SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एकनाथ शिंदे यांचे नाव घेत असिम सरोदे यांचा अत्यंत खळबळजनक दावा; शिवसेना सत्तासंघर्षाच्या सुनावणीत धक्कादायक ट्विस्ट

एकनाथ शिंदे यांचे नाव घेत असिम सरोदे यांचा अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. शिंदेंच्या वकिलांचे आरोप असीम सरोदे यांनी फेटाळले आहेत. शिवसेना सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत देखील असीम सरोदे यांनी दिले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 18, 2026, 20:32 IST | Updated: Nov 18, 2026, 20:37 IST
Join

असीम सरोदे :  शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंचे वकील धृव मेहता यांनी बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद केला.  ठाकरेंनी दिलेल्या पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप शिंदेंच्या वकिलांनी केला.  एकनाथ शिंदे यांच्या वतीने बाजू मांडताना वकिल ध्रुव मेहता यांनी जो युक्तीवाद केला तेव्हा जी  माहिती दिली  ती दिशाभूल करणारी असल्याचा खळबळजनक आरोप वकिल असीम सरोदे यांनी केला. या आरोपांमुळे शिवसेना सत्तासंघर्षाच्या सुनावणीत धक्कादायक ट्विस्ट येणरा आहे.  शिवसेना सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी होत असताना राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचेही असीम सरोदे म्हणाले. 

शिंदे गटाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद कायदेशीर चौकटी मध्ये न बसणार आहे. पक्षातील मतभिन्नता म्हणजे पक्षांतर नव्हे असं सांगण्याचा प्रयत्न मेहता यांनी केला आहे. प्रत्यक्ष अपात्र करण्यासाठी योग्य कारण नाहीत अस सांगण्याचा ही प्रयत्न झाला. ही सुधा दिशा भुल करणारी माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि फुटीर आमदार यांनी पक्षांतर केलंच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून या सर्वांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. पक्षाच्या आदेशाच्या विरोधात त्यांनी क्रॉस वोटिंग केलं. याच क्षणी त्यांनी पक्ष विरोधी कारवाई केली आहे त्यामुळे इथेच ते अपात्र ठरतात. त्यामुळे ध्रुव मेहता खूप नंतरचे मुद्दे मांडत आहेत. उध्दव ठाकरे हे पक्षाचे संचालक आणि प्रमुख होते हे कोणीच अमान्य करू शकत नाही असं असीम सरोदे म्हणाले. 

विधान परिषद निवडणुकीत पक्षादेश डावलून केलेल्या क्रॉस वोटिंग मुळेच एकनाथ शिंदे सह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी पक्ष सोडला हे स्पष्ट आहे. नार्वेकर यांना उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटीला पाठवलं याचा अर्थ ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते समिट घडू इच्छित आहेत. पक्ष विरोधी कारवाई केली म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी आपला फोन बंद करून ठेवला होता.  स्वतः गेल्यानंतर काही आमदारांना आमिष दाखवून तिथं बोलावलं गेलं हा राजकीय भ्रष्टाचाराचा भाग आहे. संवाद साधण्यासाठी काही जणांना पाठवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

21  जून 2022 रोजी विधिमंडळ पक्षाची जी बैठक बोलावली होती त्याबद्दल देखील आक्षेप  अविश्वास ध्रुव मेहता यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षातून निलंबित केल्याचा जो ठराव केला होता त्यावर संजय राठोड उदय सामंत आणि दादा भुसे या महत्त्वाच्या नेत्यांच्या सह्या आहेत. 

राहुल नार्वेकरांनी या तिघांची साक्षर घेतली नाही असं ध्रुव मेहता यांचं म्हणणं आहे. हे प्रकरण सुरू असताना या तिघांपैकी एकाने सह्या केल्या असल्याचं अमान्य केलं नाही. या तिघांनाही मान्य आहे की या सह्या आपल्याच आहेत. याचाही उल्लेख या क्षणी न्यायालयात करणे पुरेस नाही.  एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी कोणताही वेगळा गट स्थापन केला नाही किंवा दुसऱ्या पक्षात गेले नाहीत.  

राजकीय दरोडेखोरी 

निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं.  एक राजकीय दरोडेखोरी महाराष्ट्रात झाली. यात दरोडेखोराची भूमिका एकनाथ शिंदेंनी बजावली आहे.  एकनाथ शिंदे आणि त्याच्यासोबत गेलेले आमदारांचा कार्यकाळ संपला असला तरी पक्षांतर बंदीच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. संविधान हे अकॅडमी आहे असं फक्त वकिलांना वाटत असेल तर हा दुःखद भाग आहे.

ध्रुव मेहता यांनी आज मांडलेले सगळे मुद्दे खोडून काढता येण्यासारखे आहेत. मेहता यांचे  मुद्दे तदन आणि खोडून काढता येण्यासारखे आहेत. संविधानाच्या बाजूने संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाही वाचवण्यासाठी निर्णय द्यायचा असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागेल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES