• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'भोजपुरी गाणं वाजलं तर वाईट काय?', मुंबईत वातावरण तापलं असताना भाजप नेत्याची प्रतिक्रिया

'भोजपुरी गाणं वाजलं तर वाईट काय?', मुंबईत वातावरण तापलं असताना भाजप नेत्याची प्रतिक्रिया

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर छटपूजेची गाणी वाजली आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आधीच गिरगाव चौपटी सारख्या ठिकाणांवर छटपुजेला विरोध होत असताना आता भोजपुरी गाणी वाजल्याने विरोधी पक्षांकडून टीका होतेय.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 12, 2026, 15:14 IST|Updated: Nov 12, 2026, 16:45 IST
joinshare
'भोजपुरी गाणं वाजलं तर वाईट काय?', मुंबईत वातावरण तापलं असताना भाजप नेत्याची प्रतिक्रिया
Image Credit: भोजपुरी गाणी

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

'70 वर्षापासून राहणारी मराठी माणसं घराबाहेर', एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीला फोन; प्रभादेवीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा

2

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

3

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

4

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

5

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर थेट छटपूजेची गाणी वाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंबईत हार्बर मार्गावरील वडाळा, सानपाडा यासह मध्य रेल्वेच्या आंबिवली स्टेशनवर उद्घोषणा थांबवून छटपूजेची गाणी मोठ्या आवाजात वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यावरुन आता मुंबईतील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. ठाकरेंची शिवसेना, मराठी एकीकरण समितीने केलीय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलंय नेमकं?

रेल्वे स्टेशनवर गाड्यांचं आगमन आणि प्रस्थान तसंच वेळापत्रकातील बदल आणि आपत्कालीन सूचना देण्यासाठी उद्घोषणा केल्या जातात. त्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्म तसंच रेल्वे ब्रिजवर स्पीकर लावण्यात आलेत. मात्र, बुधवारी रेल्वेच्या अनेक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठीच्या नियमित उद्घोषणा बंद करून त्याऐवजी चक्क मोठ्या आवाजात छटपूजेची गाणी वाजवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. रेल्वेच्या या मनमानी कारभाराविरोधात मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने आक्षेप घेतलाय. दरम्यान भाजपकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली.


काय म्हणाले अतुल लोंढे? 

भोजपुरी गाण वाजत असेल तर वाईट काय? असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारलाय.  एखाद्या प्लेटफॉर्म वर जर मराठी गान वाजले तर चांगली गोष्ट आहे, भोजपुरी गाण वाजत असेल तर त्यात वाईट काय? असे अतूल लोंढे म्हणाले आहेत. भोजपुरी ही चांगली भाषा आहे, यात राजकारण काय करायचे, असा प्रतिप्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला.

संजय राऊतांची टीका 

भोजपुरी गाण्यांवरुन खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केलीये. प्लॅटफॉर्मवर जय महाराष्ट्र लावणार नाही मात्र ही भोजपुरी गाणी नियमात बसतात का असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय. सण साजरे करताना मराठी अस्मितेला धक्का लागू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केलीये.. 'महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा  प्रयत्न करु  नका असा इशाराही राऊतांनी दिलाय.

किशोरी पेडणेकरांनी सुनावलं 

भोजपुरी गाण्यांवरुन किशोरी पेडणेकरांनीही सरकारला सुनावलंय. 'महाराष्ट्रात असले फाजील लाड कशाला?','यूपी, बिहारमध्ये महाराष्ट्र गीत लावलं जाईल का?' असा प्रश्न किशोरी पेडणेकरांनी विचारला. 'मराठीचा अभिजात दर्जा घालवण्याचा प्रयत्न असल्याची टीका किशोरी पेडणेकरांनी सरकारवर केलीय.

गोवर्धन देशमुखांची टीका 

शहरातील सर्वच चौपाट्या, तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून परवानग्या नको,सार्वजनिक पर्यटन ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय थांबवा
बिहारचा हा उत्सव खाजगी ठिकाणी साजरा करावा पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे. मुंबई रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मराठी राज्यात आहात भानावर या, आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री महोदय कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र? महाराष्ट्राचे बिहार का करताय? मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार? मुंबई महाराष्ट्र विकायला काढला आहे का? असा प्रश्न गोवर्धन देशमुखांनी विचारलाय. राज्यकर्त्यांनी काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे आता चक्क बिहारमध्ये आणून सोडले आहे आम्हाला.महाराष्ट्रात भाषिक दंगे भडकवू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका.रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावी अन्यथा तुमचे कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Mumbai
Mumbai News
Mumbai Local