SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मॅडम, थांबा...', जुहूमध्ये महिलेकडून Hit & Run! कार, 2 दुचाक्यांना धडकल्यानंतर पोलिसांवरही कार चढवली अन्... | Viral Video

मुंबईतील जुहू परिसरात कार, 2 दुचाक्यांना धडक दिल्यानंतरही महिला कारचालकाने पोलिसांशी हुज्जत घातली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 31, 2026, 12:39 PM IST | Updated: Oct 31, 2026, 12:42 PM IST
Image Credit: Mumbai juhu Hit & Run
Join

मुंबईतील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या जुहू परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला कारचालक वाहतूक पोलिसांच्या विनंतीनंतरही गाडी थांबव नसून त्यांच्या अंगावर चढवताना दिसतंय. महिलाने पोलिसांना न जुमानता कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पोलीस कार रस्त्याच्या बाजूला थांबवण्यासाठी वारंवार सांगत होता. तरीही महिला अरेरावी करत कार पुढे नेण्याचा प्रयत्न करत होती. ही सर्व घटना व्हिडीओमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कार, 2 दुचाक्यांना धडकल्यानंतर पोलिसांवरही कार चढवली अन्...

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने जुहू परिसरात भरधाव वेगात कार असतान स्कूटर, दुचाकी आणि कारला धडक दिली आहे. अपघातानंतर कार न थांबवता महिला पुढे जात होती. तेवढ्यात वाहतूक पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. एवढंच नाहीतर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिला पोलीस कर्मचाऱ्याने कारचा मागील दरवाजा उघडून महिलेला वाहन थांबवण्यास सांगितले. मात्र, कारचालक महिलेने स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करून पोलिसांवरच उलट आरोप करण्यास सुरुवात केल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

 

तर मुंबई पोलिसांनी माहिती दिली आहे की, ही घटना शुक्रवारी (30 ऑक्टोबर 2026) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जुहू परिसरातील संगीत भारती चौक सिग्नलवर हा प्रकार घडला. या महिलेने सिग्नलवर असलेल्या गाडींना मागून धडक दिली. या महिला चालकाच्या कारचा नंबर  MH02GJ8704 आहे. तर या महिलेने ज्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली त्यांचं नाव कॉन्स्टेबल प्रशांत हाके असं आहे. दरम्यान या महिलेविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES