शरद पवार : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील भेटीगाठी वाढल्यात. खासदार पार्थ पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. तब्बल अडीच तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटींचा राजकीय अर्थ काढला जात असतानाच नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
राजकारणात काही भेटी केवळ सदिच्छा भेटी असतात. तर काही भेटींच्या निमित्ताने नव्या राजकीय चर्चांना सुरुवात होते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील भेटीगाठी वाढल्यात आहेत. खासदार पार्थ पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सिल्व्हर ओकवर हजेरी लावली. शरद पवारांची भेट घेत त्यांनी तब्बल अडीच तास चर्चा केली. 7 नोव्हेंबर रोजी शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे पार्थ पवारांनी काल त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र आज पुन्हा झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
दरम्यान या भेटीगाठींवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झालेत. आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरेंवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर तटकरेंनी राजकारण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. तर पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार नाही अशा विश्वास खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला.
दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. विलीनीकरणाच्या चर्चा रुग्णालयात करणार का? असा सवाल त्यांनी केला. शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास भेट घेतल्याचे पटेल म्हणाले.
मात्र या सगळ्या घडामोडींवर मित्रपक्षातील राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य केले. राजकीय घडामोडींना सुरुवात झाली असून दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय.
पार्थ पवारांच्या सलग दोन दिवसांच्या भेटी, अडीच तासांची चर्चा आणि नेत्यांकडून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. त्यातच उद्या उद्धव ठाकरेही शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील भेटीगाठींचं राजकीय महत्त्व आणखी वाढल आहे. पवारांच्या भेटीगाठींमधून राजकीय विलीनीकरणाची नवी वाट तयार होत. की या केवळ सदिच्छा भेटी आहेत? हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.