बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यानंतर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावरुन भाजपावर टीका केली आहे. हीच परिस्थिती भाजपा विरोधात असताना झाली असती, तर त्यांनी काय केलं असतं? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
लॉरेन्स बिष्णोई साबरमतीमधील जेलमध्ये आहे असं सांगत प्रश्न विचारलं असता राज ठाकरेंनी, मला 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल' हे गाणे मला आठवते असं म्हटलं. पुढे ते म्हणाले, "हीच परिस्थिती भाजपा विरोधात असताना झाली असती, तर त्यांनी काय केलं असतं? काय बोलले असते? सत्तेत असताना आणि विरोधात असताना वेगळी भूमिका असं कसं चालेल? छातीठोकपणे आम्ही केलं सांगितलं जात असताना, बंदोबस्त करता येत नाही का? जेलमधून काढून नागडा करुन मारला पाहिजे. तुम्ही पोसत असल्याने यांना भिती वाटत नाही. अन्यथा यांची हिंमत कशी होईल?".