• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /डिस्चार्ज मिळताच सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत चर्चा

डिस्चार्ज मिळताच सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत चर्चा

डिस्चार्ज मिळताच सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं पाहिला मिळत आहेत. घरी परतल्यानंतर पवारांच्या भेटीगाठींना अचानक वेग आल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चांना हवा मिळाली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 08, 2026, 09:51 IST|Updated: Nov 08, 2026, 10:02 IST
joinshare
डिस्चार्ज मिळताच सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत चर्चा
Image Credit: Sharad Pawar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

दुष्काळात नगरसेवकांचा केरळ दौरा, 35 लाख खर्चून अभ्यास दौऱ्यासाठी जाणार

2

महाराष्ट्राला हादरवणारा मानवी तस्कर घोटाळा, डॉ. दाम्पत्य करायचे नवजात बाळाची विक्री, 12 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट

3

विद्यार्थ्यांची मज्जा! शाळांना सलग 15 दिवस सुट्टी; डिसेंबरअखेरीस शाळा बंद, जाणून घ्या पुन्हा कधी भरणार?

4

लेकीच्या वाढदिवशीच आईची हत्या घडवून आणली, पुण्यातील घटनेने खळबळ, कारण संताप आणणारे

5

पवारांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेची एन्ट्री? बारामतीत मोठ्या घडामोडींना सुरुवात; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शरद पवार यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. शरद पवार सध्या मुंबईतीली त्यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान डिस्चार्जनंतर पार्थ पवार आजोबांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले. तिथे ते तब्बल दीड ते दोन तास होते. याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही दिग्गज नेते देखील सिल्वहर ओक निवासस्थानी असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार या महत्त्वाच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांसारखे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विशेष म्हणजे, पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते पार्थ पवार यांनी देखील सिल्व्हर ओकवर आले होते. पार्थ पवार हे आजोबा शरद पवारांसोबत सुमारे दोन तास होते. त्यानंतर नेते मंडळांची बैठक यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. 

खरंच तर ही चर्चा सुनील तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर सुरु झाली. ते म्हणाले की, “सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही; मात्र अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच हे विलिनीकरण पूर्ण झाले असते.  महाराष्ट्राच्या राजकारणात विलिनीकरणाच्या विषयावर नवीन तर्कवितर्क सुनील तटकरेंच्या वक्तव्यानंतर आलंय. त्यात सिल्व्हर ओकवर एकापाठोपाठ एक होणाऱ्या या उच्चस्तरीय बैठकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच नवीन भूकंप होतो की काय असं बोलं जातंय. 

दरम्यान शरद पवार हॉस्पिटलला असताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही भेट घेतली. मग या भेटीनंतर सर्वांचे डोळे उंचावले आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Maharashtra Politics
Sharad Pawar