महाराष्ट्रातील अनेक भागांत हवेत गारठा वाढला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. मराठवाडा, विदर्भ उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत थंडीचा जोर वाढू लागला आहे. पहाटेच्या वेळी गारवा जाणवण्यास सुरूवात झाली आहे.
हवामान विभागाच्या 12 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीसाठीच्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवडे तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात वाढ होऊ शकते. त्यामुळं नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आणि डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
12 नोव्हेंबर रोजी नोंद झालेल्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. अनेक शहरांत किमान तापमान 10 ते 14 अंश अशी नोंद झाली आहे. ऑक्टोबरमधील उष्ण हवामानातून नोव्हेंबरमध्ये थंडीच्या हंगामाकडे होणारा हा संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे या काळात तापमानात चढ-उतार दिसून येतात.
छत्रपती संभाजी नगर शहरातील किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात झाली आहे. गुरुवारी शहराचे किमान तापमान 17.2 अंश सेल्सिअसवर घसरले. सध्या सूर्याचे दक्षिणायन सुरू असून या कालावधीत सूर्यकिरणे बदलत असल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. येत्या रविवारपासून किमान तापमान 15 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता असून शहरात थंडीत वाढ होईल.
13 ते 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता.
20 ते 26 नोव्हेंबर: महाराष्ट्रासह बहुतांश भागात तापमान सरासरीच्या आसपास किंवा खाली राहील.
27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर: देशाच्या दक्षिण व मध्य पट्टात थंडीचा प्रभाव कायम राहील.
4 ते 10 डिसेंबर : काही आठवडे महाराष्ट्रासह मध्य भारतात सुखद आणि आल्हाददायक वातावरणासह थंडीचा प्रभाव.