• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /तुम्ही मुख्यमंत्री कसे झालात? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना जाहीर सभेत सवाल, 2019 चा राजकीय भूकंप

तुम्ही मुख्यमंत्री कसे झालात? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना जाहीर सभेत सवाल, 2019 चा राजकीय भूकंप

देशभरात निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरु आहेत. यावरुनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासब विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 20, 2026, 09:14 PM IST|Updated: Oct 20, 2026, 09:16 PM IST
joinshare
तुम्ही मुख्यमंत्री कसे झालात? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना जाहीर सभेत सवाल, 2019 चा राजकीय भूकंप

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Eknath Shinde Shivsena dasara melava 2026 : निवडणुक आयोगाविरोधात देशभरात रान पेटले आहे. इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात ठाकरेंनी देखील मोठे आंदोलन छेडले आहे.  इंडिया आघाडी 10 तोंडाचा रावण असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. वोट चोरीची टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत 2019 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री कसे बनलता असा प्रश्न उपस्थित केला. ती व्होट चोरी नव्हती तर दरोडा होता अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

राहुल गांधी कोर्टावर मोर्चा काढतात. भारताच्या इतिहासाच असं कधीच झाल नाही. हा संविधानाचा अपमान आहे.  देश तोडायच काम सुरु आहे.  इंडिया आघाडी 10 तोंडाचा रावण आहे असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केले.

मोर्चे काढून म्हणतात निवडणूक आयुक्तांच्या निववडणुका झाल्या पाहिजेत. उद्या म्हणतील सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या निवडणूका झाल्या पाहिजेत. उद्या म्हणतील महापालिका आयुक्तांच्या निवडणूका झाल्या पाहिजेत. तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुम्ही कुठून निवडून आलात. तुम्ही कुठं निवडून आलात.  मागच्या दाराने आलात आणि मुख्यमंत्री झालात. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालात. 2019 मध्ये खरी व्होट चोरी झाली. मतदारांनी शिवसेना भाजपला मतदान केले.तुम्ही महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली  आणि तुम्ही मुख्यमंत्री झालात. ही  व्होट चोरी नव्हती तर हा दरोडा होता असं म्हणत एकनाथ शिंदें यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 

विरोधक तरुणाईचा वापर करत आहे. हा तरुणाईचा देश आहे, भविष्य बघीतल पाहीजे.  मोदी तरुणांकडे पाहत आहेत. देश पुढे चालल आहे, राज्या पुढे चालल आहे,  यांना बघवत नाही  
कोणीही सरकार पाडू शकत नाही.  दिल्लीत आंदोलन सुरु करत आहेत, देशात सगळीकडे आंदोल सुरु केली. ही आणीबाणी नाही. फेक नरेटिव्ह पसरवत आहे. संविधान खतरे में नही. तुमच्या भूल थापांना राज्य बळी पडणार नाही. तुम्ही वोट चोरी करुन जिंकला आहेत का?  संस्थेना बदनाम करण्याच काम सुरु आहे.   EVM खराब आहेत तर तुमचे खासदार कसे जिंकले असा सावाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.  

मेळाव्याला येण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

मेळाव्याला येण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या.  गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे नुकसान झालं. गुर ढोर वाहून गेली. पिकांसाचा नाशा झाला. शेतकऱ्यांच्या बांधावर सगळे मंत्रिमंडळ गेले.  शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्यासाठी मदत केली.  एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. संपूर्ण शिवसेना पाठीशी राहील  शेतकऱ्यांना दिवाळीत मदत देण्याचे काम करू.  आरोपांना उत्तर देणार नाही, कामातून काम करू. केवळ भाषण देत नाहीत, शेतकरयांना राशन देणारे आहोत.

मुख्यमंत्री असताना एनडीआरएफचे निकष डावलून शेतकऱ्यांना मदत केली.  तुम्ही मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल  ठाकरेंना केला.  मी मुख्यमंत्री असताना, शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळाले. दिल्लीला गेलो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो, शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव मांडला.  केंद्रीय मंत्री अमित शहा यांना देखील भेटलो त्यांनाही माहिती दिली.  मुख्यमंत्र्यांनी देखील वस्तुस्थिती सांगितली. चिंता करू नका शेतकऱ्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत असं आश्वासन पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी दिले. 

शेतकऱ्यांच्या दुःखाचे राजकारण करता?  कुठे फेडणार हे पाप? 

शेतकऱ्यांच्या दुःखाचे राजकारण करता?  कुठे फेडणार हे पाप? असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. 
शेतकऱ्यांची पिकं करपून गेली असताना येथे मोर्चे काढत आहेत.  वोटचोरीचा आरोप करत आहेत. सरकारने किती मदत केली हे बघा. केवळ आरोप करू नका.  देश जाळण्याच्या गोष्टी करू नका. हा बांगलादेश नाही, श्रीलंका नाही, हा हिंदुस्थान आहे असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Eknath Shinde
Uddhav Thackeray
Maharashtra Politics
Political News
Maharashtra News