• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /राज ठाकरेंच्या पोलीस सुरक्षेवरून मनसे अन् भाजपाची जुंपली! फडणवीसांचाही उल्लेख, मनसेचं ओपन चॅलेंज; 'हिंमत असेल तर...'

राज ठाकरेंच्या पोलीस सुरक्षेवरून मनसे अन् भाजपाची जुंपली! फडणवीसांचाही उल्लेख, मनसेचं ओपन चॅलेंज; 'हिंमत असेल तर...'

भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं दिसत असून नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोण काय म्हणालं आहे जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 22, 2026, 12:39 PM IST|Updated: Oct 22, 2026, 12:55 PM IST
joinshare
राज ठाकरेंच्या पोलीस सुरक्षेवरून मनसे अन् भाजपाची जुंपली! फडणवीसांचाही उल्लेख, मनसेचं ओपन चॅलेंज; 'हिंमत असेल तर...'
Image Credit: थेट आव्हानच दिलं (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारतीय जनता पार्टीचे नेते परिणय फुके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर राज ठाकरेंच्या पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी परिणय फुकेंना थेट राज यांची सुरक्षा काढून दाखवावीच असं आव्हान दिलं आहे. मात्र परिणय फुके नेमकं काय बोलले होते आणि त्यावर मनसे नेत्यांनी काय म्हटलंय, जाणून घेऊयात...

राज काय म्हणाले?

राज ठाकरेंनी बुधवारी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला.  राज यांनी पुढच्या दोन-चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल असं सूचक विधान करताना, पुढील काही महिन्यात अख्खा देश रस्त्यावर आला तरी आश्चर्य वाटणार नाही असं म्हटलं. दसऱ्यानिमित्त नागपुरमधील मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेजीम चेंजसंदर्भात केलेल्या विधानावरुन राज यांनी संघाचा समाचार घेतल्याचं दिसून आलं. "बदल हा गरजेचा असतो हाफ यांची फुल पँट नाही का झाली? त्यांना हवा असलेला निकाल त्यांना मिळतो. सुप्रीम कोर्टाने विचार केला पाहिजे आपण काय प्रकारचे निर्णय देत आहोत. कुठल्या स्वायत्त संस्था राहिल्या आहेत का? पत्रकारिता तरी राहिली आहे का? रेजीम चेंज हे मोहन भागवंताच्या हातात थोडी आहे? ते लोकांच्या जनतेच्या हातात आहे. 2014 मध्ये आलेली सत्ता ही नरेंद्र मोदींमुळे आलेली आहे. आरएसएसमुळे आलेली नाही. रेजीम चेंज करायचा असेल तर जनता आणि मोदी पाहतील," असा खोचक टोला राज यांनी भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला.

परिणय फुके काय म्हणाले?

यावरुनच फुकेंनी राज ठाकरेंना टोला लगावताना, "राहुल गांधींनी सध्या ॲडिशनल चार्ज त्यांच्याकडे दिल्या त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत. राज ठाकरे इतक्या मोठ्या रेझीम चेंजबाबत ज्या बाता करत आहेत ते स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सिक्युरिटीच्या आधारावर बोलत आहेत.  त्यांच्याकडे संविधानिक पद नाही. त्यामुळे त्यांना ही सिक्युरिटी देण्याची गरज नाही. म्हणूनच ज्या दिवशी ही सिक्युरिटी काढण्यात येईल त्यावेळी ते घराबाहेर निघणार नाहीत," असं विधान केलं आहे.

हिंमत असेल, तर राज ठाकरेंचे पोलीस संरक्षण काढून दाखवा

ठाणे, पालघरमधील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या टीकेवरुन परिणय फुकेंबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. अविनाश यांनी आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये हा किस्सा सांगितलाय. "काही महिन्यांपूर्वी परिणय फुके यांचा कौटुंबिक वाद साहेबांकडे आला होता. साहेबांनी मला त्यांना भेटायला सांगितले होते;  कौटुंबिक वादात पडायचे नाही, ही साहेबांची भूमिका होती. त्या वेळी आम्ही हस्तक्षेप केला असता, तर परिणय फुके यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा उरली नसती," असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर, "सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस आहेत! आणि तुझ्यात जर हिंमत असेल, तर साहेबांचे पोलीस संरक्षण काढून दाखव. मग तुम्हीही महाराष्ट्रात कसे फिरता, ते बघू!" असं थेट चॅलेंज अविनाश जाधव यांनी दिलं आहे.

मोदींमध्ये हिंमत असेल तर...; संदीप देशपांडेंचं थेट आव्हान

मनसेचे नेते संदीप देशपांडेंनीही यावरुन परिणय फुकेंना सुनावलं आहे.  "हजार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 45 हजार पोलिस ठेवणाऱ्यांनी आमच्यासमोर बात मारू नये. कोणाला सुरक्षा द्यायची आणि नाही ते देवेंद्र फडणवीस म्हणून नाही तर गृहमंत्री म्हणून ठरवतात.  तुम्ही जंतर-मंतरवर पोलिस न लावता मुलांना आंदोलन करू द्या. आहे का हिंमत? मोदी आणि शहांची आहे का हिंमत? तुम्ही घाबरत आहात म्हणून मुलांना ताब्यात घेत आहात. त्यांना पॅलेट गन मारता. मोदींमध्ये हिंमत असेल तर एकटे फिरून दाखवा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांचा आहे. सांगा तुम्ही त्यांना, काढून दाखवा सिक्युरिटी," असं थेट आव्हान संदीप देशपांडेंनी परिणय फुकेंना दिलं आहे. 

आता मनसे नेत्यांनी दिलेल्या या आव्हानाला परिणय फुके किंवा भाजपा नेते काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
BJP
Devendra Fadnavis
Maharashtra Politics