ठाकरेंचे दिवाळी सेलिब्रेशन! बहीण जयजयवंती ठाकरेंच्या घरी भाऊबीज
संपूर्ण ठाकरे कुंटबाने एकत्र येत दिवाळी साजरी केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बहीण जयवंती ठाकरे यांच्या घरी गेले.
दिवाळी : दिवाळी सणानिमित्ताने संपूर्ण ठाकरे फॅमिली एकत्र आली. भाऊबीजेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बहीण जयजयवंती ठाकरे यांच्या घरी दाखल झाले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र हा सण साजरा केला.
ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून महाराष्ट्रात यांच्या राजकीय भेटीची नेहमीच चर्चा असते. ठाकरे बंधूचे मनोमिलन झाल्यापासून कौंटुबिक भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रच भाऊबीजेसाठू बहिण जयजयवंती ठाकरे यांच्या घरी पोहचले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, उर्मिला ठाकरे यांच्यासह इतर नातेवाईक देखील उपस्थित होते. लाडक्या बहिणीने भावाचे औक्षण केले. अमित ठाकरे यांनी सोशल मिडियावर याचे काही क्षण शेअर केले आहेत.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची भाऊबीज
राज्याच्या राजकारणातील चर्चेत असलेली बहीण भावाची जोडी म्हणजे मुंडे बंधू भगिनी. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मुंबईत एकत्र भाऊबीज साजरी केली. हा कौटुंबिक सोहळा पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील 'रामटेक' या शासकीय निवासस्थानी पार पडला.
मंत्री पंकजा मुंडे यांनी दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या ऊसतोड मजुरांसोबत भाऊबीज साजरी केली. मावळ तालुक्यात साखर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांसोबत त्यांनी भाऊबीज साजरी केली. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्यासोबत आपुलकीचे नाते अधिक घट्ट व्हावे, या भावनेतून यंदाची भाऊबीज पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगार व शेतकऱ्यांसोबत साजरी केली.
ठाकरे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
ठाकरे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सदिच्छा भेट घेतली.