Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 06 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 06 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Published: Nov 06, 2026, 07:18 AM IST
| Updated: Nov 06, 2026, 08:26 AM IST
Image Credit: Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 06 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News LIVE : 06 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.
06 Nov 2026, 8:25 AM
नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण, MIM नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा
Nashik : नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण...एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा...आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा...जलील यांच्याविरोधात पुरावे असल्यानं कारवाई
06 Nov 2026, 7:45 AM
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर
राज्यातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने सण अग्रिमाची मर्यादा वाढवून २० हजार रुपये केली आहे. या निर्णयामुळे दिवाळीसह विविध दहा सणांच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.राज्याच्या वित्त विभागाने गुरुवारी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला. त्यानुसार, १ जानेवारी २००६ पासून सुधारित केलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपयांचा सण अग्रिम घेता येणार आहे.या निर्णयानुसार दिवाळी, रमजान ईद, नाताळ, पारशी नववर्ष, संवत्सरी, रोश होशनाह, बुद्ध जयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणांसाठी अग्रिम घेता येणार आहे.
06 Nov 2026, 7:25 AM
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन अखेर मागे, पुणे- बंगळुरू महामार्गावरील चक्काजाम मागे
Kolhapur : ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय... पुणे- बंगळुरू महामार्गावर 61 तासांपासून चक्काजाम आंदोलन सुरू होतं... काल कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांच्या नेतृत्वात ऊस दराबाबत बैठक पार पडली.. या बैठकीत 3 हजार 900 रुपये पहिली उचल आणि कारखाना सुरू झाल्यानंतर 100 रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला.. तसंच साखरेला 4 हजार 500 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाल्यास आणखी 200 रुपये देण्याची तयारी दर्शवली... रात्री उशिरा याबाबत निर्णय घेण्यात आला असून राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय... राजू शेट्टी यांची ऊसाल 4 हजार 200 रुपय दर देण्याची मागणी होती... अखेर काल पार पडलेल्या बैठकी तोडगा निघाला असून 3900+100+200 रुपयांचा फॉर्म्युला मान्य करण्यात आला....
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.