SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'जरांगेंना बदनाम करण्याचा डाव', ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन राज ठाकरे संतापले; 'प्रश्न ₹500 कोटींचा नाही तर...'

मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोेर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेमध्ये श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून जरांगेंना 500 कोटी रुपये पाठवण्यात आल्याचं सांगितलं गेल्याचा दावा केला जातोय.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 23, 2026, 01:14 PM IST | Updated: Oct 23, 2026, 01:37 PM IST
Image Credit: जरांगेंनी ऐकवलेल्या क्लिपसंदर्भात बोलले (प्रातिनिधिक फोटो)
Join

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांना ऐकवली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये चर्चा करणारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्याचा दावा केला जातोय. या क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून भाजपाने जरांगेंना 500 कोटी रुपये पाठवल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावरुन आता एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन या क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी साऱ्या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला आहे. राज यांनी हा सारा जरांगेंना बदनाम करण्याचा डाव असल्याचं मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

राज म्हणाले, प्रश्न 500 कोटी रुपयांचा नाही तर...

मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आज मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज यांना जरांगेंनी ऐकवलेल्या 500 कोटी रुपयांसंदर्भातील दाव्याबद्दल प्रश्न करण्यात आला. त्यावर राज यांनी, "क्लिपमध्ये उल्लेख असलेल्या 500 कोटी रुपयांचा हा प्रश्न नाही, तर कशाप्रकारे प्लॅनिंग केले जाते, तो मूळ प्रश्न आहे," असं म्हटलंय. "एखाद्या माणसाचा आधी वापर करायचा आणि नंतर त्याला बदनाम करायचे, त्याची जवळची माणसे फोडायची, हे सध्या राज्यात काय चाललंय?" असंही राज यांनी या प्रकरणावरुन जरांगेंना टार्गेट केलं जात असल्याचं सूचित करताना म्हटलं.

प्रसारमाध्यमांनाही झापलं

राज यांनी या प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमांचा संदर्भ कथित क्लिपमध्ये आल्याच्या पार्श्वभूमीवर सुनावलं. "हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्लॅनिंगमध्ये मीडियालाही धरले आहे. कोण रिपोर्ट छापू शकतो आणि कोण नाही, न छापल्यास आम्ही काय करू, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि एक विशिष्ट नरेटिव्ह पसरवला जातोय," असंही राज म्हणाले.

हा प्लॅन किती भयंकर आहे

"ही क्लिप नेमकी आली कुठून? आणि यातील प्लॅन किती भयंकर आहे? मनोज जरांगे यांच्या विरोधात नेमकं काय चाललंय?" असे सवालही राज यांनी या प्रकरणासंदर्भात मतच नोंदवताना म्हटलं.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंनी ऐकवलेल्या 500 कोटींसंदर्भातील ऑडिओ क्लिपबद्दल बोलताना, या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याचं सांगितलं. तसेच आताच ही क्लिप बाहेर का आली? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES