• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /राज्यात थंडीची चाहूल? पण या जिल्ह्यांत उकाडा असह्य होणार, वाचा आजचे हवामान

राज्यात थंडीची चाहूल? पण या जिल्ह्यांत उकाडा असह्य होणार, वाचा आजचे हवामान

आज हवामान कसं असेल? कुठे थंडी तर कुठे उकाडा, राज्यात कसं असेल वातावरण वाचा सविस्तर

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 12, 2026, 07:16 IST|Updated: Nov 12, 2026, 07:18 IST
joinshare
राज्यात थंडीची चाहूल? पण या जिल्ह्यांत उकाडा असह्य होणार, वाचा आजचे हवामान
Image Credit: maharashtra weather today

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नोव्हेंबर महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबईकरांना व राज्यात थंडीची चाहूल लागली नाही. मुंबईत आजही दुपारनंतर उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. कुलाबा येथे कमाल तापमान 35.4 अंश इतके आहे तर किमान तापमान 25.5 अंश इतके आहे. त्यामुळं राज्याच्या बहुतांश भागात रात्री गारवा आणि दिवसा उकाडा अशी परिस्थिती आहे.

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अहवालातून नोव्हेंबर महिना सुरू असतानाही हवी तशी थंडी पडली नाहीये. राज्यात मंगळवारपासून बहुतांश जिल्ह्यांतील किमान तापमानात घट झाली असून बुधवारीही मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांतील किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.

पुढील दोन दिवसांत राज्यातील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि कोकणातील उष्णता कायम आहे. मुंबईतील कमाल आणि किमान तापमान दोन्ही सरासरीपेक्षा अधिक असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे विदर्भात रात्रीच्या तापमानात घट होत असून राज्याच्या वेगवेगळ्या भागांच वेगवेगळे हवामान अनुभवायला मिळत आहे.

बुधवारी एक नवी 'पश्चिमी विक्षोभ' प्रणाली सक्रिय होण्याचा अंदाज आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर (गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम) आणि हिमाचल प्रदेशच्या उंच डोंगराळ भागांत 11
ते 13 नोव्हेंबर दरम्यान बर्फवृष्टीची शक्यता आहे.
बर्फवृष्टीनंतर पुढील काही दिवसांत तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात तसेच मध्य भारतात थंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कुलाबा वेधशाळा येथे बुधवारी (11 नोव्हेंबर) कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा 14 अंशांनी जास्त आहे. तर किमान तापमानही 25.5 अंशांवर पोहोचले असून तेही सरासरीपेक्षा 1.4 अंशांनी अधिक आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि रात्रीही जाणवणारा उकाडा, अशी परिस्थिती मुंबईत पाहायला मिळत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Weather News
Mumbai