SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'भाजप विरोधीपक्ष भूमिकेतून...', संविधान वाचवा मोर्चावरून राज ठाकरेंची टीका, तर 'असे ट्वीट करणारे हे पहिलेच पंतप्रधान'

'मला आजपर्यंत आठवत नाही, इतके पंतप्रधान होऊन गेलेत, ज्यांनी अशा प्रकारच्या कुठल्या निवडणुकीवर प्रतिक्रियासुद्धा दिली आहे ते', अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 03, 2026, 01:28 PM IST | Updated: Nov 03, 2026, 01:59 PM IST
Image Credit: Raj Thackeray
Join

कार्टूनिस्ट अलोक निर्मित पु. ल. देशपांडे दिनदर्शिका  2027 चे प्रकाशन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या सोहळ्यात त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर बाळासाहेबांच्या व्यंगचित्राबद्दलही ते भरभरून बोलले. पण त्यासोबत राज ठाकरे यांनी काँग्रेसपासून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

'भाजप विरोधपक्ष भूमिकेतून...'

यावेळी भाषण करताना राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा मी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडे बघतो, सत्ता येऊन चालत नाही, सत्तेवर बसून चालत नाही. सत्ता अंगात आणि मनात असावी लागते. भाजप अजून विरोधीपक्ष भूमिकेतून बाहेर आलेला नाही. तर काँग्रेसला अजून समजला नाहीय की, विरोधपक्ष कसा असतो. गेल्या पाच वर्षात जरा त्यांना लक्षात आलं आहे. पण मला असं वाटतं की, ही गोष्ट योग्य नाही. आपल्यावरचा विरोध आपल्यावरची टीका, ही समजून घेतली पाहिजे. ते काय काल भाजपने तो संविधान वाचवा मोर्चा काढला. हे सत्तेवरती आहेत. सत्तेवरचा पक्ष मोर्चा काढतो लोकशाही वाचवा. काल एका माणसाने फार चांगली कमेंट केली होती. तो म्हणाला की, भारतीय जनता पक्षाने लोकशाही वाचवावी असं सांगणं, कंट्री फ्राइड (KFC) चिकन विकणाऱ्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखा आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही कसले मोर्चे काढत आहात. का काढत आहे, कशासाठी काढत आहेत.

मोदींवरही केली टीका!

पुढे ते म्हणाले की, परवा काय ते विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात. कुठे महाराष्ट्रात झाल्या कुठे उत्तर प्रदेशात झाल्यात अजून कुठे झाल्यात. पहिले चुकीचं सांगण्यात आलं, काँग्रेसची एकही जागा आली नाही. सगळीकडे काय तो भाजपचा विजय झाला. याच्यावरती पंतप्रधान ट्वीट करतात. विधान परीषदेच्या जागा आहेत, मला आजपर्यंत आठवत नाही, इतके पंतप्रधान होऊन गेलेत, ज्यांनी अशा प्रकारच्या कुठल्या निवडणुकीवर प्रतिक्रियासुद्धा दिली आहे ते. समजा तेव्हा सोशल मीडिया नसेल पण वर्तमानपत्रातही प्रतिक्रिया दिसली नाही मला कधी. पण हे लोक अजून विरोधीपक्ष भूमिकेतूनच बाहेर पडले नाहीय.

हल्ली आमच्या व्यंगचित्र काढायची नाहीत, हे असं छाप्याच नाही, असे सगळं खूप घाणेरडे झालं आहे. एका काळात बाळासाहेब यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भरपूर व्यंगचित्र काढली होती. एवढंच नाहीतर एक व्यंगचित्र त्यांनी पंडितजींना पाठवलं देखील होतं. त्यावर नेहरूंनी सही करून बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES