• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /49 वर्षीय रहिवाशाच्या घरी अचानक पोलिसांची धाड, फोन तपासताच पोलिसही हादरले, 20 हजार तसले फोटो अन् व्हिडिओ....

49 वर्षीय रहिवाशाच्या घरी अचानक पोलिसांची धाड, फोन तपासताच पोलिसही हादरले, 20 हजार तसले फोटो अन् व्हिडिओ....

मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र सायबरने 49 वर्षीय रहिवाशाला अटक केली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 08, 2026, 07:03 IST|Updated: Nov 08, 2026, 07:07 IST
joinshare
49 वर्षीय रहिवाशाच्या घरी अचानक पोलिसांची धाड, फोन तपासताच पोलिसही हादरले,  20 हजार तसले फोटो अन् व्हिडिओ....
Image Credit: Mumbai crime news

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र सायबरने कारवाई करत एका 49 वर्षीय रहिवाशाला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, या आरोपीच्या फोनमध्ये बाल लैंगिक शोषणाचे 20 हजार फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. महाराष्ट्र सायबरने मालाड पश्चिम येथून ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफुद्दीन जामिर उद्दीन मलिक असं आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर केलेल्या देखरेखीदरम्यान एका व्यक्तीकडून बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य डाउनलोड करून साठवले जात असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांना मिळालेल्या या माहितीच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञान आणि सायबर इंटेलिजन्स साधनांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर संशयिताची ओळख पटवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीच्या मोबाइलची तपासणी केली असता त्यामध्ये अशा प्रकारचे २० हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळून आले. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने ते व्हिडिओ किंवा फोटो कोणत्या प्लॅटफॉर्मवरुन डाउनलोड केले होते. ते इतरही ठिकाणी प्रसारित करण्यात आले होते का? याचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे.

महिलांवरील आणि बालकांवरील ऑनलाइन गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सायबरने सायबर क्राइम प्रिव्हेन्शन अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन (सीसीपीडब्ल्यूसी), ऑनलाइन क्राइम अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन (ओसीडब्ल्यूसी) आणि टॅक्टिकल रिस्पॉन्स अगेन्स्ट चाइल्ड एक्स्प्लॉयटेशन (ट्रेस) अशी तीन विशेष पथके स्थापन केली. या पथकांनी 5.67 लाखांहून अधिक सायबर टिपलाइन अहवाल आणि बालकांच्या ऑनलाइन शोषणासंदर्भातील ३१ हजार तक्रारी हाताळल्या आहेत.

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठांची लूट

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांना धमकावत लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांना लातूर पोलिसांनी मोठा दणका दिलाय. ईडी, पोलीस आणि एटीएसचे अधिकारी असल्याची बतावणी करत नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केली जात होती. तब्बल 28 लाख 51 हजार 999 रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लातूर पोलिसांनी सहा परप्रांतीय आरोपींना अटक केली आहे. या आरोपींचे विविध बँक खात्यांमध्ये पैसे वळवण्याचे रॅकेट असल्याचं तपासात समोर आलंय.  विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक दबावाखाली ठेवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News
crime