• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /मी वाट पाहतोय, महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय; राज ठाकरे आक्रमक, 'शिस्त लावायला हवी'

मी वाट पाहतोय, महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय; राज ठाकरे आक्रमक, 'शिस्त लावायला हवी'

आपण शिस्त पाळत नाही आणि सगळे टाकतो पोलिसांवर. आपण शहराचे नागरिक म्हणून गोष्टी समिऊन घेतली पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 26, 2026, 01:09 PM IST|Updated: Oct 26, 2026, 01:15 PM IST
joinshare
मी वाट पाहतोय, महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय; राज ठाकरे आक्रमक, 'शिस्त लावायला हवी'
Image Credit: Raj Thackeray LIVE

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

2

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

3

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

4

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

5

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वाहतूक मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'महाराष्ट्र माझ्या हातात कधी सत्ता देतोय, याची वाट पाहतोय', असं विधान केलं आहे. तसंच, वाहतूक कोंडी, टाउन प्लानिंगयावरुन सरकारला फटकारलं आहे. त्याचबरोबर, सिग्नल न पाळणाऱ्या नागरिकांनाही धारेवर धरलं आहे.

'मी 1996-97 च्या काळात स्वित्झर्लंडला गेलो होते. तिथे संपू्र्ण देश फिरत होतो. सुंदर रस्ते, इमारती, निसर्ग, ट्रॅफिकला शिस्त. सगळं उत्तम आहे. मला फिरताना एक प्रश्न पडला की तिथला विरोधी पक्ष नेमका भांडतो कशावरुन? सगळंच तर आहे. पण तिथेही प्रश्न आहेत. पण ते प्रश्न वेगळे आहेत. ते आपल्याला नाही कळणार,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येणारा माणूस जेव्हा मंत्रिपदावर बसतो तेव्हा त्याला नवी मुंबई, ठाण्याचे, पुण्याचे प्रश्न नाही कळणार. आता आपण ग्रामीणी भागातून गेलो तर ते प्रश्न आपल्याला नाही समजू शकत. तसंच, ग्रामीण भागातून आलेला मंत्री जेव्हा त्या पदावर बसतो आणि म्हणतो काय प्रोब्लम आहे? शहरात रस्ते आहेत, शाळा आहेत, वीज आहेत. नळाला पणी आहे. तो विचार करतो त्या दृष्टीने. आमच्याकडे रस्ते नाहीत, वीज नाहीत, लोडशेडिंग आहे. नळाला पाणी नाही. तो त्याच्या तुलेनेन जेव्हा शहरं बघतो तेव्हा तो म्हणतो शहरात सगळंच आहे. हा प्रश्न तुमच्या दृष्टीकोनातला आहे. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना विश्वासात घ्यायचं असतं. आणि त्यानंतर आराखडा आखायचा असतो. बिल्डरांच्या दोस्तीतून फक्त डेव्हलपमेंट प्लान आखतात. कोणाला कोणती जमीन विकायचीये कोणाला? कुठे काय करायचा? एवढा प्लान फक्त आखतात. पण टाउन प्लानिंग नावाची गोष्ट नाही,' असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, 'मी खरंच वाट बघतोय हा महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय याची. कारण अशा प्रकारच्या गोष्टींना शिस्त आणणं हे काही रॉकेट सायन्स नाही त्याला फक्त इच्छा लागते. तुमच्या ही चालकाला शिस्त लावयला हवी. सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.' 

'पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टिम आणायच्या त्या खराब करुन टाकायच्या, रेल्वेमधून लाखो जण प्रवास करतात. उद्या जर रेल्वे कोलमडली आणि सगळ्यांनी गाड्या काढल्या तर काय कराल. घरातून कुठून बाहेर पडाल, शहरांच्या आगापिछाच राहिला नाहीये. शहारला आकारच नाही. फुटपाथवरुन चालता येत नाही. आमच्याकडे मैदाने नाहीत, बागा नाहीत आणि सांगायचे काय 7.8 आमचा जीडीपी आहे.  काय चाटायचाय तो,' अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला फटकारले आहे.

'कोणत्याही गोष्टीची शिस्त उरली नाही. जमिनची जमीनी बळकावल्या जातायत. कुठे टॉवर उभे राहतात, कुठे कॉलनी करतायेत आमचे तलाव ते तलाव मिटवून टाकताहेत आणि त्याजागी कॉलनी उभारतात आणि तेच टँकरने पाणी मागवतात. कशासाठी. याला काय शिस्त म्हणतात का?' असा सवालही राज यांनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
Mumbai News
Mumbai