सुनेत्रा पवारांसोबत 2 तास चर्चा; शरद पवारांचा पाठिंबा आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन तासांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासोबत काय चर्चा झाली यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जळपास दोन तास चर्चा झाली. विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. मात्र या भेटीत विलिनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
सुनेत्राताई शासकीय कामकाजनिमित्तमाझ्याकडे आल्या होत्या, आमच्या चर्चेत कुठेही विलीनीकरणाची चर्चा नव्हती, मी पुन्हा एकदा सांगतो, विलनीकरण संदर्भात काही चर्चा असते तर त्यांनी आमच्याशी चर्चा केलीच असती, कारण आम्ही सत्तेत आहोत.
सध्या विलनीकरणाची कुठलीही चर्चा नाही, त्यांनी विलोनीकरणाची चर्चा सुरू केली असती तर त्यांनी असं सांगितलं असतं की विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे, या चर्चा केवळ मीडियात ऐकायला मिळत आहे. प्रत्यक्षात अशा पद्धतीने आम्हाला कोणीही असं सांगितलं नाही म्हणून त्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही , आजच्या चर्चेत विलीनीकरणाची कुठलीही चर्चा नव्हती असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
डी लिमिटेशन साठी शरद पवार पक्षाच्या खासदारांची गरज आहे का?
डी लिमिटेशन साठी शरद पवार पक्षाच्या खासदारांची गरज आहे का? प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, सुप्रियाताईंची प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल तर त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की डीलिमिटेशन बीलाला आमची मान्यता आहे, 50 टक्के फ्लॅट सीटा वाढवून...मागच्या वेळेस जे बिल आलं होतं तशा पद्धतीचा बिल आलं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष हा पूर्ण समर्थन देईल अस सुप्रियाताईंनी सांगितल, त्यामुळे ज्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि पतंगबाजी सुरू आहेत ते पतंगबाजी बंद झाली पाहिजे.
राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वाढत्या गाठीभेटी, चर्चा, आणि घडणाऱ्या घडामोडींबाबत आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. जशी वेळ येईल तशा गोष़्टी कळतील असं सूचक वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केलंय. विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलंय. या एका वाक्यातील उत्तरानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना बळ मिळाल्याचं बोललं जातंय.