• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /पश्चिम रेल्वेवर होतेय नवीन मार्गिका, 17 स्थानके अन् 12 हजार कोटींचा खर्च; दादरला उतरून ट्रेन बदलण्याची गरज नाही

पश्चिम रेल्वेवर होतेय नवीन मार्गिका, 17 स्थानके अन् 12 हजार कोटींचा खर्च; दादरला उतरून ट्रेन बदलण्याची गरज नाही

मुंबई लोकल आता थेट पनवेल-वसई दरम्यान धावणार आहे. कुर्ला-दादरला उतरून नागरिकांना प्रवास करावा लागणार नाही.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 13, 2026, 09:28 IST|Updated: Nov 13, 2026, 09:30 IST
joinshare
पश्चिम रेल्वेवर होतेय नवीन मार्गिका, 17 स्थानके अन् 12 हजार कोटींचा खर्च; दादरला उतरून ट्रेन बदलण्याची गरज नाही
Image Credit: Panvel Vasai Direct Local Train

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई लोकलचा विस्तार होतोय. लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन म्हटली जाते. जररोज लाखो नागरिक लोकलचा प्रवास करतात. लोकलचा प्रवास आणखी सुकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. आता लवकरच पनवेल-वसई लोकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं आता कुर्ला-दादरला उतरून नागरिकांना प्रवास करावा लागणार नाही.

पनवेलहून वसई-विरार ही मेमू सध्या उपलब्ध आहे. मात्र ठराविक वेळेतच मेमू असल्याने नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळं वसई-विरार गाठण्यासाठी कुर्ला, दादर स्थानकांत उतरून मग पुढचा प्रवास करावा लागतो. मात्र या उपनगरीय रेल्वे प्रकल्पामुळं नवी मुंबई, भिवंडी आणि वसईदरम्यान थेट लोकल उपलब्ध होणार आहे. यामुळं नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

वसई-पनवेल उपनगरीय रेल्वे मार्गिका हा एमयूटीपी - बी अंतर्गंत प्रस्तावित प्रकल्प आहे. एकूण  69.23 किमी लांबीच्या मार्गावर 17 स्थानके असणार आहेत. या मार्गावरील सुमारे 28 किमीचा भाग उन्नत स्वरुपात असून त्यासाठी सुमारे 12,710.82 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

प्रस्तावित तिसरी आणि चौथी मुंबई या नव्या विकासकेंद्रांच्या दृष्टीनेही हा रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा आहे. पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदरामुळेही या मार्गाचे महत्त्व वाढले आहे. बंदर कार्यान्वित झाल्यानंतर परिसरात रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सध्या या मार्गावर पनवेल ते वसई रोड दरम्यान मेमू (MEMU) आणि पॅसेंजर ट्रेन सुरू आहेत (उदा. ट्रेन क्रमांक 69165) परंतु पूर्ण क्षमतेने थेट उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यासाठी केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

खर्डी-कसारादरम्यान दोन दिवस लोकल बंद

आसनगाव ते कसारादरम्यान तिसरी मार्गिका उभारणे आणि कसारा पार्डमधील विस्तारीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 13 आणि 14 नोव्हेंबरला विशेष ट्रैफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे खर्डी ते कसारादरम्यान लोकल बंद राहणार आहेत. या कालावधीत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Local
Mumbai News
Mumbai