• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /एसटीचा सात दिवसांचा ऑनलाइन पास काढा आणि राज्यात कुठेही फिरा, असे असतील पासचे दर!

एसटीचा सात दिवसांचा ऑनलाइन पास काढा आणि राज्यात कुठेही फिरा, असे असतील पासचे दर!

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 04, 2026, 10:18 AM IST|Updated: Oct 04, 2026, 10:20 AM IST
joinshare
एसटीचा सात दिवसांचा ऑनलाइन पास काढा आणि राज्यात कुठेही फिरा, असे असतील पासचे दर!
Image Credit: msrtc news

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना कित्येक वर्षांपूर्वी सुरू केली आहे. या योजनेचा पास सुरुवातीला आगारात जाऊन काढावा लागत होता. मात्र आता हा पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं आता  आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटी बसच्या लालपरीने किफायतशीर दरात प्रवास करता येऊ शकतो.  महाराष्ट्रासह बाहेरील राज्यांमध्ये कुठेही कधीही जायचे असेल, तर एसटी महामंडळाची ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजना आहे. या योजनेअंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही सवलत योजना प्रवाशांसाठी MSRTC मार्फत राबविली जाते. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार 4 व 7 दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू केली आहे. महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

प्राप्त झालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल. ऑनलाइन पद्धतीने मिळालेल्या पासवर क्यूआर (QR) कोड देण्यात येणार तो प्रवासावेळी स्कॅन केला जाईल.

पाससाठी किती पैसे मोजावे लागतील

दरम्यान, 7  दिवसांच्या पाससाठी साधी / एक्सप्रेस / रात्रसेवा / शहर बस प्रवास करायचा असेल तर, प्रौढ प्रवाशांना ₹2,775 आणि 5 ते 12 वर्षे मुलांसाठी ₹1,390 इतका दर आकारण्यात येतो. हेच 4 दिवसांचा पास हवा असेल तर अनुक्रमे ₹1,590 आणि ₹800 रुपये मोजावे लागतील. याच योजनेत शिवशाही आसनी आंतरराज्यसह बस प्रवासासाठी 7 दिवसांच्या पासचा दर प्रौढ प्रवाशांना ₹3,180 आणि 5 ते 12 वर्षे मुलांसाठी ₹1,595 इतका आहे. हेच 4 दिवसांचा पास हवा असेल तर अनुक्रमे ₹1,525 आणि ₹915 रुपये भरावे लागतील. तसेच ई-बस शिवाई 12 मीटर बस प्रवासासाठी प्रौढ प्रवाशांना 7 दिवसांच्या पाससाठी ₹3,625 आणि 5 ते 12 वर्षे मुलांसाठी ₹1,815 इतका दर आहे. हेच हेच 4 दिवसांचा पास हवा असेल तर अनुक्रमे ₹2075 आणि ₹1045 मोजावे लागतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
MSRTC
Maharashtra News
Western Maharashtra