• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /ऑटोमॅटिक दरवाजाची पहिली लोकल मुंबईत आली, पण... ; या लोकलप्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार

ऑटोमॅटिक दरवाजाची पहिली लोकल मुंबईत आली, पण... ; या लोकलप्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार

बंद दरवाजाच्या लोकलची मुंबईत पुन्हा होणार परीक्षा आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून सुधारित रेक दाखल झाला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 09, 2026, 07:44 IST|Updated: Nov 09, 2026, 07:45 IST
joinshare
ऑटोमॅटिक दरवाजाची पहिली लोकल मुंबईत आली, पण... ; या लोकलप्रवासासाठी  आणखी वाट पाहावी लागणार
Image Credit: mumbai non Ac local

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

स्वयंचलित बंद दरवाजे असलेली सुधारित नॉन-एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. मात्र मुंबईकरांना या लोकलमधून प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. बंद दरवाजाच्या लोकलची मुंबईत पुन्हा परीक्षा होणार आहे.

जून 2025 मध्ये दिवा-मुंब्रा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातानंतर सुरक्षेसाठी बंद दरवाजांच्या नॉन-एसी लोकलची योजना आखण्यात आली होती. जेणेकरुन गर्दीच्या वेळी दरवाजातून पडून कोणाचा मृत्यू होऊ नये. त्यानुसार चाचपणीदेखील करण्यात आली होती. स्वयंचलित दरवाजे असलेल्या दोन नमुना नॉन-एसी लोकलची निर्मिती आयसीएफ, चेन्नई येथे झाली होती.

लोकलची निर्मिती झाल्यानंतर त्यापैकी एक रेक मुंबईत आणण्यात आला होता. तर, दुसऱ्या रेकची प्राथमिक चाचणी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या सीमेवरील खजुराहो महोबा येथे झाली होती. या चाचणीनंतर संशोधन अभिकल्प व मानक संघटनेच्या निदर्शनास काही तांत्रिक बाबी आल्या होत्या.

पहिल्या नमुना चाचणीत लोकलबाबत आढळलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करून हा रेक मुंबईत आणण्यात आला असून, आता त्याच्या पुन्हा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या आणि सुरक्षा तपासण्या यशस्वी झाल्यानंतरच मुंबईकरांना बंद दरवाजांच्या नॉन-एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

चाचणीत काय तपासले जाते?

कन्फमॅटरी ऑसिलोग्राफ कार रन या चाचणी लोकल धावताना डब्यामध्ये निर्माण होणारी कंपने, डब्यांची हालचाल, धावण्यातील स्थिरता आणि प्रवासाचा आरामदायीपणा तपासला जातो. विविध वेगांवरील रेकची कार्यक्षमता तसेच चाके आणि रुळांमधील परस्परसंवादाचाही अभ्यास केला जातो. या चाचणीला निष्कर्षानुसार आवश्यक तांत्रिक सुधारणा केल्या जातात.

सुधारित रेकच्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण होणार असून चाचण्या समाधानकारक ठरल्यानंतर सुरक्षा तपासणी केली जाईल. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रवासी सेवेसाठी पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. चाचण्या पूर्ण होईपर्यंत मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंब्रा अपघात कसा घडला?

मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान 9 जून रोजी झालेल्या भीषण लोकल अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यात 9 जण जखमी झाले होते. लोकलमधील अतिगर्दीमुळं हा अपघात झाल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात युक्तीवाद केला होता.

कसारा ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते कर्जत लोकल गाड्या तीव्र वळणावर एकमेकांवरुन जात असताना फूटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्याने किंवा गर्दीमुळं 8 ते 9 प्रवासी रुळांवर पडून अपघात झाला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local
Mumbai News
Mumbai