मुंबई क्राईम : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर मुंबईत गोळीबार झाला आहे. जुहू परिसरात 3 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये टायगर श्रॉफ सुखरुप आहे, मात्र टायगरच्या चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून टायगर श्रॉफ यांच्याशी संवाद साधला. आम्ही सगळे सोबत आहोत, आरोपींना लवकर शोधून काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनीा दिले. कलाकारांनी घाबरून जाऊन नये. त्यांचाही सुरक्षेचा आढावा घेणार अशली ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाची सुरक्षा ही सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे, असे सांगत मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, टायगर श्रॉफवरील फायरिंगची घटना अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. या घटनेची मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. फायरिंग करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढले जाईल आणि कायद्याच्या चौकटीत त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, घटनेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी टायगर श्रॉफ यांच्याशी तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशीही संवाद साधला. दोघांनाही चिंता करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
मुंबईने नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर गँगवॉरचा काळ अनुभवला आहे. त्यावेळी मुंबई पोलिसांनी गँगवॉरचा बंदोबस्त करून कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आणली. आता पुन्हा कोणी मुंबईत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्याच पद्धतीने कठोरपणे रोखले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
मुंबई सुरक्षित ठेवणे आणि मुंबईकरांच्या मनातील सुरक्षिततेची भावना कायम ठेवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. गँग कोणतीही असो, व्यक्ती कोणतीही असो; दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकार आणि मुंबई पोलीस सोडणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सेलिब्रिटींच्या सुरक्षेबाबतही आवश्यक ती काळजी घेतली जाईल. मात्र सुरक्षा ही केवळ प्रसिद्ध व्यक्तींपुरती मर्यादित नसून मुंबईतील प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे धमकी, दहशत किंवा दादागिरीच्या माध्यमातून कोणालाही घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्याला पोलिसांकडून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दोषींची गय केली जाणार नाही; मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा इशारा
दोषींची गय केली जाणार नाही असा इशारा मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मारेकऱ्यांना दिला आहे. टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुर्दैवी आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी मंत्री लोढांनी केली चर्चा याप्रकरणातील आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. दोषींना सोडणार नसून त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल.
"बिश्नोई टोळी असो किंवा अनमोल बिश्नोईसह इतर कोणीही असो, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मी आणि माझ्या कुटुंबाने अनमोल बिश्नोईला भारतात परत आणण्यासाठी अमेरिकन सरकारला विनंती केली आहे. असे असूनही, मुंबई पोलिसांना त्याची चौकशी करण्याची संधीही मिळालेली नाही. लॉरेन्स बिश्नोईबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या गुजरातमधील तुरुंगात आहे, असे मला वाटते. आम्ही त्याच्याही चौकशीसाठी जोरदार आग्रह धरत आहोत. जर माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दावा केला जात असेल, तर यामागील सूत्रधार कोण होता हे उघड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर मुंबईत अभिनेते, राजकारणी आणि व्यावसायिक सुरक्षित नसतील, तर सामान्य जनता कशी सुरक्षित असेल?... गेल्या दोन महिन्यांत मला चार धमक्या आल्या आहेत, तरीही माझी सुरक्षा वाढवण्यात आलेली नाही. सुरक्षा वाढवण्याचा विचार करण्यापूर्वी सरकार झीशान सिद्दीकीवर गोळीबार होण्याची वाट पाहत आहे का? ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि माझ्या मते सरकारने शक्य तितक्या कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत.
महाराष्ट्रात महायुती सरकारने जंगलराज निर्माण केले आहे! मुंबईसारख्या महानगरात अभिनेता टायगर श्रॉफवर भररस्त्यात गोळीबार होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही आणि पोलीस प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण राहिलेले नाही.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. गुन्हेगारांना मोकळे रान आणि जनतेला दहशतीच्या छायेत ठेवणाऱ्या फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर गोळीबाराची घटना घडली. सुदैवाने, ते सुखरूप बचावले.. जर गोळीबाराच्या घटनांमध्ये कलाकार आणि उच्चपदस्थ राजकारण्यांना लक्ष्य केले जात असेल, तर सामान्य माणसाचे काय होईल? मी सध्या जिथे आहे त्या बारामती भागाकडे पाहा, जिथे नुकतीच गोळीबाराची घटना घडली आहे. यावरून हे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षणीयरीत्या खालावली आहे. गृह विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. कदाचित ते राजकारणात इतके व्यस्त आहेत की त्यांना गृह विभागावर लक्ष केंद्रित करायला वेळच मिळत नाही. मी त्यांना विनंती करतो की ही जबाबदारी दुसऱ्या आमदाराकडे सोपवावी, जेणेकरून महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षित वाटेल.
विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी, पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा सरकार आणि पोलिसांच्या प्राधान्यक्रमांत पूर्णपणे गोंधळ असतो, तेव्हा असेच घडते.
टायगर श्रॉफ गोळीबारवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका
टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर आता विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने श्रॉफ यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विरोधी काँग्रेस पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली असून मुंबईसारख्या संवेदनशील शहरात अशा पद्धतीने लॉरेन्स बिश्नोई गॅंगचे साम्राज्य निर्माण होणे म्हणजे सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे. या साम्राज्या मागे सरकारच आहे काय असा सवाल त्यांनी केला आहे
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत आदिती तटकरे यांनी खंत व्यक्त करत टायगर श्रॉफ हे सुरक्षित असावेत, अशी भावना व्यक्त केली आहे. एका कलावंत अशाप्रकारे हल्ला होणार आहे अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत सखोल चौकशी केली जाईल.