• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /राज ठाकरे कर्जतच्या जंगलात जिथं झाड तोडली तिथचं जाणार, सभा घेणार, 'सह्याद्रीच्या रक्षणासाठी' मनसे आक्रमक

राज ठाकरे कर्जतच्या जंगलात जिथं झाड तोडली तिथचं जाणार, सभा घेणार, 'सह्याद्रीच्या रक्षणासाठी' मनसे आक्रमक

कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे कर्जमध्ये जाऊन वृक्ष तोडीची पाहणी करुन सभा घेणार आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 27, 2026, 09:36 PM IST|Updated: Oct 27, 2026, 09:42 PM IST
joinshare
राज ठाकरे कर्जतच्या जंगलात जिथं झाड तोडली तिथचं जाणार, सभा घेणार, 'सह्याद्रीच्या रक्षणासाठी' मनसे आक्रमक

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

राज ठाकरे : कर्जतमधील वृक्षतोडीला विरोध करत राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं आहे.  'सह्याद्रीच्या रक्षणासाठी'अशी टॅगलाईन घेत मनसेनं टीझर रिलिज केला आहे.  कर्जतमधील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी राज ठाकरे उद्या कर्जत दौऱ्यावर जाणार आहेत.  जंगलातील वृक्षतोडीच्या ठिकाणी भेट देत ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांशी चर्चा करणार आहेत.  त्यानंतर राज ठाकरेंची सभा होणार असून या सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 

वृक्षतोडीवरुन राजकीय वातावरण पेटले

कर्जतमधील जंगलात टोरंट प्रकल्पाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरुन राजकीय वातावरण चांगलच पेटले आहे. मनसे आणि शिवसेना UBT नं या वृक्षतोडीविरोधात रान उठवलं आहे. आदित्य ठाकरेंनी काल कर्जतच्या जंगलात वृक्षतोडीची पाहणी केली. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे कर्जतमध्ये उद्या सभा घेतोय. दरम्यान, या प्रकल्पाला वाढता विरोध बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकल्पाची बाजूनं ठाम भूमिका घेतलीय. त्यामुळं यावरुन राजकीय आरोपप्रत्यारोपाचा वणवा भडकू लागला आहे.

जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांचा राज ठाकरेंना पाठिंबा

कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीला विरोध करत जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी राज ठाकरेंचं समर्थन केलंय.. कबूतरांवरून मनसे आणि निलेशचंद्र मुनी यांच्यात मतभेद झाले होते. पण आता वृक्षतोडीच्या विरोधातील मुद्द्यावर त्यांच्यात एकमत झालंय... कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीच्या विरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेला जैन समाजानं पाठिंबा द्यावा असं आवाहन निलेश चंद्र मुनी यांनी केलीये. गरज पडल्यास आंदोलनात सहभागी होऊ असंही ते म्हणालेत.

कर्जतमधील वृक्षतोडीवर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकार मानवी राक्षस असल्याचा हल्लाबोल केला आहे.  हा लढा थांबणार नाही, प्रकल्प कसा होतो बघूच असा इशारा राऊतांनी दिला आहे. 

कर्जतमधील प्रस्तावित टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापला आहे. या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत कर्जत गाठत वृक्षतोडीला विरोध केला आहे.  याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रकल्पाबाबत पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली.  प्रकल्पाची संपूर्ण माहिती न घेता आणि त्याचा अभ्यास न करता विरोध केला जात आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. 

टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप होत आहे.  त्यामुळं या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध केला जात आहे.  मात्र राज्य सरकार हा प्रकल्प तडीस नेण्यावर ठाम आहे त्यामुळं वृक्षतोडीवरुन वणवा आणखी भडकत जाणार हे नक्की. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Raj Thackeray
Aaditya Thackeray