• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /आंदोलनात सहभागी झाल्याने देश सोडायला सांगणं मुंबई पोलिसांनाच पडणार महागात? अभिनेता इम्रान खानचा मोठा निर्णय

आंदोलनात सहभागी झाल्याने देश सोडायला सांगणं मुंबई पोलिसांनाच पडणार महागात? अभिनेता इम्रान खानचा मोठा निर्णय

इम्रान खान आणि त्याच्या प्रेयसीला मुंबई पोलिसांनी 10 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या दोघांना सोडून देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी इम्रानला देश सोडण्याची नोटीस बजावली.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 16, 2026, 10:45 AM IST|Updated: Oct 16, 2026, 11:07 AM IST
joinshare
आंदोलनात सहभागी झाल्याने देश सोडायला सांगणं मुंबई पोलिसांनाच पडणार महागात? अभिनेता इम्रान खानचा मोठा निर्णय
Image Credit: इम्रानला देण्यात आला 28 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून देश सोडण्याची नोटीस बजावण्यात आलेला अभिनेता इम्रान खान आता नोटीस पाठवणाऱ्या मुंबई पोलिसांना कोर्टात खेचणार आहे. इम्रान खान या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. मुंबई पोलिसांनी इम्रानला 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश  दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या याच नोटिशीला आव्हान देणारी याचिका इम्रानतर्फे शुक्रवारी किंवा सोमवारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

इम्रान ओसीआय कार्डधारक

इम्रान हा जन्माने अमेरिकेचा नागरिक आहे. त्याच्याकडे भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांसाठीचे ओसीआय म्हणजेच 'ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया'चं कार्ड आहे. आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून ठेवण्यात आला आहे. मात्र, मुंबई पोलिसांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत असलेला इम्रान हा कायद्यावरच बोट ठेवून मुंबई पोलिसांना उत्तर देणार असल्याचे समजते. ओसीआय कार्डधारकांना आंदोलनात सहभागी होण्यास प्रतिबंध करणारी कोणतीही कायदेशीर तरतूद किंवा नियम नाही, असा युक्तिवाद त्यांच्या याचिकेत करण्यात येणार असून हाच त्याच्या याचिकेचा मूळ मुद्दा असणार आहे. इम्रान खानने मुंबईत आयोजित आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन करणाऱ्या तरुणाईचे लक्ष वेधले होते. इंटरनेटवरही इम्रानला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे, तो आंदोलनात सहभागी झाल्याचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल झाले होते.

तातडीने सुनावणी

इम्रान खानच्या वतीने वकील झुल्फिकार मेमन हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. 43 वर्षीय इम्रानला आंदोलनात सहभागी झाल्यामुळे देश सोडण्यास सांगणारी मुंबई पोलिसांची नोटीस ही अत्यंत कठोर कारवाई असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिका दाखल झाल्यानंतर तातडीच्या सुनावणीसाठी मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर तिचा उल्लेख केला जाण्याची शक्यता आहे. कारण इम्रानने याचिका दाखल केल्यानंतर त्याच्याकडे अवघ्या दीड आठवड्यांचा वेळ असणार आहे. त्याला मुंबई पोलिसांनी भारत सोडण्यासाठी 28 ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे आता इम्रानला नोटीस पाठवणं मुंबई पोलिसांना महागात पडतं की इम्रानला खरंच देश सोडावा लागतो हे न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच स्पष्ट होईल.

इम्रानचे बालपण

इम्रान खानचा जन्म 13 जानेवारी 1983 रोजी अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथील मॅडिसनमध्ये झाला. इम्रानचे वडील अनिल पाल हे बंगाली हिंदू वंशाचे असून ते एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्याची आई नुझहत खान मानसशास्त्रज्ञ आहे. नुझहत ही अभिनेता आमिर खानची बहीण आहे.  इम्रान अवघा दीड ते दोन वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्याची आई नुझहत त्याला घेऊन मुंबईत परतली. त्यामुळे त्याचे सुरुवातीचे संगोपन त्याच्या आईनेच केले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
High court
Imran Khan