)
मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात बाईकर्सच्या एका मोठ्या समूहाने चक्क वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आणि मुंबई विमानतळ परिसरातील रस्त्यावर हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी बाईकर्सच्या समूहाकडून भरधाव वेगात धोकादायक स्टंट केले जात असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे, यातील अनेक बाईकस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते तर काही दुचाकींना नंबर प्लेटही नसल्याचे दिसून आले काही बाईकना मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर लावण्यात आल्याचाही आरोप आहे. या स्टंटबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, @javed_maldar_01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही हे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे स्टंटबाजी केल्याने इतर वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बाईकर्सवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा 21 सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी 11 अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जाणार आहेत. जानेवारीत परीक्षा सुरू होऊन 10 जून 2027 पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पीसीएम, पीसीबी, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाचवर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अशा एकूण 11 अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक व पुढील सूचनांसाठी सीईटी कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. आज बाळासाहेबांची 14 वी पुण्यतिथी असून त्यानिमित्त अभिवादन करण्यासाठी ठाकरे कुटुंब या ठिकाणी आलं आहे.
सर्पदंश झालेल्या रुग्णाला नेणारी रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली. तर दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी 35 मिनिटे लागल्याचा आरोप होतोय. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद मध्ये ही घटना काल रात्री घडली. बामणी येथील रहिवासी अशोक ताकलोड यांना सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारासाठी धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना निझामाबाद येथे पाठविण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. मात्र ही रुग्णवाहिका थोड्या अंतरावर गेल्यावर अचानक बंद पडली. परिणामी, रुग्णाला पुढील उपचारासाठी पाठविण्यात मोठा विलंब झाला. अखेर उपस्थित वाटसरूंनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करून रुग्णाला रवाना केले. तर प्रसूती झालेल्या दुसऱ्या एका रुग्णालाही पुढील उपचारासाठी बिलोली येथून रुग्णवाहिका बोलावून पाठविण्याची वेळ आली
दोन्ही रुग्ण गंभीर अवस्थेत असताना रुग्णवाहिकेत ऑक्सिजन मशीन आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे
महावितरणमध्ये 23 हजारांवर विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती सुरू असल्याच्या खोट्या जाहिराती किंवा माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती असल्याचे सांगत हजारो रुपयांच्या वेतनाचे आमिष दाखवले जात आहे. मात्र सर्व जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे महावितरणने सांगितले. महावितरणच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या नाहीत अशा कोणत्याही जाहिरातींबाबत उमेदवारांनी सावध राहावे, पदांच्या भरती प्रक्रियेबाबतची कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा वेळोवेळी दिली जाणारी माहिती ही केवळ महावितरणच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते. उमेदवारांनी वेबसाइटवर खात्री करून घ्यावी. यासोबतच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक महावितरणच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे उमेदवारांनी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अशा प्रकारच्या माहितीवर उमेदवारांनी किंवा नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
बँकेने दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी अधिकारी कायदेशीर प्रक्रिया राबवत असतील, तर केवळ त्या कारवाईच्या आधारावर संबंधितांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे देशभरातील बँकिंग क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाने एका कंपनीला कर्ज दिले होते. आर्थिक अडचणींमुळे कंपनीचे कर्जखाते 2016 मध्ये अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) झाले. त्यानंतर कंपनीच्या संचालकांनी बँकेकडून जातीय भेदभाव झाल्याचा आरोप केला. या आरोपांच्या आधारे बैंक अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या प्रकरणात बैंक अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द केली.
औद्योगिक विकासाच्या नावाखाली वाढणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात आता प्रदूषण कमी करणाऱ्या उद्योगांना आर्थिक प्रोत्साहन देणारी नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. गुजरातमध्ये यशस्वी ठरलेल्या या प्रयोगाचा महाराष्ट्रात विस्तार करण्यात येणार असून, त्यानंतर राजस्थानमध्येही ही पद्धत राबविली जाणार आहे. 'द अर्थशॉट प्राईझ' च्या वतीने सोमवारी मुंबईत आयोजित 'इम्पॅक्ट असेंब्ली' मध्ये या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. या उपक्रमामुळे महाराष्ट्र आणि राजस्थानमधील सुमारे 21 कोटी नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी हवा मिळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म धूलिकणांमुळे हवेचे प्रदूषण वाढते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी गुजरातमध्ये जगात प्रथमच कारखान्यांच्या प्रदूषणावर मर्यादा निश्चित करून आर्थिक देवाणघेवाणीची व्यवस्था निर्माण करण्यात आली. यानुसार, प्रत्येक कारखान्याला प्रदूषणाची कमाल मर्यादा ठरवून दिली जाते. या मयदिपेक्षा कमी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना त्यांच्या शिल्लक प्रदूषण परवानगीची विक्री अन्य कारखान्यांना करता येते. त्यामुळे प्रदूषण कमी करणाऱ्या उद्योगांना आर्थिक लाभ मिळतो, तर अधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना आर्थिक भार सहन करावा लागतो. परिणामी, उद्योगांना प्रदूषण नियंत्रणासाठी तंत्रज्ञान आणि यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याचे प्रोत्साहन मिळते.
पुणे शहरात सध्या रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, मोठ्या रुग्णालयांसह रक्त पेढ्यांमध्येही रक्ताचा खडखडाट आहे. काही रुग्णालयांमध्ये उपलब्ध रक्तसाठ्याचा मोठा भाग विविध रुग्णांसाठी राखीव असल्याने ऐन वेळी येणाऱ्या रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी होणे, नियमित रक्तदाते उपलब्ध न होणे आणि अपेक्षित संख्येने रक्तदान न होणे, ही या तुटवड्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन रुग्णालये आणि रक्तपेढ्यांकडून करण्यात आले आहे. दिवाळीच्या काव्ळयात अनेक नागरिक परगावी जात असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी होते. त्याचबरोबर नियमित रक्तदातेही रक्तपेढ्यांमध्ये येण्याचे प्रमाण या काळात घटते. यंदा मात्र या परिस्थितीचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे. 'केईएम' रक्तपेढीत सर्व रक्तघटक मिळून केवळ ७१ पिशव्यांचा साठा शिल्लक असून, सामान्य परिस्थितीत हा साठा 200 किंवा त्यापेक्षा अधिक असतो. फटका चॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताच्या तुटवड्याचा सर्वाधिक बसत आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्या, विविध कार्यालयांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या अवमान याचिका प्रकरणी सुनावणी
संजय राऊत यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते
आज न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोरील सुनावणीवेळी राऊत हजर राहण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी
एकनाथ शिंदे यांचे वकील ध्रुव मेहता करणार युक्तिवाद
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह, असभ्य किंवा अशिष्ट भाषा वापरणे म्हणजे अश्लीलता नव्हे. एखाद्या मजकुरामुळे काही व्यक्तींना धक्का बसू शकतो किंवा त्यांचा अपमान होऊ शकतो; मात्र त्यामुळे तो मजकूर अश्लील ठरत नाही. त्यासाठी संबंधित मजकूर वाचणाऱ्यांच्या मनात लैंगिक भावना किंवा वासना उत्तेजित करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदविले. तसेच एअर इंडियाच्या केबिन क्रू कर्मचाऱ्याची माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांतून न्यायालयाने मुक्तता केली. मयंक शर्मा असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, कनिष्ठ न्यायालय आणि सत्र न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
प्रकरण काय?
अर्जदार अखिल भारतीय केबिन क्रू असोसिएशनचे (एआयसीसीए) पदाधिकारी होते. संघटनेतील दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये वाद होता. शर्मा यांनी समाजमाध्यमांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह काही राजकीय व्यक्तींविरोधात अश्लील, बदनामीकारक आणि अपमानास्पद मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करून 11 मे 2012 मध्ये संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यानी बीकेसी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शर्माना १२ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर जामिनावर सुटका केली. याचिकेवर न्या. नितीन बोरकर यांच्या एकलपीठाने दिलेल्या निर्णयाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली.
राज्यातील विनाअनुदानित (खासगी) पूर्व प्राथमिक शाळांमधील मनमानी प्रवेश प्रक्रिया, देणगी आणि अतिरिक्त शुल्काची वसुली रोखण्यासाठी शिक्षण संचालनालयाने कठोर प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे. या निर्णयामुळे विशिष्ट दुकानातून पुस्तके-गणवेश खरेदी करण्याच्या सक्तीला आळा बसणार असून, आर्थिक लुटीला चाप बसून पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित पूर्व प्राथमिक शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शुल्क आकारणी आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाची (आरटीई) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी सोमवारी (ता. 16) निर्देश जारी केले.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणे आणि जलाशयांच्या तरंगते पृष्ठभागावर सौरऊर्जा पॅनेल बसवून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे एकीकडे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती होईल, तर दुसरीकडे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जलसाठ्यांचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे. नगरसेवक सचिन देवदास पडवळ यांनी यासंदर्भात महापौरांकडे ठरावाची सूचना सादर केली आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेची उपलब्धता हा प्रमुख अडथळा आहे. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा उपयोग करून सौरऊर्जानिर्मिती करण्याचा पर्याय पुढे आला आहे. तरंगते सौरऊर्जा पॅनेल विशेष संरचनेच्या सहाय्याने जलाशयांच्या पृष्ठभागावर बसविण्यात -येतात. या पॅनेलमुळे पाण्यावर सावली निर्माण होत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी, जलसाठ्यांचे संरक्षण आणि वीजनिर्मिती असे दुहेरी उद्दिष्ट साध्य होऊ शकते.
- नाशिकमधील महात्मानगर परिसरातील लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची दुर्घटना
- दिव्या ओमकार चव्हाण (27) यांचा उपचारादरम्यान मृत्यू
- फटाके फोडताना अचानक साडीने घेतला पेट
- आगीत दिव्या चव्हाण गंभीरपणे भाजल्या
- पती ओमकार यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात केले दाखल
- जळीत कक्षात उपचार सुरू असताना प्रकृती खालावली
- रविवारी सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित
- गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
गोकुळ दूध संघाचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत. महायुतीच्या संचालकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असून या भेटीत सहकारी संस्थासह, पशू खाद्य आणि इतर बाबतीत अनुदान देण्याबाबत मुख्यमंत्री याच्याकडे करणार मागणी.
नाशिकच्या निफाडमध्ये तापमानाचा पारा 11.5 अंश सेल्सिअसपर्यंत पडला आहे. ग्रामीण भागात थंडीची हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे. मात्र दुपारी उन्हाचा कडाका जाणवत असून रात्री थंडीने हुडहुडी भरतेय असं चित्र दिसतंय.
अमरावतीच्या डॉक्टर वैशाली भोजने यांच्या रुग्णालयातून कथित नवजात बालके विकल्याच्या प्रकरणात धक्कादायक आणि मोठा खुलासा झाला आहे. डॉक्टर वैशाली भोजने यांनी बारा वर्षात सहा बाळ दुसऱ्यांच्या स्वाधीन केले डॉक्टर भोजने यांच्या पोलीस जबाबातून मोठा खुलासा झाला असून बाळ घेणाऱ्यांकडून पालकांना पन्नास हजार ते दीड लाखांपर्यंत रक्कम घेण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींची प्रसूती करून तिचे बाळ विकल्याचा गंभीर आरोप डॉक्टर वैशाली भोजने यांच्यावर आहे. बाळ विकल्यानंतर मिळालेली रक्कम जैविक पालकांना देण्यात आली मात्र आपण रक्कम न घेतल्याचा भोजने यांचा दावा आहे. भोजने दाम्पत्याला 20 नोव्हेंबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बेळगावमध्ये 2 डिसेंबर पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषकांचे बेळगाव मध्ये महामेळावा. बेळगावमधील महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जाणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांना बेळगाव पोलिसांनी बंदी आदेश जारी केले आहेत. याच पार्श्वभूमीवर, बेळगाव इथे 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याला जाण्यापासून रोखले तर कर्नाटकच्या मंत्र्यांना महाराष्ट्रात बंदी असेल असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.
दोन प्रवाशांमधील वादातून फेकलेला चाकू लक्ष्य चुकल्याने अन्य एका प्रवाशाच्या छातीत घुसल्याची घटना रविवारी घडली. विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलमध्ये अंधेरी स्थानकातून गाडी सुटल्यानंतर हा प्रकार घडला. या या घटनेत सुरेश शर्मा (53) हे प्रवासी जखमी झाले. चाकू फेकल्याच्या आरोपावरून शिवा गायकवाड (25) याला वांद्रे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारी 12.21 वाजण्याच्या सुमारास साखळी ओढल्यामुळे वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर थांबली. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या तपासणीदरम्यान सुरेश शर्मा यांच्या छातीला दुखापत झाल्याचे आणि रक्तस्राव होत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक आर. के. शर्मा आणि उपनिरीक्षक अरुण कुमार पांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शर्मा यांच्यावर वांद्रे स्थानक व्यवस्थापकाच्या कार्यालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. आता त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली. चाकू फेकल्याचा आरोप असलेल्या शिवा गायकवाड याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वद्रि रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
लोहगडावरुन धक्का देऊन हत्या करण्यात आलेल्या केतन अग्रवाल प्रकरणी वडगाव मावळ न्यायालयात सुनावणी आहे. त्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिया गोयलच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल करत तपासातील पुराव्यांबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत. कॉल रेकॉर्ड्स आणि चॅटिंगवरून कट सिद्ध होत नसल्याचा बचाव पक्षाचा दावा आहे. यावर आता कोर्टात काय सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 17 Nov 2026: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 14 वी पुण्यतिथी असून शिवाजी पार्क येथे अनेक मान्यवर बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ अभिवादन करण्यासाठी हजेरी लावत आहेत. दुसरीकडे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात आज अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. या बातम्यांबरोबरच दिवसभरातील ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या आणि ताज्या बातम्यांच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या ठिकाणी पाहू शकता...