• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /बालकांच्या शोषणाचे 20 हजारांहून फोटो-व्हिडीओचं आरोपीने काय केलं? मालाड प्रकरणात मोठी अपडेट समोर!

बालकांच्या शोषणाचे 20 हजारांहून फोटो-व्हिडीओचं आरोपीने काय केलं? मालाड प्रकरणात मोठी अपडेट समोर!

मालाडमध्ये आरोपीच्या मोबाइलमध्ये बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित 20 हजारांहून अधिक फोटो-व्हिडीओ आढळले. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 08, 2026, 15:10 IST|Updated: Nov 08, 2026, 15:31 IST
joinshare
बालकांच्या शोषणाचे 20 हजारांहून फोटो-व्हिडीओचं आरोपीने काय केलं? मालाड प्रकरणात मोठी अपडेट समोर!
Image Credit: मालाड क्राइम

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

इंटरनेटवर बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट डाउनलोड करून सेव्ह केल्याचा हादरवणारा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातून एका 49 वर्षीय व्यक्तीला अटक केलीय. आरोपीच्या मोबाइल फोनची तपासणी केली असता 1-2 नव्हे तर तब्बल 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळले. कोण आहे आरोपीय़ पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले? काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

कोण आहे आरोपी?

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सैफुद्दीन जमीरुद्दीन मलिक असे आहे. तो मालाड पश्चिम परिसरातील रहिवासी आहे. महाराष्ट्र सायबरच्या विशेष पथकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखरेख करताना एक व्यक्ती बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेंट डाउनलोड करून सेव्ह करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सायबर इंटेलिजन्स साधने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्यात आली. पुढे धक्कादायक प्रकार समोर आला.

मोबाइलमध्ये 20 हजारांहून अधिक फोटो-व्हिडीओ

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाइलची तपासणी केली. त्यावेळी बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळल्याचे महाराष्ट्र सायबरने सांगितले.

बीएनएस, पोक्सो आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा

या प्रकरणी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा  नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 294, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) 2012 मधील कलम 15 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 67 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कंटेंट इतरांनाही पाठवला?

आरोपीच्या मोबाइलमधील कंटेंट कुठून डाउनलोड करण्यात आली, ती कोणत्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मिळवली आणि इतर व्यक्तींना पाठवण्यात आली होती का, याचा तपास केला जात आहे. जप्त केलेल्या डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

महाराष्ट्र सायबर सेलचे नागरिकांना आवाहन

महिलांवरील आणि बालकांवरील ऑनलाइन गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबरने तीन विशेष पथके कार्यरत ठेवली आहेत.  या पथकांनी आतापर्यंत 5.67 लाखांहून अधिक सायबर टिपलाइन अहवाल आणि बालकांच्या ऑनलाइन शोषणाशी संबंधित 31 हजार तक्रारींवर काम केल्याची माहिती विभागाकडून देण्यात आलीय. अशा संशयास्पद ऑनलाइन कंटेंटची माहिती राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर www.cybercrime.gov.in नोंदवता येते. तसेच 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Mumbai
Mumbai News