• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या पक्षात पहिला राजीनामा! 'सोयीनुसार वारंवार...', 'कार्यकर्त्यांनी जनतेसमोर...', 'कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर...'; खरमरीत पत्र लिहित सोडलं पद

'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या पक्षात पहिला राजीनामा! 'सोयीनुसार वारंवार...', 'कार्यकर्त्यांनी जनतेसमोर...', 'कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर...'; खरमरीत पत्र लिहित सोडलं पद

"सोयीनुसार वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे पक्षाची मूळ विचारधारा आणि पुरोगामी प्रतिमा कलंकित होत असल्याची खंत मला आहे. सत्तेच्या सोयीसाठी वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि त्यातून कार्यकर्त्यांच्या भावनांचा होणारा अनादर याचा मी जाहीर निषेध करतो," असा उल्लेख पत्रात आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 28, 2026, 13:27 IST|Updated: Nov 28, 2026, 14:08 IST
joinshare
'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांच्या पक्षात पहिला राजीनामा! 'सोयीनुसार वारंवार...', 'कार्यकर्त्यांनी जनतेसमोर...', 'कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर...'; खरमरीत पत्र लिहित सोडलं पद
Image Credit: शरद पवारांनाही पाठवली राजीनाम्याची प्रत (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

2

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

3

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

4

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

5

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

डिलिमिटेशनच्या बिलावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची सूत्रांची माहिती आहे. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं काही आमदार, खासदार नाराज असल्याचं वृत्त आहे. डिलिमिटेशन बिलावरून पक्षाच्या गूढ भूमिकेमुळे नेत्यांमध्ये खदखद असतानाच आता याच मुद्द्यावरुन पक्षात पहिला राजीनामा पडला आहे. आधीच विलनीकरणाच्या चर्चेनं पक्षात संभ्रमाचं वातावरण असतानाच आता डिलिमिटेशन बिलावरुनही पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा असतानाच पक्षाच्या महत्त्वाच्या विभागातील प्रमुखाने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. डिलिमिटेशन बिलासंदर्भातील पक्षाची भूमिका पटली नसल्याने पद सोडत असल्याचं या पदाधिकाऱ्याने म्हटलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहसीन शेख यांना हे राजीनामा पत्र लिहिलेलं आहे. प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देण्याबाबत हे पत्र असल्याचं विषयामध्ये नमूद केलं आहे. डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाने पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी हा राजीनामा दिल्याचे पत्रात म्हटले आहे.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेशी हा निर्णय विसंगत असल्याचे खावकर यांनी पत्रात नमूद केले आहे. भाजपच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर कोणती भूमिका मांडावी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पुरोगामी विचारांशी तडजोड करणार नाही, असे सांगत त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती केली आहे. 

खामकर यांचं पत्र वाचूयात जसच्या तसं...

महोदय,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलमध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करताना पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आणि पुरोगामी विचारांचा प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला.

मात्र, आज पक्षाने डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या मुद्द्यावर भाजपाला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासारख्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारेचा पाईक असलेल्या कार्यकर्त्याच्या मनाला अजिबात पटणारा नाही.

पक्षाच्या निर्णयांशी मतभेद असू शकतात; परंतु विचारधारेशी तडजोड कशी करायची? सत्तेच्या सोयीसाठी वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिका आणि त्यातून कार्यकर्त्यांच्या भावनांचा होणारा अनादर याचा मी जाहीर निषेध करतो.

आज प्रश्न केवळ एका विधेयकाला पाठिंबा देण्याचा नाही, तर पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा आहे. भाजपाच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर कोणती भूमिका मांडायची? कालपर्यंत ज्या विचारसरणीविरोधात आपण लढत होतो, त्याच विचारसरणीला आज पाठिंबा देण्यामागची वैचारिक भूमिका काय आहे?

सोयीनुसार वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे पक्षाची मूळ विचारधारा आणि पुरोगामी प्रतिमा कलंकित होत असल्याची खंत मला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला दिलेला पाठिंबा हा सरकारच्या व्यापक राजकीय भूमिकेला आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांनाही मूक संमती देण्याचा मार्ग ठरू नये, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. माझ्यासाठी पदापेक्षा विचार महत्त्वाचे आहेत, सत्तेपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि राजकीय निष्ठेपेक्षा संविधाननिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे माझ्या पुरोगामी विचारांशी कोणतीही तडजोड करणे मला मान्य नाही.

याच वैचारिक भूमिकेतून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मीडिया सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा.

यापुढे पक्षाने सत्ताधारी भाजपाच्या निर्णयांचे समर्थन करण्यात धन्यता मानावी की पुरोगामी विचारांची कास धरावी, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, माझा लढा पदासाठी नव्हता आणि यापुढेही नसेल.

हा देश, हे संविधान आणि या देशातील लोकशाही वाचली पाहिजे, यासाठी मी पदावर असो वा नसो, पुरोगामी विचारांच्या बाजूने लढत राहणार आहे. आपणास पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा।

या पत्राची एक प्रत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांना पाठवल्याचं पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेच्या फ्लोअवर आमची काय भूमिका आहे हे स्पष्ट होईल असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे सोमवारी पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sharad Pawar
Rohit Pawar
Maharashtra Politics
Indian Politics