SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'शांत आहोत म्हणजे गां* नाही हे...', छट पूजा वादावरुन संतापलेल्या राज ठाकरेंचा BJP ला इशारा; 'माझी मराठी माणसांना विनंती आहे की...'

"मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की...", राज ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 13, 2026, 10:36 IST | Updated: Nov 13, 2026, 10:56 IST
Image Credit: भारतीय जनता पार्टीचं नाव घेत टीका (प्रातिनिधिक फोटो सौजन्य सोशल मीडिया आणि वृत्तसंस्थांकडून साभार)
Join

"भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय," असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे. "संघर्ष निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर...

"भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टँक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं," असं राज म्हणाले आहेत.

माझी मराठी माणसांना विनंती आहे की...

"जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या 12,14 वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की," असं राज यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

...तरच आपल्याला शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार

"भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे!  आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो," असं राज म्हणाले आहेत.

अंगावर येणार असाल तर विसरू नका की...

"बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , (अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गां* नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे!  उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते! येथे मरहट्टे राहातात ते," असा इशारा राज यांनी दिला आहे.

 

...पण सतर्क राहा

"भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा! योग्य वेळी निर्णय घेऊ," असं सूचक विधान राज यांनी पोस्टच्या शेवटी केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES