• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /फडणवीसांची रोखठोक भूमिका, थेट दिल्लीला पाठवलं पत्र! संजय राऊतही खूश होऊन म्हणाले, 'मी त्यांचे अभिनंदन...'

फडणवीसांची रोखठोक भूमिका, थेट दिल्लीला पाठवलं पत्र! संजय राऊतही खूश होऊन म्हणाले, 'मी त्यांचे अभिनंदन...'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दिल्लीला पत्र पाठवून यासंदर्भातील आपली भूमिका अगदी स्पष्ट शब्दांमध्ये मांडल्यानंतर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. नेमका हा प्रकार काय जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 12, 2026, 11:16 IST|Updated: Nov 12, 2026, 11:24 IST
joinshare
फडणवीसांची रोखठोक भूमिका, थेट दिल्लीला पाठवलं पत्र! संजय राऊतही खूश होऊन म्हणाले, 'मी त्यांचे अभिनंदन...'
Image Credit: फडणवीसांचं अभिनंदन करतो असंही म्हणाले (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई विमानतळावरील वाहतूक नवी मुंबई विमानतळावर हलवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. तसं पत्रच त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला लिहिलं आहे. मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित करू नये अशी ठाम भूमिका घेतली आहे. मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळे स्वतंत्रपणे व पूर्ण क्षमतेने कार्यरत राहावीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावरुनच आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. 

अभिनंदन करतो

"या भूमिकेसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ अत्यंत अनावश्यक आहे. त्याची उभारणी अंतरराष्ट्रीय स्तरावरची नाही. मुंबईचे विमानतळ तिकडे नेणं हे अशोभनीय आहे. राजधानीत मुख्य विमानतळ असले पाहिजे. कोणाचा तरी जमिनीवर डोळा आहे. ती जमीन पाहिजे यासाठी करत असेल तर योग्य नाही. फडणवीस यांना हे कळत आहे बहुतेक. गल्फ आणि युरोपमधील कंपन्यांनी नवी मुंबई विमान तळावर लँडिंग करण्यासाठी नकार दिला आहे. कारण तिकडे धोका आहे असे त्यांचे मत आहे. इथे पर्यावरणाचा ऱ्हास झाला मग हा कोणाच्या मूर्खपणामुळे हा ऱ्हास झाला? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मी दमलो

"मुंबईच्या विमानतळाबाबत आपल्याला सुधारणा करता येऊ शकते. झोपड्यांचे पुनर्वसन करता येईल. मी नवी मुंबई विमानतळावरून जाण्याचा प्रयत्न केला, मी दमलो. जे वातावरण आणि उत्साह लागतो तो तिकडे दिसत नाही. डोमेस्टिकसुद्धा तिकडे उतरायला नको. त्यांच्यासुद्धा जीवाचा प्रश्न आहे.  तिथे भूमिगत मेट्रो पाहिजे जे अनेक देशात आहे. भूमिगत मेट्रो असेल तर त्याने तिथे पोहोचता येईल. अजून बसेस आणि टॅक्सीचे व्यवस्था पाहिजे. कंटेनरच्यामधून मार्ग काढत जावे लागत," असं राऊत म्हणाले.

अदानी हे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत

"महाराष्ट्रासाठी हे विमानतळ अडचणीचे आहे. परदेशी लोकांसाठी हे सोयीचे नाही. मुंबईच्या विमानतळाला पर्याय नाही हे मुख्यमंत्री यांना समजले त्यावर ते बोलले. अदानी हे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत किंवा देशाचे पंतप्रधान नाहीत. आम्हाला महाराष्ट्र इंटरेस्ट उद्योग जपला पाहिजे. गुंतवणूकदरांचा इंटरेस्ट जपायचा आहे.  नवी मुंबई विमानतळ हे कोणाला सोयीचे ठरत नाही," असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी विरोध का केला?

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 आंतरराष्ट्रीय शहरांची उड्डाणे नवी मुंबईत हलवण्याचा प्रस्ताव विमानतळ प्रशासनाकडून विचाराधीन होता. प्रवाशांची गैरसोय आणि विदेशी विमान कंपन्यांचा विरोध लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी याला विरोध केला आहे. दोहा, जेद्दा, रियाध, मस्कत, कुवेत, काठमांडू, बहरीनमधील उड्डाणे नवी मुंबईला वळवण्याचा प्रस्ताव होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sanjay Raut
Devendra Fadnavis
Navi Mumbai