• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /पुढच्या दोन चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल; राज ठाकरेंचं सूचक विधान, '....देशाला पंतप्रधानच नसेल'

पुढच्या दोन चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल; राज ठाकरेंचं सूचक विधान, '....देशाला पंतप्रधानच नसेल'

पुढील काही दिवसांत अख्खा देश रस्त्यावर उतरला तरी मला आश्चर्य वाटणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 21, 2026, 05:46 PM IST|Updated: Oct 21, 2026, 06:03 PM IST
joinshare
पुढच्या दोन चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल; राज ठाकरेंचं सूचक विधान, '....देशाला पंतप्रधानच नसेल'
Image Credit: पुढच्या दोन चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल; राज ठाकरेंचं सूचक विधान

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुढच्या दोन चार महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल असं सूचक विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं आहे. पुढील काही महिन्यात अख्खा देश रस्त्यावर आला तरी आश्चर्य वाटणार नाही असं ते म्हणाले आहेत. आगामी काळात ज्या गोष्टी होतील त्या सरकारला झेपणार नाही. मधे एक असा काळ येईल जेव्हा देशाला पंतप्रधान नसेल असंही ते म्हणाले आहेत. नीट, निवडणूक आयोगाचं आंदोलन झालं. जे बाहेर रस्त्यावर आले तो प्रत्यकेणज नीट पेपर सोडवून आला नव्हता. पण मनात काही ना काहीतरी राग आहे, तो बाहेर काढण्यासाठी मंच मिळाला असं त्यांनी म्हटलं आहे.

2014 साली जी सत्ता आली ती मोदींमुळे आली आरएसएसमुळे नव्हे, त्यामुळे जे देशातील सरकार बदलायचं आहे ते मोदी आणि जनता पाहतील. ती सत्ता आल्यानंतर आम्ही आणली असा कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो तसा नाही असं त्यांनी सांगितलं.

विरोधक देशात अराजकता पसरवत असल्याच्या भाजपाच्या आरोपांवर ते म्हणाले की, "शांततेने आंदोलन कऱणाऱ्या मुलावंर तुम्ही लाठीचार्ज केला, मारलं, पोलिसांत तुमची लोक घुसवलीत. या मुलांनी काहीच केलं नव्हतं. मग अराजकता कोण पसरवत आहे? भाजपा काय जुने दिवस विसरले का?".

"देशात लोकशाही कुठे आहे. खरी लोकशाही पाहायची असेल तर ती अमेरिकेत आहे. ऑस्करच्या व्यासपीठावर कलाकार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करतात, मतं व्यक्त करतात, पण म्हणून त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला जात नाही. त्यांच्याविरोधात फतवे काढले जात नाहीत. कलावंत बोलत का नाहीत असं विचारलं जातं, पण ते बोलले की असं काही करतात. आम्ही काय प्रत्येक वेळी भाजपाने स्पॉन्सर केलेले चित्रपटच पाहायचे का?सरकारने इतर गोष्टीही पाहायला हव्यात," अशी टीका त्यांनी केली.

आपण आज घेत असलेली भूमिका भविष्यात चुकीचे पायंडे पाडत नाही ना याचं भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवावं असा सल्ला देताना त्यांनी सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही याची आठवण करुन दिली. 

राज ठाकरेंनी यावेळी देशात बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे असं मत मांडलं. "आपल्या आजुबाजूचे देश पाहिले तर तिथेही बॅलेटवर मतदान होत आहे. तिथे मशीन वापरली जात नाही. काही मोजक्या देशात भारत येतो जिथे मशीन वापरलं जात आहे. अनेक पुढारलेल्या देशांमध्ये बॅलेट पेपरवरच मतदान होतं. फ्रान्समध्ये मशीन आणली तेव्हा एका व्यक्तीने तक्रार केली आणि त्यानंतर ती रद्द झाली आणि परत बॅलेट पेपरवर आले. मग भारतात मशीन कशाला पाहिजे? बॅलेट पेपरवरील मतदान कोणाला करत आहोत याचं समाधान असायचं. मशीनची झंझट कोणी सांगितली आहे. लोकसभा, विधानसभा एकावेळी होत नाहीत. निकाल उशिरा मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण मग घाई कोणाला आहे. 95 ची विधानसभा निवडणूक झाली तेव्हा 12 फेब्रुवारीला मतदान आणि 12 मार्चला निकाल लागला. मग काय फरक पडला? आताही लोकसभेच्या निवडणुका टप्प्यात होतात. हे करताना निकाल उशिराच येतो", असं त्यांनी म्हटलं 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray