• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /BMC ची एक्सचेंज ऑफर... पेंग्विन म्हैसूरला पाठवणार आणि त्या मोबदल्यात...; राणीच्या बागेत दिसणार 2 नवे पाहुणे?

BMC ची एक्सचेंज ऑफर... पेंग्विन म्हैसूरला पाठवणार आणि त्या मोबदल्यात...; राणीच्या बागेत दिसणार 2 नवे पाहुणे?

मुंबईचे पेंग्विन लवकरच म्हैसूरला जाणार, याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. तर पेंग्विनच्या बदल्यात झेब्रा आणि जिराफ मुंबईत आणण्याची शक्यता आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 06, 2026, 08:56 AM IST|Updated: Nov 06, 2026, 09:01 AM IST
joinshare
BMC ची एक्सचेंज ऑफर... पेंग्विन म्हैसूरला पाठवणार आणि त्या मोबदल्यात...; राणीच्या बागेत दिसणार 2 नवे पाहुणे?
Image Credit: Mumbai zoo penguin

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
BMC ची एक्सचेंज ऑफर... पेंग्विन म्हैसूरला पाठवणार आणि त्या मोबदल्यात...; राणीच्या बागेत दिसणार 2 नवे पाहुणे?

BMC ची एक्सचेंज ऑफर... पेंग्विन म्हैसूरला पाठवणार आणि त्या मोबदल्यात...; राणीच्या बागेत दिसणार 2 नवे पाहुणे?

2

'माझ्या खुर्चीवर बसू नकोस,' रामदास कदम तटकरेंच्या मेहुण्यावर संतापले; स्टेजवरच खडाजंगी 'माझ्यावर मेहरबानी करतो का...'

3

5 लाख कोटी रुपये द्या आणि... हल्ले थांबवण्यासाठी बंडखोरांच्या ऑफरमध्ये दोनच अटी; नेमका हा प्रकार काय? कोणाकडे मागितले एवढे पैसे?

4

महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार; नोव्हेंबरमध्येच गाठला उच्चांक तापमानाचा पारा, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

5

'तुमचा परवाना दाखवा,' दुकानात घुसून FDA अधिकाऱ्यांची दुकानदाराकडे मागणी; पण एक प्रश्न विचारताच फिरले माघारी, मोठा ट्विस्ट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईच्या राणीच्या बागेतील खास आकर्षण म्हणजे पेंग्विन. 2017मध्ये राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले होते. त्यानंतर बच्चे कंपनीसाठी हे पेंग्विन खास आकर्षण ठरत होते. त्यानंतर भारतभरातून प्राणीसंग्रहलयातून हंबोल्ट जातीच्या पेग्विंनसाठी मागणी वाढली होती. त्यामुळं मुंबईचे पेंग्विन लवकरच म्हैसूरला जाणार असल्याची चर्चा आहे. त्या बदल्यात झेब्रा आणि जिराफ मुंबईत आणण्याची शक्यता आहे.  दोन्ही प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे.

मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन आता म्हैसूरला पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई आणि म्हैसूर प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राण्यांच्या अदलाबदलीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून या बदल्यात म्हैसूरच्या प्राणिसंग्रहालयातील झेब्रा आणि जिराफ मुंबईत आणण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या राणीच्या बागेत पेंग्विन हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आठ हम्बोल्ट पेंग्विन मुंबईत आणण्यात आले होते. त्यासाठी पेंग्विन खरेदी आणि त्यांच्या कक्षाच्या उभारणीसाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च झाले होते. या निर्णयावर त्यावेळी मोठी टीकाही झाली होती.

सुरुवातीला आठ असलेली पेंग्विनची संख्या प्रजननामुळे वाढत गेली. गेल्या वर्षी मे महिन्यात पेंग्विनची संख्या 21 होती. त्यानंतर आणखी चार पिल्लांचा जन्म झाला असून, त्यामध्ये दोन नर आणि दोन मादी आहेत. त्यामुळे सध्या पेंग्विनची संख्या 25 वर पोहोचली आहे.

दरम्यान, मुंबई आणि म्हैसूर प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या अदलाबदलीचा करार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या करारानुसार मुंबईतील काही पेंग्विन म्हैसूरला पाठवले जाणार असून त्याबदल्यात झेब्रा आणि जिराफ मुंबईत आणण्याचा विचार आहे. मात्र, नेमके किती पेंग्विन दिले जाणार आणि त्या बदल्यात किती प्राणी आणले जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

गणेशोत्सवाच्या काळात म्हैसूर प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. त्यानंतर या अदलाबदलीबाबत चर्चा पुढे आली आहे. मात्र, अद्याप कोणताही औपचारिक प्रस्ताव अंतिम झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.सध्या प्राथमिक चर्चा सुरू असून, अंतिम करारानंतरच मुंबईतील पेंग्विन म्हैसूरला जाणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मुंबईच्या भायखळा राणीची बागमध्ये लवकरच आशियाई सिंह येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौर रितू तावडे यांनी नुकतीच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची गांधीनगर येथे भेट घेतली. जुनागड येथील प्रसिद्ध सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून दोन जोड्या (2 नर आणि 2 मादी) आशियाई सिंह मुंबईच्या राणीच्या बागेत आणण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News
india