)
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जावे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगत धमकी देणाऱ्याने 7 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल तिलक नगरचे आप आमदार जरनैल सिंह यांना धमकीचा फोन आणि व्हॉट्सअप मेसेज आला. आमदार जरनैल सिंह यांनी मोहालीच्या एसएपी यांच्याकडे तक्रार दाखल केली. पैसे न दिल्यास अरविंद केजरीवाल आणि त्यांची मुलगी हर्षिता यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. तक्रारीच्या आधारे मोहाली पोलिसांकडून बीएनएस आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. सायबर क्राइम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुमार यांच्याकडे तपासाची जबाबदारी आहे. आरोपीच्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स, आयपी लॉग्स आणि लोकेशनची पोलीसांकडून तपासणी सुरू आहे. केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची आमदार जरनैल सिंह यांची मागणी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छटपूजेनिमित्त सुरू असलेली भोजपुरी गाणी बंद करण्यात आली आहेत. तरीदेखील, या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आज दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे. यावेळी संबंधित विषयावर अधिकृत निषेध नोंदवून रेल्वे प्रशासनाकडे संघटनेची भूमिका ठामपणे मांडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना जितेंद्र पाटील अध्यक्ष यांनी दिली आहे.
मुंबई रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मराठी राज्यात आहात भानावर या, आम्ही निषेध करतो, असं मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री महोदय कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र? महाराष्ट्राचे बिहार का करताय? मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार? मुंबई महाराष्ट्र विकायला काढला आहे का? राज्यकर्त्यांनी काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे? आता चक्क बिहारमध्ये आणून सोडले आहे आम्हाला... महाराष्ट्रात भाषिक दंगे भडकवू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका. रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावी अन्यथा तुमचे कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशाराही देशमुख यांनी दिलाय.
शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 11 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, अत्याचाराचे व्हिडिओ मोबाईलमध्ये जतन केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.
बाष्पीभवनामुळे होणारी घट दुप्पट, असे लेखापरीक्षणात दिसून आले आहे
उन्हाळा अजून काही महिने दूर असताना, मुंबईतील पिण्याच्या पाण्याचे साठे नेहमीपेक्षा अधिक वेगाने कमी होत आहेत
नोव्हेंबर महिन्यापर्यंत, शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकत्रित साठा त्यांच्या क्षमतेच्या 84.35% पर्यंत खाली आला आहे, जो 2018 मधील याच तारखेपर्यंतचा सर्वात कमी साठा आहे
बीएमसीने सातपैकी तीन तलावांची केलेल्या स्वतंत्र तपासणीत असे आढळून आले आहे की, ऑक्टोबरमधील बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान हे गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत जवळपास दुप्पट किंवा त्याहून अधिक होते
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना आता सरकारी कामासाठी 1.8 लाख रुपयांपर्यंतचा लॅपटॉप किंवा टॅबलेट खरेदी इन्फो करता येणार आहे. विशेष म्हणजे, सलग चार वर्षे वापरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला हे उपकरण स्वतःकडे ठेवता येईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने 10 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
44 तब्बल शाळा, महाविद्यालयांमधील जवळपास सहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांचे वेतन व आर्थिक लाभ थकवल्याने चर्चेत असलेल्या 'सिंहगड इन्स्टिट्यूट ने अनेकदा संधी देऊनही पुन्हा आदेशाचा भंग केला. त्यामुळे अखेर या संस्थेवर मुंबई उच्च न्यायालयाने बडगा उगारला आहे. 'शिक्षण संस्थांमधील पैशांचा अपहार करून तो अन्य व्यवसायांकडे वळवून मनी लॉड्रिंग झाल्याची शक्यता आहे', असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सर्व विश्वस्तांसह सर्व 44 शैक्षणिक संस्थांमधील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याचा अत्यंत कठोर आदेश सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाला दिला.
पाडव्याच्या सुट्टीनंतर बुधवारी शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांची मोठी दिवाळी साजरी झाली. अवघ्या काही मिनिटांत परदेशी गुंतवणूकदारांचे बाजारात पुनरागमन झाले. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली. या तेजीमुळे बाजाराने आठ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. संपूर्ण बाजार भांडवलात 4 लाख कोटींहून अधिकची वाढ होऊन ते 512.2 लाख कोटी रुपयांवर पोहचले. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1351.64 अंशांनी (1.67 टक्के) उसळून 82,458.29 वर पोहोचला, तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी 365.55 अंशांनी (1.46 टक्के) वधारून 25410.20 च्या पातळीवर व्यवहार करत होता. फार्मा क्षेत्र वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते.
वैद्यकीय शिक्षणाचा वाढत खर्च आणि अवाढव्य फीमुळे विद्यार्थ्यांनी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी पाठ फिरवली आहे. वैद्यकीय शिक्षण महागल्यामुळे देशभरात तब्बल 411 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीकडून विशेष फेरीसाठी एकूण 948 रिक्त जागांचा समावेश करण्यात आल्या होत्या. मात्र एवढ्या जागा वाढवून त्यात फक्त 537 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वापरासाठीच्या वाहनांच्या रेदीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्राधान्य दिले जावे, आणि त्यालाच 'मुख्य आणि पसंतीचा पर्याय' बनवण्याचे निर्देश अर्थमंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांना बुधवारी दिले. तसेच अशा वाहनांच्या खरेदीसाठी 20 लाख रुपयांची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
बंगळुरू आणि गोव्याला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. येसचंतपूर-मडगाव-येसवंतपूर मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. उद्घाटनानिमित्त १३ नोव्हेंबर रोजी दोन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. पहिली विशेष गाडी (06512) सर एम. विश्वेश्वरख्या टर्मिनल, बंगळुरू येथून 13 नोव्हेंबरला दुपारी 1.30 वाजता सुटून दुसन्या दिवशी पहाटे २.५५ वाजता मडगावला पोहोचेल, दुसरी विशेष गाडी (06213) मंगळुरू जंक्शनहून 13 नोव्हेंबरला दुपारी 1.30 वाजता सुटून रात्री 9 वाजता सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलला पोहोचेल. दोन्ही गाड्या 16 डब्यांच्या वंदे भारत रेकद्वारे धावतील. या सेवेमुळे उडुपी, कुंदापूर, मुरुडेश्वर, गोकर्ण आणि कारवारसह कर्नाटकच्या किनारपट्टीवरील प्रवाशांना गोव्याशी जलद रेल्वे संपर्क उपलब्ध होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
सिंहस्थ कुंभमेळयाच्च्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर परिसरातील भूकंपविषयक हालचालींचा विशेष अभ्यास करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विनंतीवरून भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) यासाठी पथक पाठवले आहे. परिसरातील सुमारे ७५० किलोमीटरच्या परिघात चार यंत्रांच्या साहाय्याने सलग तीन महिने 24 तास निरीक्षण केले जाणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येत आहेत, रस्ते, पुल, घाट, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या काव्ळवत लाखो भाविक आणि साधू- महंतांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य भूकंपविषयक धोके आणि भूगर्भातील हालचालींचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे एका विशेष संगणकीय प्रण्डलीद्वारे भूकंपविषयक हालचालींची नोंद आणि विश्लेषण करून तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती 'जीएसआय'चे महासंचालक दिनेश गणवीर यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली. यासाठी 'जीएसआय'चे पथक सध्या त्या भागात दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
|
विद्यार्थी आत्महत्येमध्ये दहा वर्षांत 62 टक्क्यांनी वाढ; 'एनसीआरबी' च्या अहवालातून धक्कादायक बाब उघड
देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनी चितेत भर घातली आहे. या प्रकरणांत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालातून समोर आले आहे. देशात वर्षभरात 14 हजार 488 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 909 घटना महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या आहेत. देशातील एकूण घटनांमध्ये महाराष्ट्राचा वाटा 13.2 टक्के आहे.
अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फायद अनुसूचित जातीच्या बाहेरच्या जातींनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही जातींच्या लोकसंख्येमध्ये अनैसर्गिक वाढ नोंदली असून अशा जातींचा स्वतंत्रपणे अभ्यास आणि लोकसंख्यावाढीची कारणमीमांसा केली पाहिजे, अशी शिफारस अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने केल्याने उपवर्गीकरणाचा प्रश्न चिघळणार आहे. उपवर्गीकरण अभ्यास समितीने 245 पानांचा अहवाल शासनाला दिला आहे. या अहवालात अनुसूचित जातीमध्ये अनेक जातींची घुसखोरी झाल्याची माहिती आहे.
कुलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट
शोधमोहीम आणि तपासणी सुरू
काल दुपारी कुलगाम येथे CRPF चौकीवर दोन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता
यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत
विधानसभा निवडणुकीपूर्वी आज आझाद समाज पक्ष आणि AIMIM च्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता
दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता
आझाद समाज पक्ष 100 आणि AIMIM 50 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती
नांदेडममध्ये रिलसाठी फटाके उडवल्याने शेतकऱ्याचा तीन एकरवरील ऊस जळाल्याची घटना समोर आली असून यामध्ये शेतकऱ्याला लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 12 Nov 2026: मुंबई, महाराष्ट्रासहीत देश तसेच विदेशातील आज दिवसभराच्या ताज्या घडामोडींचा संक्षिप्त स्वरुपातील आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेत आहोत. ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...