगाळ वातावरणाचा तुरीच्या पिकाला फटका

BULDHANA : निसर्गाच्या बदलत्या लहरींचा फटका  शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना बसू लागलाय..  बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झालंय... त्याचा परिणाम तूर पिकाच्या फुलोऱ्यावर होतोय.. आधीच दुष्काळामुळे खरीपाची पिकं हातची गेलीत.. आता रब्बी पिकंही संकटात सापडलीत.

26 Nov 2026 08:56 IST

'तुकाराम ओंबळेंच्या स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार'

TUKARAM OMBLE : २६/११ च्या हल्ल्यातील कसाबला पकडताना शहीद झालेले पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप वैशाली ओंबळे यांनी केला आहे... तुकाराम ओंबळे यांचे चुलत बंधू एकनाथ ओंबळेनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप वैशाली ओंबळे यांनी केले आहे. स्मारकाच्या कंत्राटात एकनाथ ओंबळेंना स्मारक समितीमधून काढून टाका अशी मागणी वैशाली ओंबळे यांनी केलीय.. लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे वैशाली ओंबळे म्हणाल्यात... 

26 Nov 2026 08:51 IST

मुंबईतील 26/11 हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण

MUMBAI : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला18 वर्षे पूर्ण झालीत. समुद्रमार्गे आलेल्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 166 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता तर सुमारे सातशे जण जखमा झाले. आजही या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यानंतर व्यवस्थेत देशाच्या मोठे बदल करण्यात आले. एनएसजीच्या धर्तीवर राज्यात विशेष प्रशिक्षण प्राप्त कमांडो दल म्हणून 'फोर्स तन'ची स्थापना करण्यात आली. दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये प्रभावी समन्वय माधण्यासाठी 'फोर्स वन'चे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण आता दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात येणार आहे. तसेच शीघ्रकृती दल अधिक सक्षम करण्यात आले. मुंबई पोलिस दलालाही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, वाहने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अन्य तांत्रिक सुविधांनी सज्ज करण्यात आले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

26 Nov 2026 08:20 IST

पोलिसांच्या वाहनाची दुचाकीला धडक, 3 जणांचा मृत्यू

GONDIA : गोंदिया जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनाने दुचाकीवरील तिघांना चिरडलंय.. गंगाझरी पोलिस स्टेशनच्या वाहनाने दांडेगाव गावाजवळ दुचाकीवरुन जाणा-या तरूणांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवर तिघांचा जागीच मृत्यू झाला...या अपघातात पोलीस वाहनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अपघाताची माहिती कळताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांचा निषेध करत रस्त्यावर टायर पोटवून रास्ता रोको केला... ज्या पोलिसांनी दुचाकीस्वारांना धडक दिली त्या पोलीस कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलीये..

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Indian Politics
Breaking News

About the Author

Prashant Jadhav

Prashant Jadhav

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 26 नोव्हेंबर 2026  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.