SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एकही वाहन जागचे हलेना, आई बाळाला कुशीत घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावत निघाली; अलिबागमधील मन हेलावून टाकणारी घटना

वाहतूक कोंडीत अडकून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगडच्या अलिबागमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 18, 2026, 15:48 IST | Updated: Nov 18, 2026, 15:51 IST
Join

अलिबाग :  वाहतूक कोंडीत अडकून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रायगडच्या अलिबागमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. फक्त  35 मिनिटांच्या प्रवासासाठी 4 तास लागले. या चिमुरड्याचे आई वडिल वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका पुढे जावी यासाठी आक्रोश करत होते. मात्र, रुग्णवाहिकेला वाहनांच्या प्रचंड गर्दीतून पुढे जाताच आले नाही.  

अलिबाग रोहा मार्गावर वाहतूक कोंडीत झालेल्या चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणी आता स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका या चिमुकल्याला बसला आहे.  एक निप्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. आई वडिलावंर दुख:चा डोंगर कोसळला आहे. 

आरांश ठाकूर असे मृत मुलाचे नाव आहे. आरांश फक्त 18 महिन्यांचा आहे.  फुगा गिळल्यामुळे आरांशची प्रकृती बिघडली. या 18 महिन्याच्या बाळाला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होते. परंतु वाहतूक कोंडीमुळे तो रुग्णालयात पोहोचू शकला नाही आणि भर रस्त्यातच त्याला निघालेला मृत्यूने गाठले. या दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मृत आरांश हा अलिबाग तालुक्यातील बामणगाव येथे राहणारे  सुशील ठाकूर यांचा मुलगा आहे. 17 नोव्हेंबरला दुपारी अंगणार खेळत असताना आरांशने फुगा गिळला.  फुगा थेट त्याच्या घशात अडकला. आरांशचा श्वास गुदमरला. मुलाची गंभीर अवस्था पाहून घाबरलेल्या पालकांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि त्यासा अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला.

तात्काळ रुगण्वाहिका घराबाहेर दाखल झाली. आरांशच्या घरापासून ग्रामीण रुग्णालय फक्त 35 मिनिटांवर आहे. मात्र, याच 35 मिनिटांच्या प्रवासासाठी 4 तास लागले. अलिबाग दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भीषण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका पूर्णपणे अडकली होती. रुग्णवाहिकेचा सायरन सतत मोठमोठ्याने वाजत होता. पण, वाहनांची इतकी गर्दी होती रुग्णावाहिकेला पुढे जाण्यासाठी जागाच मिळत नव्हती. आरांशचे आईवडिल रस्त्यावर उतरुन वाहनांना रस्ता देण्याचे विनंती करत होते. अखेरीस रुग्णालयात पोहचण्याआधी वाटेतच आरांशचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येथे कोणतीही यंत्रणा  नाही. वाहनांना बाजूला सरकण्यास जागा नसल्याने रुग्णवाहिका जागची हलू शकली नाही. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आरांशचा मृत्यू झाल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे.  बालकाच्या मृत्यू प्रकरणी स्थानिक आक्रमक झाले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आईची प्रतिक्रिया मन हेलावून टाकणारी

या घटनेनंतर आरांशच्या आईने सगळा घटनाक्रम सांगितला. आरांशची आई त्याला आपल्या गाडीवर घेऊन डॉक्टरकडे निघाली. रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे पुढे जाताच येत नव्हते. अखेर बाळाला घेऊन ती माऊली गाडी तिथंच टाकून ती अलीबागच्या दिशेने धावू लागली.त्यात देखील खूप अडथळे येत होते. अखेर एका ओळखीच्या व्यक्तीने तिला आपल्या गाडीवर घेऊन दवाखान्या पर्यंत नेले. परंतु तो पर्यंत उशीर झाला होता. अखेर वाहतूक कोंडीमुळे आरांश याला आपला जीव गमवावा लागला. हा प्रश्न केवळ आमचाच नाही इतर कुणाच्याही बाबतीत असा प्रकार घडू शकतो, प्रशासनाने यावर वेळीच उपाय योजना करायला हवी अशी अपेक्षा आरांश याचे वडील सुशील ठाकूर यांनी व्यक्त केली.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES