• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /अन्नसुरक्षेसाठी कायपण... तुकाराम मुंढेंच्या विभागाने केंद्र सरकारच्या संस्थेलाच कोर्टात खेचलं; कोण करतंय FDA ची गळचेपी? नेमकं प्रकरण काय?

अन्नसुरक्षेसाठी कायपण... तुकाराम मुंढेंच्या विभागाने केंद्र सरकारच्या संस्थेलाच कोर्टात खेचलं; कोण करतंय FDA ची गळचेपी? नेमकं प्रकरण काय?

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुकाराम मुंढेंनी आयुक्तपद स्वीकारल्यापासून एफडीएच्या कारवायांना गती आली आहे. असं असतानाच आता एफडीएने अन्न सुरक्षेसाठी थेट केंद्रीय संस्थेला कोर्टात खेचलं आहे. नेमकं हे प्रकरण काय समजून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 24, 2026, 07:49 AM IST|Updated: Oct 24, 2026, 08:00 AM IST
joinshare
अन्नसुरक्षेसाठी कायपण... तुकाराम मुंढेंच्या विभागाने केंद्र सरकारच्या संस्थेलाच कोर्टात खेचलं; कोण करतंय FDA ची गळचेपी? नेमकं प्रकरण काय?
Image Credit: न्यायालयामध्ये बाजू मांडताना नेमकं काय म्हटलं? (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

केंद्रातील सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद होण्याचे प्रकार काही जुने नाहीत. अनेकदा दोन वेगवेगळ्या पक्षांची सत्ता असलेल्या या सत्ताकेंद्रामध्ये वादाच्या ठिणग्या उडताना दिसतात. मात्र सध्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये दोन सरकारी संस्थांमध्येच वाद झाल्याचं दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आयुक्त म्हणून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचा कारभार तुकाराम मुंढेंनी हाती घेतल्यापासून हा विभाग चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता या विभागाची केंद्रीय यंत्रणेकडून गळचेपी केली जात असल्याचा आरोप एफडीएनेच केला आहे. याविरोधात एफडीएने थेट कोर्टाची पायरी चढली आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात...

एफडीएने म्हटलंय काय?

मे महिन्यापासून महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंचं नाव चांगलेच चर्चेत आहे. मुंढेंच्या नेतृत्वाखाली नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे, या उद्देशाने कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जोरदार कारवाई सुरु केली आहे. कारवाईच्या धडक्यामुळे मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीए सर्वत्र चर्चेत असतानाच, या संस्थेची राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडून गळचेपी केली जात आहे की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाविरोधात म्हणजेच एफएसएसएआयविरोधात एफडीएने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून राज्याच्या यंत्रणेला रोखण्यात येत आहे आणि अधिकार हिरावले जात असल्याचे 'एफडीए'चे कोर्टात म्हटलं आहे.

नेमका आक्षेप काय?

2006 च्या मूळ अन्न सुरक्षा कायद्यानुसार (एफएसएसएआय) अन्न सुरक्षेचे नियमन विकेंद्रित ठेवणे आणि त्याचे अधिकार राज्य अन्न सुरक्षा आयुक्त व स्थानिक अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते. मात्र, एफएसएसएआयने बेकायदेशीरपणे 'सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर' आणि 'सेंट्रल लायसन्सिंग अथॉरिटी' अशी पदे निर्माण करून राज्यांच्या अधिकारांवर गदा आणली आहे, असा दावा राज्याने केला आहे. एफएसएसएआयने 12 मे 2023 रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे, केंद्रीय परवाना असलेल्या मोठ्या अन्न आस्थापनांची थेट तपासणी किंवा कारवाई करण्यापासून राज्य एफडीए अधिकाऱ्यांना रोखले आहे.  सध्या 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणारे मोठे उद्योग आणि थ्री-स्टार किंवा त्यावरील हॉटेल्स हे थेट एफएसएसएआयच्या अखत्यारीत येतात. यामुळे राज्य एफडीएला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एफएसएसएआयची लेखी परवानगी घ्यावी लागते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. 'FoSCoS' (अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली) या ऑनलाइन पोर्टलचा वापर करून सर्व मोठ्या अन्न व्यवसायांना पद्धतशीरपणे केंद्राच्या अखत्यारीत नेले जात असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

मुख्य मागण्या कोणत्या?

महाराष्ट्र सरकारने अन्न सुरक्षा आयुक्तांमार्फत दाखल केलेल्या या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाकडे खालील मागण्या केल्या आहेत:

> एफएसएसएआयचे हे वादग्रस्त आणि असंविधानिक सुधारित नियम व दुरुस्त्या रद्द करण्यात याव्यात.
> राज्य अधिकाऱ्यांना तपासणी करण्यापासून रोखणाऱ्या मे 2023 च्या आदेशाला तातडीने स्थगिती द्यावी.
> परवान्यांशी संबंधित सर्व डेटा आणि रेकॉर्ड्स पुन्हा राज्य नियुक्त अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आदेश केंद्राला द्यावेत.
> 'एफएसएसएआय'ने सन 2011, 2018 आणि 2026 मध्ये आणलेल्या नियमावली घटनाबाह्य ठरवून रद्दबातल कराव्यात.
> ऑनलाइन पोर्टलच्या वापराच्या 28 मे 2020 आणि 12  ऑक्टोबर 2020 रोजीच्या सार्वजनिक नोटिसा बेकायदा ठरवाव्यात.
> याचिकेवरील अंतिम निर्णय होईपर्यंत अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती द्यावी आणि ऑनलाइन पोर्टलवरील परवान्यांशी संबंधित सर्व माहिती व डेटाबेस पुन्हा राज्याच्या यंत्रणेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश 'एफएसएसएआय'ला द्यावेत.

पुढील सुनावणी कधी?

मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची प्राथमिक सुनावणी झाली असून, न्यायालय या प्रकरणावर 26 नोव्हेंबर 2026 रोजी पुढील सुनावणी करणार आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर रोजीच्या सुनावणीमध्ये नक्की काय होणार? न्यायालय एफएसएसएआयला काही निर्देश देणार की एफडीएला या प्रकरणामध्ये धक्का दिला जाणार? हे स्पष्ट होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Tukaram Mundhe
High court