LIVE UPDATES: रायगडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून सुनील तटकरे,आदिती तटकरेना आव्हान
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 14 Nov 2026:रायगडमध्ये राष्ट्रवादीला झटका मिळणार आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.सुनील तटकरेंसह तटकरे कुटुंबाची साथ सोडून कार्यकर्त्यांची शिवसेनेत एन्ट्री करणार आहेत.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 14 Nov 2026: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत अजित पवारांनी आपल्याजवळ सूचक विधान केलें होतं,अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे.दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आरोपी डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर शाहीन सईद यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय.
14 Nov 2026 17:51 IST
नवी मुंबईतील भाजप नेते, नगरसेवकांची डीएनए टेस्ट करा, मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत, मंदा म्हात्रे यांनी नाव घेता भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत, मी आणलेले प्रोजेक्टमध्ये भाजप नेते आणि त्यांचे नगरसेवक हे अडथळा आणत असून त्यांचा डीएनए टेस्ट करावा असा गंभीर आरोप मंदा मात्रे यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे, तर मंदा मात्रे यांचा गैरसमज झाला असून, प्रत्येक कामासाठी कालावधी लागत असतो आत्ताच महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आहे यामुळे त्यांची कामे देखील होतील.त्याला काही अवधी लागू शकतो त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा असे भाजप तर्फे माझे महापौर जे डी सुतार यांनी स्पष्ट केले आहे.
14 Nov 2026 17:48 IST
आर्थिक वादातून साडूने-साडूला संपवत स्वत:लाही संपवलं
आर्थिक वादातून एका साडूने आपल्या सख्ख्या साडूचा खून करत स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेळंकी मध्ये घडला आहे.महेश ब्रिजलाल गौतम आणि बबलू भगवती गौतम,असे दोघे मृत साडूंची नावे आहेत.हे दोघेही परप्रांतीय असून उत्तरप्रदेशचे रहिवासी आहेत,कामानिमित्ताने ते मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथे सहकुटुंब गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होते. शुक्रवारी दोघांच्या मध्ये पैशाच्या देवाण-घेवाण मधून वादाचा प्रकार घडला, ज्यामध्ये बबलू गौतम याने साडू महेश गौतम याच्या डोक्यात लाकडीत दांडकाने हल्ला केला,त्यामध्ये महेश गौतम हा जागीच ठार झाला होता,या घटनेनंतर बबलू हा पसार झाला होता,दरम्यान शनिवारी सकाळी बबलू याने शेतातल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे,या घटनेमुळे खळबळ उडाली असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
14 Nov 2026 17:44 IST
रायगडमध्ये राष्ट्रवादीला झटका, 3 माजी नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत
सुनील तटकरेंसह तटकरे कुटुंबाची साथ सोडून कार्यकर्त्यांची शिवसेनेत एन्ट्री होतेय. राष्ट्रवादीचा नाराज गट आज मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहेत. यामध्ये तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तसेच विद्यमान नगरसेवकांचे कुटुंबीय प्रवेश करणार आहेत. माणगाव श्रीवर्धन शहरात पक्ष प्रवेश कार्यक्रम होतोय.
14 Nov 2026 17:39 IST
'..तर हे खासदार बाळ जन्माला आले नसते, पण हे अतरंगी निघाले', शिवसेनेकडून सुनील तटकरेंवर टीका
भरत शेठला सांगितलं गियर बदलूया. दोन वर्षापूर्वी मी गियर बदलला नसता तर हे खासदार बाळ जन्माला आले नसते. पण हे बाळ अतरंगी निघाले असे म्हणत आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. यापुढे याचा पुन्हा जन्म होणार नाही. शेकापचे साम्राज्य होते त्यांना शून्यावर आणून सोडले . आता दरी पडली, असे ते म्हणाले.
14 Nov 2026 17:38 IST
रायगडमध्ये यापुढे शिवसेना ठरवेल तोच खासदार होणार, गोगावलेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केलाय. रायगडमध्ये यापुढे शिवसेना ठरवेल तोच खासदार होणार. महाडमध्ये यांनी प्रवेश केला तर चालतो आणि आम्ही श्रीवर्धनमध्ये प्रवेश घेतला की चालत नाही.रायगड जिल्ह्यात वातावरण बदलत आहे तिघांच्या नेतृत्वाखाली 21 जागा आल्या. माणगाव मध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल. तुम्ही तुमचा पक्ष वाढवायचा आम्ही काय गोठ्या खेळायच्या का ? असा प्रश्न त्यांनी विचारला.
14 Nov 2026 17:14 IST
'ठाकरे-पवार घराणे एकत्र आले तर...'राष्ट्रवादी विलनीकरणावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी विलनीकरणावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीय. एक एक जाऊन चर्चा करण्यापेक्षा संघटितरित्या चर्चा केली जावी.नातं म्हणून भेटत असतील चर्चा करत असतील तर मला माहित नाही.बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे माझे नेते.जे काही होईल ते व्यवस्थित व्हावं.रोज रोज उलट सुलट चर्चा होऊ नये.ठाकरे घराणे एकत्रित आलं आणि पवार घराणे एकत्रित आला तर मला आनंद आहे.सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत त्याला यश येणार नाही.
अक्कलकोटच्या दुधनी गावात भरदिवसा मोबाईल शॉपीत घुसून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी मोबाईल दुकानात घुसत एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला.या तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि चप्पलने मारहाण केल्यानंतर लोखंडी पाईपच्या साहाय्याने बेदम मारहाण करून त्याचा खून केला. महेश धानप्पा गुड्डोडगी (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचे शिवसैनिकांना राष्ट्रवादीला चितपट करण्याचे आवाहन केले.रायगडचा खासदार शिवसेनेचा, श्रीवर्धनचा आमदार शिवसेनेचा आणि रायगडमधील सर्व आमदार महायुतीचे झाले पाहिजे.माणगावमध्ये शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी डागली राष्ट्रवादी विरोधी तोफ. व्यासपिठावरून सुनिल तटकरे यांच्या खासदारकीला आणि आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धनमधील आमदारकीला घोसाळकर यांचे आव्हान.
प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.