• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /लोकलमधील मयांक लोहार हत्या प्रकरणात ट्विस्ट? आरोपी रोशनच्या दाव्याने प्रकरणाला भलतंच वळण, कोर्टात म्हणाला 'मी तर त्याला...'

लोकलमधील मयांक लोहार हत्या प्रकरणात ट्विस्ट? आरोपी रोशनच्या दाव्याने प्रकरणाला भलतंच वळण, कोर्टात म्हणाला 'मी तर त्याला...'

मुंबईतील लोकलमध्ये 22 वर्षीय मयांक लोहराची हत्या केल्याप्रकरणी 30 वर्षीय रोशन सुवर्णा याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान कोर्टात सुनावणीदरम्यान त्याने वेगळाच दावा केला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 11, 2026, 14:32 IST|Updated: Nov 11, 2026, 14:43 IST
joinshare
लोकलमधील मयांक लोहार हत्या प्रकरणात ट्विस्ट? आरोपी रोशनच्या दाव्याने प्रकरणाला भलतंच वळण, कोर्टात म्हणाला 'मी तर त्याला...'
Image Credit: लोकलमधील महंक लोहार हत्या प्रकरणात ट्विस्ट?

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईत धावत्या लोकलमध्ये 22 वर्षीय मयांक लोहराची हत्या झाल्यानंतर शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हत्येनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रं फिरवत  30 वर्षीय रोशन सुवर्णा याला अटक केली होती. याच रोशन सुवर्णाने जामिनासाठी अर्ज केला असून, यादम्यान त्याने आपण हत्या केलीच नसल्याचा दावा केला आहे. आपण फक्त तिथे उभे होतो आणि भांडण झालं तेव्हा मध्यस्थी करत ते थांबवण्याचा प्रयत्न करत होतो असाही दावा केला आहे. मयांकचं भांडण आपल्याशी नाही तर दुसऱ्या एका अज्ञात व्यक्तीशी झालं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. सुवर्णने त्याच्या अर्जात म्हटलं आहे की, त्याने भांडणात मध्यस्थी केली होती, ज्यादरम्यान त्याला दुखापत झाली. कथित हल्लेखोर पळून गेल्यानंतर त्यालाच खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं. दरम्यान मयांकच्या कुटुंबाने जामिनाला विरोध केला असून, त्यांना स्वतःच्या आणि साक्षीदारांच्या सुरक्षेची भीती वाटत असल्याचे म्हटले आहे. या अर्जावर 20 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुवर्णचा शोध घेण्यात आला. तसंच डॉक्टरांनी हत्या झालेल्या शस्त्राची ओळख पटवली असून, ज्याच्याकडून सुरी विकत घेतली होती, त्यानेही सुवर्णला ओळखले आहे. मयांकडे वडील रमेश लोहार यांनी वकील प्रिन्स कुमार उपाध्याय यांच्यामार्फत न्यायालयात एक हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यांनी हा हल्ला अत्यंत क्रूर आणि विनाकारण होता असं म्हटलं आहे.

मयांकच्या वडिलांचा विरोध

याचिकेत म्हटलं आहे की, "22 वर्षांच्या एका तरुणाची सार्वजनिक ठिकाणी लोकलमध्येकिरकोळ वादातून हत्या करण्यात आली. त्याच्या पालकांनी आपला मुलगा गमावला आहे." यात पुढे असेही नमूद केलं आहे की, सुवर्णला जामीन मिळाल्यास खटल्याच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. ही घटना 23 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास, अंधेरीहून नालासोपाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका जलद लोकल ट्रेनमध्ये घडली होती.

नेमका वाद कशावरुन झाला होता?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयांक लोहार कामावरुन परतत असताना पाऊस सुरु असतानाही दरवाजा उघडा ठेवला असल्याने त्याचा सुवर्णशी वाद झाला. यावेळी काही प्रवाशांनी त्यांना दूर केलं. गोरेगाव-मालाडदरम्यान अलार्म चेन ओढली असता, आरोपीने मयांकच्या छाती आणि पोटात चाकूने वार केले.

यानंतर मयांकला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र  तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मयांकच्या हातात कोणतंही हत्यार किंवा शस्त्र नव्हतं आणि त्याने कोणावरही हल्ला केला नव्हता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांनी हस्तक्षेप केल्यानंतर आठ मिनिटांनी सुवर्ण पुन्हा मयांकजवळ आला आणि आपल्या बॅगेतून सुरी काढून त्याच्यावर वार केले. त्याने एकामागोमाग अनेकदा मयांकवर वार केले आणि पळून जाण्याआधी प्रवाशांना धमकी दिली.

बचाव पक्षाचा दावा काय?

बचाव पक्षाचे म्हणणे आहे की सुवर्ण आणि लोहार हे एकमेकांना ओळखत नव्हते, यात कोणताही हेतू किंवा पूर्वनियोजित कट नव्हता. सुवर्णकडून कोणतेही शस्त्र जप्त करण्यात आले नाही आणि सीसीटीव्हीमध्ये चाकूने हल्ला झाल्याचे दिसले नाही. त्यांनी ओळख परेडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दुसरीकडे मयांकच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुवर्णचा शोध घेण्यात आला, तसंच एका डॉक्टरने जखमांचा संबंध शस्त्राशी जोडला असून चाकू विक्रेत्यानेही त्याची ओळख पटवली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Mumbai Local