src="https://cdn.ampproject.org/v0/amp-bind-0.1.js">
SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'भोजपुरी गाणी बंद नाही केलात तर...', भाजप सपोर्टमध्ये तर मनसेचा गंभीर इशारा

मुंबई लोकलमध्ये भोजपुरी गाणी वाजण्यावरुन मनसेनं आक्रमक पावित्रा घेतलाय. लोकलमधील भोजपुरी बंद करा अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेनं दिलाय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 12, 2026, 16:15 IST | Updated: Nov 12, 2026, 16:44 IST
Image Credit: मनसेचा इशारा
Join

मुंबईत साजऱ्या केल्या जाणाऱ्या छठपुजेवरुन आधीच वाद रंगलाय. समुद्रावर गणेशमुर्ती विसर्जनासाठी बंदी आणली तशी छठपुजेसाठीदेखील असावी, अशी मागणी करण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापलंय. भोजपुरी गाणी वाजवण्याच्या निर्णयावर ठाकरेंची शिवसेना, महाराष्ट्र एकीकरण समितीने टीका केली. तर भाजप भोजपुरीच्या गाणी वाजण्याच्या समर्थनार्थ उतरलीय. दुसरीकडे आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतलीय.

काय घडलंय नेमकं?

मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर नेहमी तुम्हाला रेल्वे वेळापत्रकाच्या उद्घोषणा ऐकायला मिळतात. ज्यामध्ये रेल्वे कधी येणार, कोणत्या प्लॅटफॉर्मवर कोणती लोकल थांबेल, लोकल उशीरा येणार असेल तर अशा कारणांसाठी उद्घोषणा होतात. पण रेल्वे स्थानकांमध्ये थेट छटपूजेची गाणी वाजण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंबईत हार्बर मार्गावरील वडाळा, सानपाडा यासह मध्य रेल्वेच्या आंबिवली स्टेशनवर उद्घोषणा थांबवून छटपूजेची गाणी मोठ्या आवाजात वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ज्यामुळे मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. यामध्ये भाजप भोजपुरी गाणी वाजण्याच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलीय. तर आता मनसेनं थेट आव्हान दिलंय.


भोजपुरी गाण्यांवर रेल्वेने काय म्हटलंय? 

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजल्यानंतर चहुबाजूने टीका करण्यात आली. यावर आता रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. नियमित उदघोषणांवर परिणाम झालेला नाही.नियमित उदघोषणेनंतर गाणी वाजवली जातायत, असं म्हणच रेल्वेनं या वादावर स्पष्टीकरण दिलंय.


भाजप उतरली समर्थनार्थ

भोजपुरी गाण्यांवरुन एकीकडे टीका होत असताना भाजपने याच्या समर्थनाथ भूमिका घेतलीय. भोजपुरी गाण वाजत असेल तर वाईट काय? असा प्रश्न अतुल लोंढे यांनी विचारलाय.  एखाद्या प्लेटफॉर्म वर जर मराठी गाणं वाजले तर चांगली गोष्ट आहे, भोजपुरी गाण वाजत असेल तर त्यात वाईट काय? अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आलीय. भोजपुरी ही चांगली भाषा आहे, यात राजकारण काय करायचे, असा प्रतिप्रश्न अतुल लोंढे यांनी विचारला.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका  

भोजपुरी गाण्यांवरुन ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आलीय. खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केलीये. प्लॅटफॉर्मवर जय महाराष्ट्र लावणार नाही मात्र ही भोजपुरी गाणी नियमात बसतात का असा सवाल त्यांनी सरकारला विचारलाय. सण साजरे करताना मराठी अस्मितेला धक्का लागू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केलीये.. 'महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा  प्रयत्न करु  नका असा इशाराही राऊतांनी दिलाय.भोजपुरी गाण्यांवरुन किशोरी पेडणेकरांनीही सरकारला सुनावलंय. 'महाराष्ट्रात असले फाजील लाड कशाला?','यूपी, बिहारमध्ये महाराष्ट्र गीत लावलं जाईल का?' असा प्रश्न किशोरी पेडणेकरांनी विचारला. 'मराठीचा अभिजात दर्जा घालवण्याचा प्रयत्न असल्याची टीका किशोरी पेडणेकरांनी सरकारवर केलीय.


मनसेकडून आक्रमक भूमिका घेत इशारा 

रेल्वे स्थानकावरील भोजपुरी गाण्यांविरोधात मनसे आक्रमक झालीय.'भोजपुरी गाणी बंद न केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ', असं मनसेनं म्हटलंय. 'सीएसएमटी रेल्वे स्थानकात अधिकाऱ्यांना बसू देणार नाही' असा इशारा  मनसे रेल्वे कर्मचारी संघटनेच्या जितेंद्र पाटील यांनी दिलाय.

गोवर्धन देशमुखांची टीका 

शहरातील सर्वच चौपाट्या, तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून परवानग्या नको,सार्वजनिक पर्यटन ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय थांबवा
बिहारचा हा उत्सव खाजगी ठिकाणी साजरा करावा पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे. मुंबई रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मराठी राज्यात आहात भानावर या, आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री महोदय कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र? महाराष्ट्राचे बिहार का करताय? मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार? मुंबई महाराष्ट्र विकायला काढला आहे का? असा प्रश्न गोवर्धन देशमुखांनी विचारलाय. राज्यकर्त्यांनी काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे आता चक्क बिहारमध्ये आणून सोडले आहे आम्हाला.महाराष्ट्रात भाषिक दंगे भडकवू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका.रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावी अन्यथा तुमचे कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय. 

Related News

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES