लोकल ट्रेनमध्ये 'तो' तरुण..., कॉलेज तरुणीचा अश्लील VIDEO इन्स्टावर, काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबई लोकल ट्रेनमधील एक तरुणीचा अश्लील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला. तो तरुण लोकलमध्ये महिलांचे त्यांच्या नकळत व्हिडीओ काढतो आणि नंतर...काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.
मुंबईतून पोलिसांसमोर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई लोकलमधून दररोज लाखो महिला - तरुणी प्रवास करतात. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थितीत झाला आहे. या लोकल ट्रेनमध्ये एक तरुण महिला - तरुणांना टार्गेट करत आहे. हा नराधम तरुण दररोज लोकल ट्रेनमधून प्रवास करतो. या प्रवासादरम्यान तो लोकलमधील महिला - तरुणीचे त्यांच्या न कळत व्हिडीओ काढतो. त्यानंतर ते व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करतो. पण थांबा हे व्हिडीओ तो सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी एआयने एडिट करायचा. तो एआयने या तरुणींचे व्हिडीओ अश्लील बनवायचा आणि मग सोशल मीडियावर शेअर करायचा.
कशी आली घटना समोर?
पोलिसांनी माहिती दिली की, 19 वर्षीय कॉलेज तरूणीचा एक अश्लील व्हिडीओ तिला इन्स्टाग्रामवरील ‘pile6531’ या अकाऊंटवर अश्लील गाण्यासोबत दिसला. तो व्हिडीओ जवळपास 1 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. हा व्हिडीओ पाहून तरुणीला धक्काच बसला. तिचा हा व्हिडीओ 22 जूनला रात्री 8.30 मैत्रिणीसोबत चर्चगेट ते विरार फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करताना काढला गेला होता. त्यावेळी एका तरुणाने तिच्या नकळत मोबाईलमध्ये हा व्हिडीओ काढला होता.
हेसुद्धा वाचा - आजारपणाच कारण देत सुट्टी घ्यायचा अन् करायचा 'गुन्हा'; पुणे पोलीस दलातील पोलिसाचा कारनामामुळे खळबळ, असं फुटलं बिंग
असा लागला शोध!
त्यानंतर या पीडित तरुणी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगचेच त्या तरुणाच्या शोधतात तपास सुरु केला. या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर Playboy असं नाव होतं. पोलिसांना ना त्याचा चेहरा माहिती होता ना नाव. कारण प्रोफाईलवरही मुलीचा फोटो होता. पोलिसांनी चक्र फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वसईतील साबीर मोहम्द रूस्तमपर्यंत पोलीस पोहोचले. साबीर हा 32 वर्षांचा तरुण होता, जो उत्तर प्रदेशातील होता. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. त्याचा मोबाईल जजप्त केल्यावर अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडीओ आढळून आले आहेत.
साबीर हा इन्स्टाग्रामवर व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोकलमधील महिला आणि तरुणींचा तो नकळत व्हिडीओ काढायचा. नंतर एआयच्या मदतीने महिलांचे ते फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ करून इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करायचा.