)
संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात प्रशासन सज्ज झाल आहे पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्टीला मतदान साहित्याच वाटप करण्यात येत आहे संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघात आठ जिल्ह्यांचा समावेश असून या निवडणुकीसाठी एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत हिंगोली जिल्ह्यात 36 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून 10 हजार 350 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत उद्या सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे साठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता संपूर्ण निवडणुकी प्रक्रियेचा आढावा घेतला आहे सकाळपासून मतदान साहित्यांचा वाटप केल जात असून आपापले साहित्य घेऊन मतदान कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
वाशिम जिल्ह्यातील टो गावाच्या शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बनावट देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केलाय.या कारवाईत रॉयल स्टॅग, इम्पीरियल ब्ल्यू आणि भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्यांसह एकूण २ लाख ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वैभव काकडे, अमोल काकडे आणि रवी काकडे या तिघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
तीन नोव्हेंबर रोजी पंतप्रधान बारामतीत येणार होते. मात्र आता 16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून पवार कुटुंबाला यासंबंधीची माहिती कळवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा आता 16 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. यामुळे पारगाव तर्फे असवसरी बुद्रुक, घोडेगाव, बावडा, राजगुरुनगर आणि लोणी भापकर या पाच गावांतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. तर पात्र खासगी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी चार तासांची पगारी सवलत देणे बंधनकारक आहे.
बैठकीत आगामी १ नोव्हेंबर ला दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या भव्य सभेच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. 'इंडिया' आघाडी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर एक रॅली आयोजित करणार आहे, जी 'मत चोरी'च्या मुद्द्यावर केंद्रित असेल. या ऑनलाइन बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
गेल्या आठवड्यात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई पाचव्या स्थानी होती. मात्र या आठवड्यात मुंबईच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये तिसरे स्थान मुंबईचे आहे. अमेरिकेतील जागतिक हवा गुणवत्ता मूल्यांकन संस्था IQAir कडून प्रदूषित शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. जगातील 122 शहरांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 166 वर असून शहरातील बहुतांश निरीक्षण केंद्रांवर हवेची गुणवत्ता आणखी खालावल्याची नोंद आहे. मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईतील वायुप्रदूषणात वाढ झाल्याने शहरभर धूर आणि धुरक्याचे साम्राज्य; दृश्यमानतेवरही परिणाम झालाय. वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील दिल्ली पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलीसांनी आरोपीना मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिलेल आहे, आज सकाळी ११ : ३० च्या सुमारास मुंबाईतील किला कोर्टात आरोपींना हजर करणार आहेत.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करणार आहेत.या पत्रकार परिषदेत जरांगे एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करणार आहेत.
आज मुंबईतील 3 पूलांचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यात सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार असून दुपारी १ वाजता विद्याविहार पुलावरून तिन्ही पुलांचं लोकार्पण होणार आहे. यामुळे सायन–धारावी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून विद्याविहार पुलामुळे पूर्व–पश्चिम जोडणी अधिक सुलभ होणार,GMLR च्या पहिल्या टप्प्यामुळे गोरेगाव–मुलुंड प्रवासाला गती मिळण्यास मदत होईल.
Maharashtra News Live Updates 22 October 2026 : आज मुंबईतील 3 पूलांचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यात सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करणार आहेत. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील दिल्ली पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलीसांनी आरोपीना मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिलेल आहे, आज मुंबाईतील किला कोर्टात आरोपींना हजर करणार आहेत. तसेच अभिनेता रणबीर सिंह आणि रणबीर कपूर यांच्या देखील घराची आणि ऑफिसची रेकी आरोपींनी केल्याचे समोर आले आहे. यासह देश विदेश सह राज्य आणि शहरातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊ शकता.