SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'कोऱ्या कागदावर सही घेऊन...', शिंदेंचा ठाकरेंवर खळबळजनक आरोप; सुप्रीम कोर्टातील सुनावणीला नवं वळण?, 'चार आमदारांच्या नावे...'

सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदेंच्या वकिलांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 17, 2026, 17:55 IST | Updated: Nov 17, 2026, 18:04 IST
Image Credit: शिंदेंचा ठाकरेंवर खळबळजनक आरोप
Join

सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदेंच्या वकिलांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. 21 जूनच्या बैठकीत हजर नसतानाही दोन व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या त्यात करण्यात आल्या असा आरोप एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे ध्रुव मेहता यांनी केला आहे. 22 जून रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये 21 जूनच्या बैठकीचा कोणताही उल्लेख नव्हता. 21 जूनच्या बैठकीत कुठलाही ठराव पारित झाला नाही असही त्यांनी सांगितलं आहे.

21 जूनला ठराव मंजूर झालाच नाही

एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यासाठी ज्या ठरावाचा आधार घेण्यात आला, तो ठराव 21 जून रोजी मंजूर झालाच नव्हता. साक्षीदारांच्या उलटतपासणीत ही बाब निर्णायकपणे स्पष्ट झाल्याचा मेहता यांचा युक्तिवाद आहे.

21 जून रोजी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या उपस्थिती नोंदवहीची खरी प्रत असल्याचा दावा सुनावणी सुरू होईपर्यंत करण्यात आला होता. मात्र, सुनील प्रभू यांच्या उलटतपासणीदरम्यान मूळ दस्तऐवज सादर करण्यात आला, तेव्हा तो प्रत्यक्षात लूज शीट्सचा संच असल्याचे उघड झाले. तो नियमित उपस्थिती नोंदवहीचा भाग नव्हता. या प्रतीमध्ये आणि मूळ दस्तऐवजात विसंगती आहे. तसेच, मूळ दस्तऐवज आणि याचिकेसोबत सादर केलेली प्रत यांची तुलना केल्यास आणखी एक महत्त्वाची तफावत दिसून येते. 21 जूनच्या तारखेची नोंद मूळ दस्तऐवजात विधानसभा अध्यक्षांसमोर सादर केलेल्या कागदपत्रांपेक्षा वेगळी आहे असा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा - '21 जूनला 12.31 वाजता...'; एकनाथ शिंदेंनी सुप्रीम कोर्टात थेट WhatsApp मेसेजच दाखवले; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, 'त्या बैठकीत...'

याचिकाकर्त्यांनी सादर केलेले उपस्थिती पत्रक म्हणजेच उपस्थिती नोंदवही, 21 जून रोजी झालेल्या बैठकीत प्रतिवादी अनुपस्थित असल्याचे सिद्ध करण्यासाठी तयार केलेले बनावट आणि फेरफार केलेले दस्तऐवज आहे असाही युक्तिवाद त्यांनी केला आहे.

बैठकीला उपस्थित नसणाऱ्यांच्याही सह्या

पुढे गंभीर आरोप करताना त्यांनी सांगितलं की, "कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्याचे दीपक केसरकर यादी सांगितले आहे. सदा सरवणकर आणि दादा भुसे यांनी बैठकीला उपस्थित राहून सह्या केल्या तरी त्यांच्या विरोधात अपात्रता प्रकरण चालवण्यात आले . रवींद्र वायकर, उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड हे 21 जून रोजी बैठकीला उपस्थित नव्हते. तरीही त्यांच्या स्वाक्षऱ्या अटेंडन्स रजिस्टर मध्ये आहेत". उपस्थिती पत्रकात 14 जण उपस्थित असल्याचे दर्शवले आहे, परंतु अध्यक्षांसमोर सादर केलेल्या मूळ दस्तऐवजात 16 स्वाक्षऱ्या आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.

सुनील प्रभू यांनी स्वतः मान्य केले आहे की, ही बैठक आमदारांमधील मतभेद मिटवून समेट घडवून आणण्याच्या उद्देशाने बोलावण्यात आली होती. आमचा मुख्य युक्तिवाद असा आहे की, पक्षांतर्गत मतभेद म्हणजे पक्षांतर नव्हे. पक्षांतर्गत असहमतीला अपात्रता मानणे, हा दहाव्या अनुसूचीचा (10th Schedule) उद्देश नाही.

 

 


'आम्ही स्वाक्षरी केली नाही'

"आम्ही स्पष्टपणे नाकारले आहे की आम्ही उपस्थिती नोंदवहीवर (attendance register) स्वाक्षरी केली आहे किंवा अशा कोणत्याही बैठकीला उपस्थित होतो. त्यांच्या दाव्यांमधूनच हे बनावट असल्याचे स्पष्ट होते; एका बाजूला ते सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा आधार घेतात, तर दुसऱ्या बाजूला त्याच सदस्यांना अपात्रतेच्या कारवाईत आरोपी ठरवतात. हा तर खोटा पुरावा देण्याचा (perjury) प्रकार आहे," असा दावा त्यांनी केला.

'ती बैठक समेट घडवून आणण्याच्या उद्देशाने'

"आता, ज्या ठरावाच्या आधारे शिंदे यांना नेतेपदावरून हटवण्यात आले, त्याबाबत बोलायचे तर साक्षीदारांच्या उलटतपासणीतून हे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे की, 21 जून रोजी कोणताही ठराव संमत झाला नव्हता. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे मी राजकीय पक्षाचे सदस्यत्व कसे सोडले, असे मानले जाऊ शकते? सुनील प्रभू यांनी स्वतः कबूल केले की, ती बैठक समेट घडवून आणण्याच्या (reconciliation) उद्देशाने बोलावली होती," असा दावा त्यांनी केला. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES